Swapnali Nitin Pandit

Swapnali Nitin Pandit

Share

बाप्पाचे कार्यकर्ते जनतेच्या सेवेत!
नगरसेविका पुणे महानगरपालिका!
शहर सुधारणा समिती सदस्य!
कार्यकर्ते @tulshibaugmahaganpati

Photos from Swapnali Nitin Pandit's post 03/06/2026

📍 १७९, नित्यानंद सोसायटी, शिंदे आळी, पुणे.

परिसरातील पादचारी मार्ग आणि प्रवेशद्वाराजवळील खराब झालेल्या भागांची दुरुस्ती करून आवश्यक ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच सिमेंट काँक्रीटचे काम पूर्ण करण्यात आले. ✨

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या कामामुळे परिसर अधिक व्यवस्थित आणि सुरक्षित झाला आहे. 🙌🏻

नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देत परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.

सौ. स्वप्नाली नितीन पंडित
नगरसेविका, पुणे महानगरपालिका
सदस्य, शहर सुधारणा समिती.

Photos from Swapnali Nitin Pandit's post 02/06/2026

विचारांना दिशा देणारं नेतृत्व, संघटनेला बळ देणारी शिकवण आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने भारलेला प्रेरणादायी माहोल! 🚩✨

भारतीय जनता पार्टी, पुणे शहर आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न झाला.

संघटनात्मक कार्य अधिक सक्षम करण्यासाठी, जनतेपर्यंत विविध जनकल्याणकारी योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी तसेच विकासाभिमुख विचार अधिक दृढ करण्यासाठी या प्रशिक्षण वर्गामध्ये सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी आपले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री मा. सौ. माधुरीताई मिसाळ, पुण्याच्या महापौर मा. सौ. मंजूषाताई नागपुरे, शहराध्यक्ष मा. श्री. धीरज घाटे, मा. श्री. रवींद्र साठे, आमदार मा. श्री. सिद्धार्थ शिरोळे, आमदार मा. श्री. हेमंतभाऊ रासने, आमदार मा. श्री. योगेश टिळेकर, आमदार मा. श्री. सुनील कांबळे, आमदार मा. श्री. भिमराव तापकीर, माजी आमदार मा. श्री. जगदीश मुळीक, सभागृह नेते मा. श्री. गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष मा. श्री. श्रीनाथ भीमाले तसेच सर्व सहकारी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 💫

आपल्या देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जनकल्याणकारी योजनांची दिशा आणि आपले मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आली. 🚩

सौ. स्वप्नाली नितीन पंडित
नगरसेविका, पुणे महानगरपालिका
सदस्य, शहर सुधारणा समिती.

Photos from Swapnali Nitin Pandit's post 31/05/2026

📍 सौ. स्वप्नाली नितीन पंडित, जनसंपर्क कार्यालय, शुक्रवार पेठ, पुणे.

राष्ट्राच्या प्रगतीचा प्रवास, समाजातील प्रेरणादायी उपक्रम आणि सामान्य नागरिकांच्या यशोगाथा थेट पंतप्रधानांच्या शब्दांतून अनुभवता याव्यात, यासाठी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाचा आनंद घेतला. 🇮🇳✨

आपल्या देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी मांडलेले विचार, जनसहभागाचे महत्त्व आणि देशाच्या विकासाशी जोडलेले विविध विषय उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले. 🙏🏼

यावेळी मा. श्री. सुमित कुडचे, मा. श्री. मदनसिंह राजपूत, मा. श्री. संजय राठी, मा. श्री. दिलीप पवार, मा. श्री. अमर शाह, मा. श्री. साई डोंगरे, मा. श्री. प्रदीप पवार आणि मा. श्री. तुषार गुजराती उपस्थित होते.

श्री. नितीन पंडित
मा. अध्यक्ष, कसबा व्यापारी आघाडी

31/05/2026

महिला सक्षमीकरण, सुशासन, सामाजिक बांधिलकी आणि लोकहिताची अखंड जपणूक यांचे प्रतीक असलेल्या अहिल्यादेवींचे कार्य काळाच्या पुढचे होते. त्यांच्या विचारांमधून आणि कार्यातून समाजसेवेची प्रेरणा घेत लोकहितासाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याचा संकल्प या निमित्ताने करूया.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏💐

सौ. स्वप्नाली नितीन पंडित
नगरसेविका, पुणे महानगरपालिका
सदस्य, शहर सुधारणा समिती.

28/05/2026

"हे मातृभूमी, तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण."

प्रखर राष्ट्रभक्त, थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम! त्यांच्या विचारांतून आणि त्यागातून आपल्याला सदैव राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळत राहो. 🙏✨

सौ. स्वप्नाली नितीन पंडित
नगरसेवक पुणे महानगरपालिका
सदस्य शहर सुधारणा समिती

Photos from Swapnali Nitin Pandit's post 27/05/2026

📍 श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे.

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने बाप्पाला १०५१ कलिंगडांचा महानैवेद्य तसेच बाप्पाचा चंदन उटी सोहळा उत्साहात संपन्न झाला. चंदनाच्या सुगंधाने आणि भक्तांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर प्रसन्न झाला होता.✨🙏

तसेच भारतीय वारकरी मंडळ, पुणे यांच्याकडून बाप्पाला भजनाची सेवा अर्पण करून भक्तिभावाने वंदन करण्यात आले. सुरेल भजनांनी भारलेले वातावरण आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण सोहळ्याला एक वेगळीच भक्तिमय रंगत लाभली. 🎶💫

भक्ती, परंपरा आणि वारकरी संस्कृतीचा सुंदर अनुभव देणारा हा सोहळा मनात कायमची आनंदाची भावना देऊन गेला.

श्री. नितीन पंडित
कोषाध्यक्ष, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे.

Photos from Swapnali Nitin Pandit's post 27/05/2026

📍 श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे.

तुळशीबाग… पुण्याची ओळख असलेली आणि महिलांची सर्वात मोठी व गजबजलेली बाजारपेठ! परंपरा, व्यापार आणि विश्वास यांची अनेक वर्षांची परंपरा जपणाऱ्या या व्यापारी विश्वातील मान्यवरांचा गौरव करण्यासाठी आयोजित तुळशीबाग व्यापारी भूषण पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ✨🙏

या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते व्यापार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यापाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

तुळशीबाग व्यापार भूषण पुरस्कार :
- मा. श्री. गणेशजी हेगडे (अगत्य हॉटेल)

तुळशीबाग व्यापारी सन्मान पुरस्कार :
- श्रीमती. राजश्रीताई ठोंबरे
- ⁠मा. श्री. बापूसाहेब गोते
- ⁠मा. श्री. अमर शहा
- ⁠मा. श्री. राजूशेठ साखरीया (भारत नॉवेल्टी)

विशेष व्यापारी सन्मान पुरस्कार :
- मा. श्री. संजयजी दाते (दाते मंडप)

व्यापार क्षेत्रात योगदान देणाऱ्या या सर्व मान्यवरांचा गौरव करताना परंपरा, आपुलकी आणि समाजाशी जपलेली नाळ अनुभवायला मिळाली. विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी बांधव आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरला. 💫

श्री. नितीन पंडित
कोषाध्यक्ष, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे.

Photos from Swapnali Nitin Pandit's post 27/05/2026

📍 श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे.

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित कलिंगड महोत्सव, १०५१ कलिंगडांचा महानैवेद्य तसेच दुपारची बाप्पाची आरती भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली. ✨🙏

यावर्षी सर्पाले बंधूंनी साकारलेली आकर्षक कलिंगड सजावट भाविकांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरली. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात आणि आनंदात न्हाऊन निघाला. 🍉💫

भक्तीभाव, परंपरा आणि सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून रंगलेला हा सोहळा मनाला आनंद देणारा आणि कायम स्मरणात राहणारा ठरला. 🙏

श्री. नितीन पंडित
कोषाध्यक्ष, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Jansampark Karyalay. Sr No. 188, Shop No. 03, , Shivranjan Society Opp To Dudhya Maruti Mandir, Shukrawar Peth
Pune
411002