Vinaya Sudhir Mungase

Vinaya Sudhir Mungase

Share

जिल्हा परिषद सदस्य
कुरुळी - आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गट
मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन

06/06/2026

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा सुवर्णक्षण म्हणजे 'शिवराज्याभिषेक दिन'! या मंगल दिनी शिवछत्रपतींच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा.

सर्व शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

05/06/2026

निसर्ग आपल्याला भरभरून देतो, अगदी मातेसारखी आपली काळजी घेतो. आजच्या या विशेष दिवशी आपणही निसर्गाप्रती थोडी कृतज्ञता व्यक्त करूया. चला, आपल्या अंगणात किंवा परिसरात एक छोटं साधे झाड लावूया आणि ते जगवण्याची जबाबदारी घेऊया.

जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

03/06/2026

ऊसतोड कामगार, कष्टकरी आणि शेतकऱ्यांचे कैवारी, आदरणीय स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. जनसेवेचा एक नवा आदर्श त्यांनी आपल्या कर्तृत्वाने उभा केला.

Photos from Vinaya Sudhir Mungase's post 01/06/2026

कर्तव्याला कष्टाची आणि स्वप्नांना जिद्दीची जोड मिळाली की यश कसं दाराशी चालून येतं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सौ. कल्याणी महेश बोंबले! लग्न, संसार आणि घरची जबाबदारी सांभाळत त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलं आहे. त्यांची 'मुंबई पोलीस दलात' झालेली निवड सर्व महिला भगिनींसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

काल वेताळे येथे आयोजित भव्य मिरवणूक सोहळ्याला उपस्थित राहून कल्याणी यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. विवाहानंतरही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून खाकी वर्दी परिधान करण्याचा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या परिवाराचाही वाटा तितकाच मोठा आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील तुमची आगामी कारकीर्द देशसेवेने आणि यशाने उजळून निघो, याच सदिच्छा!

या मिरवणूक सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्या सौ. तनुजाताई संदीपभाऊ घनवट यांच्यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

01/06/2026

पाठीशी उभा असलेला... "बापमाणूस" !

आम्हा लेकरांना आपल्या मायेचा, प्रेमाचा, कर्तृत्वाचा आधार देणारे आमचे वडील, आमचे हक्काचे "बाबा" आज वयाची ६४ वर्षे पूर्ण करून ६५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत !

आयुष्याच्या वळणावर क्षणभर थांबून मागे वळून पाहिलं, की बाबांसोबतच्या अनेक आठवणी समोर दिसतात. बाबांचा बोट धरून टाकलेलं पहिलं पाऊल, बाबांच्या खांद्यावर बसून पाहिलेला शाळेचा पहिला दिवस ते अगदी बाबांचा आशीर्वाद घेऊन जिल्हा परिषद सदस्य म्हणून घेतलेली जबाबदारी... आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर हा "बापमाणूस" आपल्या पाठीशी आहे याची जाणीव दृढ झाली. बाबांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना आमच्या मनातही लोकसेवेचा संस्कार पेरला.

आयुष्यात आव्हानं अनेक आलीत, पण कोणत्याही आव्हानाचा सामना करताना भीती वाटली नाही, कारण "बाबा" नावाचा सह्याद्री आपल्या पाठीशी आहे ही भावनाच माझ्या मनाला नेहमी आधार देणारी, मनगटाला बळ देणारी असते. आमचा हा आधार अधिक, भक्कम व्हावा, हे बळ द्विगुणित व्हावं, आमच्या बाबांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावं याच मनस्वी सदिच्छा !

31/05/2026

न्याय आणि सुशासनाचा आदर्श असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

अहिल्यादेवींचे आयुष्य अत्यंत साधे होते, पण त्यांचे विचार खूप मोठे होते. प्रत्येकाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले.

त्यांनी केलेली लोककल्याणकारी कामे आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहेत. राजमातांच्या पवित्र स्मृतीस जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

Photos from Vinaya Sudhir Mungase's post 29/05/2026

प्राथमिक आरोग्य केंद्रांत आता सुरू होणार 'सावित्री कॅफे'!

28/05/2026

पुणे जिल्हा परिषदेचे मा. सदस्य तथा पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा. श्री. शरदभाऊ बुट्टेपाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपल्या कार्याला उत्तरोत्तर यश लाभो व उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो, हीच शुभेच्छा!

28/05/2026

मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण तुमच्या घरात भरभराट आणि जीवनात आनंद घेऊन येवो. परस्परांमधील आपुलकी आणि सलोखा असाच वाढत राहो.

ईद मुबारक!

27/05/2026

प्रसूतीच्या काळात महिलांवर येणारा आर्थिक ताण पूर्णपणे दूर करण्यासाठी 'जननी शिशु सुरक्षा योजना' हा एक भक्कम आधार ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून गर्भवती मातांना मोफत प्रसूती, औषधोपचार, आवश्यक तपासण्या, रक्तपुरवठा आणि पौष्टिक आहाराची संपूर्ण सोय केली जाते.

ही योजना केवळ मातेचीच नव्हे, तर तिच्या बाळाचीही तितकीच काळजी घेते. जन्मापासून ते १ वर्षापर्यंतच्या आजारी बालकांसाठी मोफत उपचार, प्रयोगशाळा चाचण्या आणि मोफत रुग्णवाहिका वाहतूक व्यवस्था याद्वारे उपलब्ध करून दिली जाते. कुटुंबाला कोणतीही आर्थिक चिंता न करता आपल्या हक्काचे उपचार घेता यावेत, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे!

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune
412105