Adv Nilesh Narayan Nikam

Adv Nilesh Narayan Nikam

Share

Group Leader/ Leader Of Opposition, PMC
5th term elected Corporator, PMC
34 years of committed, honest & integrity-driven public service

08/05/2026

१० वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!

आयुष्य आता खऱ्या अर्थात सुरू होईल.
ज्यांना यश प्राप्त झाले नाही त्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रयत्न करा.
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!

#१०वी_निकाल #विद्यार्थी #अभिनंदन

08/05/2026

स्वातंत्र्याचा ज्वालामुखी पेटवणारे, पहिले सशस्त्र क्रांतिकारक..!
वासुदेव हरी चापेकर यांना स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन..!

#वासुदेव_हरी_चापेकर #स्वातंत्र्यसैनिक #क्रांतिकारक #स्मृतिदिन

07/05/2026

आशियातील पहिले नोबल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

#अभिवादन

06/05/2026

पुणेकरांसाठी दिलासादायक निर्णय!

पुण्यातील पाणी कपात ३१ मे पर्यंत पूर्णपणे रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियमित व सुरळीत पाणीपुरवठा कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.

Photos from Adv Nilesh Narayan Nikam's post 06/05/2026

।। गणपती बाप्पा मोरया ।।
संकष्टी चतुर्थी निमित्त श्री चरणी प्रार्थना!

संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजीनगर, पुणे येथील श्री रोकडोबा मंदिर येथे दर्शनाचा लाभ झाला.
छत्रपती शिवाजीनगर (गावठाण) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टला सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

याप्रसंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. सार्वजनिक गणेशोत्सव ही आपली सांस्कृतिक ओळख असून, तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून मनाला समाधान मिळाले.

विघ्नहर्ता श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना केली की, सर्व नागरिकांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो.

06/05/2026

आदर्श नेतृत्व, सामाजिक समतेचा दीपस्तंभ, लोकहितवादी विचारांचे महान पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

05/05/2026

📍पुणे महानगरपालिका
🗓️०५-०५-२०२६

01. पालखी सोहळा २०२६:
वारकरी बांधवांच्या सुविधेसाठी नियोजन बैठक संपन्न!
02. पाणीटंचाईवर निर्णायक पाऊल!
पुण्यासाठी मान्सूनपूर्व ठोस नियोजन.

#बैठक

Photos from Adv Nilesh Narayan Nikam's post 05/05/2026

📍पुणे महानगरपालिका
🗓️०५-०५-२०२६

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा आगामी पालखी सोहळा सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा, यासाठी आज पुणे महानगरपालिकेत नियोजनात्मक आढावा बैठक संपन्न झाली.

लाखो वारकरी बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून पालखी मार्गावरील स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा आणि वाहतूक नियोजनावर विशेष भर देण्याच्या सूचना मी प्रशासनाला दिल्या आहेत.

या बैठकीस उपमहापौर श्री. परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त श्री. पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त श्री. ओमप्रकाश दिवटे, श्री. प्रजित नायर, सहाय्यक आयुक्त रंजन कुमार, पोलिस उपायुक्त हिंमत जाधव, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. उमेश सुरेश मोरे, दिंडी संस्था संघटना सचिव भाऊ महाराज फुरसुंगीकर, राजेंद्र आरफडकर, ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त भावार्थ देखणे, कमिटी विश्वस्त रोहिणीताई पवार, विठ्ठल मंदिर पालखी प्रमुख राजाभाऊ भुजबळ उपस्थित होते.

#बैठक

Photos from Adv Nilesh Narayan Nikam's post 05/05/2026

📍पुणे महानगरपालिका
🗓️०५-०५-२०२६

पावसाळ्यातही पाण्याचा प्रश्न सुटणार पुणेकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी मान्सूनपूर्व नियोजनावर भर!

पुणे शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, आगामी पावसाळ्यात नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पुणे महानगरपालिका भवनात आयोजित ‘मान्सूनपूर्व पाणीपुरवठा नियोजन’ आढावा बैठकीत सहभाग घेतला.

पावसाळ्यात जलस्रोत उपलब्ध असले तरी वितरण व्यवस्थेतील तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन शहरातील पाणीपुरवठा सुरळीत आणि अखंड ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीत विशेषतः जलस्रोतांची उपलब्धता, साठवण क्षमता, वितरण व्यवस्थेतील सुधारणा, गळती रोखण्यासाठी तातडीची कामे तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी जलस्रोतांची तयारी यावर भर देण्यात आला.

यावेळी महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे, उपमहापौर श्री. परशुरामजी वाडेकर, सभागृह नेते श्री. गणेश बिडकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर तसेच पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि सन्माननीय नगरसेवक उपस्थित होते.

पुणेकरांना पुरेसा आणि नियोजित पाणीपुरवठा मिळावा, हेच आमचे प्राधान्य असून पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

#पाणीपुरवठा #बैठक

05/05/2026

📍 बाणेर

बाणेर येथे श्री. प्रशांत आरगे यांच्या नव्या स्पा जिम्नॅशियमच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिलो. फिटनेस आणि आरोग्याला प्रोत्साहन देणारी ही आधुनिक सुविधा परिसरासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

या उपक्रमाबद्दल श्री. प्रशांत आरगे यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या या नवीन प्रवासाला उत्तम यश लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी माजी नगरसेवक आदित्य माळवे, विनय बहिरट तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Photos from Adv Nilesh Narayan Nikam's post 04/05/2026

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सभागृह नेते मा. प्रशांत शितोळे यांची सदिच्छा भेट झाली.

खूप दिवसांनी झालेल्या या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि निवांत चर्चेमधून अनेक विषयांवर मनमोकळा संवाद साधता आला.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Senapati Bapat Road
Pune
411016