08/05/2026
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान महापौर श्री. रविभाऊ लांडगे व सौ. श्रद्धाताई लांडगे आपणांस लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्या दोघांच्या सहजीवनाचा हा सुंदर प्रवास प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि परस्पर आदर यांच्या आधारावर अधिकाधिक बहरत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
रवि बाबासाहेब लांडगे
08/05/2026
🎓✨ दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..! ✨🎓
तुमच्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे हे यश आहे.
यशाच्या या पहिल्या टप्प्यावर पोहोचल्याबद्दल सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे हार्दिक कौतुक..! 🌟
उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..! 💐
अशीच मेहनत, आत्मविश्वास आणि सकारात्मकता कायम ठेवा, यश नक्की तुमच्या पावलांशी राहील..! 🚀
📚 “मोठी स्वप्ने पाहा… मेहनतीच्या जोरावर ती नक्की पूर्ण करा!” ✨
08/05/2026
स्वातंत्र्याच्या यज्ञात आपल्या प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक
वासुदेव हरी चापेकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
#वासुदेवहरीचापेकर #चापेकरबंधू #स्मृतिदिन #क्रांतिकारक #स्वातंत्र्यसैनिक #भारताचा_अभिमान #देशभक्ती
07/05/2026
⚠️ गुरुकृपा कॉलनीतील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य! ⚠️
गुरुकृपा कॉलनी परिसरातील चेंबर खचल्यामुळे अपघात होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी ही समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ दखल घेत स्थापत्य विभागाशी संपर्क साधण्यात आला आणि संबंधित चेंबर रिपेरिंगचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून घेण्यात आले.
जनतेच्या प्रत्येक समस्येवर तत्परतेने कार्य करणे हीच आमची बांधिलकी आहे. विकासकामांसोबत नागरिकांची सुरक्षितता आणि सुविधा यालाच आम्ही सर्वोच्च प्राधान्य देत आहोत.
“जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास!” ✨
07/05/2026
ऑपरेशन सिंदूर : माता भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या भ्याड दहशतवाद्यांचा खात्मा..!
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगामच्या खोऱ्यात धर्म विचारून, कलमा पढण्यास भाग पाडत भारतीय पर्यटकांवर केलेला भ्याड आणि मानवतेला काळिमा फासणारा हल्ला संपूर्ण देश कधीही विसरू शकणार नाही. या अमानुष हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांनी आपले प्राण गमावले. त्या सर्व निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
या संतापजनक घटनेनंतर देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या ठाम आणि निर्णायक नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने “ऑपरेशन सिंदूर” राबवत पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर जबरदस्त कारवाई करून भारताच्या सामर्थ्याची जगाला जाणीव करून दिली. आज “ऑपरेशन सिंदूर” ला एक वर्ष पूर्ण होत असताना भारतीय सैन्याच्या शौर्याला, पराक्रमाला आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची पर्वा न करता लढणाऱ्या प्रत्येक जवानाला सलाम..!
भारत शांततेचा समर्थक आहे, पण दहशतवादाला उत्तर देण्याची ताकदही ठेवतो, हे या कारवाईतून संपूर्ण जगाने पाहिले. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांचा आणि निष्पाप नागरिकांचा त्याग सदैव स्मरणात राहील.
जय हिंद..!
07/05/2026
📍 जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध!
प्रभागातील दिघी रोडवरील गंगोत्री पार्क येथे नागरिकांनी बसण्याच्या बाकड्यांची दुरावस्था असल्याची तक्रार मांडली होती. नागरिकांच्या या समस्येची तात्काळ दखल घेत उद्यान विभागाशी संपर्क साधून त्या ठिकाणी नवीन बाकडे बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणे अधिक सुशोभित, सुरक्षित आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
जनतेचा विश्वास आणि सहकार्य हीच आमची खरी ताकद! 💪🏻🌿
Devendra Fadnavis Ravindra Chavan Mahesh Landge Shatrughna Kate BJP Maharashtra BJP Pimpri Chinchwad BJP Bhosari पिंपरी चिंचवड महानगरपालिका
07/05/2026
विश्वकवी, साहित्यसम्राट आणि नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
06/05/2026
सुदिनं सुदिनं जन्मदिनम तव, भवतु मंगलम जन्मदिनम |
विजयी भव सर्वत्र सर्वदा, भवतु मंगलम जन्मदिनम |
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आमच्या सहकारी सौ. सारिकाताई बोऱ्हाडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
वाढदिवस हा आपल्या गतकाळातील आठवणींना उजाळा देण्याचा त्याचबरोबर एक नवीन संधी घेऊन आपले उज्वल भविष्य घडविण्याचा दिवस. आपल्या वैचारिक, बौद्धिक वाढीला आणि आयुष्याला सकारात्मक उर्जा देण्याचा दिवस. मला विश्वास आहे की आजचा दिवस आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीला अधिक बळ देईल. आपल्या वाढदिवसानिमित्त मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की, आपल्याला निरोगी आणि आनंदी दिर्घायुष्य लाभो.
पुनःश्च एकदा आपणांस वाढदिवसाच्या शुभेच्छा.!
06/05/2026
सामाजिक न्यायाचे शिल्पकार, बहुजन हिताय-बहुजन सुखाय या विचारांचे अधिष्ठाता, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! 🙏
#राजर्षीशाहूमहाराज
05/05/2026
पिंपरी-चिंचवडमधील युवकांसाठी सुवर्णसंधी! 🚀
PCMC मेगा भरती 2026 अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण विभागात तब्बल 407 प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. COPA, वायरमन, इलेक्ट्रिशियन, DTPO, प्लंबर, रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग यांसारख्या विविध ट्रेडमध्ये संधी उपलब्ध आहे.
✔️ 1 वर्षाचे प्रशिक्षण
✔️ सरकारी नियमानुसार स्टायपेंड
✔️ PCMC मध्ये कामाचा प्रत्यक्ष अनुभव
👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मे 2026
👉 आजच अर्ज करा: www.pcmcindia.gov.in
उज्ज्वल करिअरची सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ! 💼✨