निर्भया पथक पुणे ग्रामीण पोलीस

निर्भया पथक पुणे ग्रामीण पोलीस

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from निर्भया पथक पुणे ग्रामीण पोलीस, Government Organization, Pune Rural Police, Pune.

Photos 30/08/2016
06/08/2016

महिलांवरील अत्याचार / गुन्हे यांना नियंत्रित करणे व गुन्हेगारांची मानसिकता बदलणे हे पोलिसांसमोरील आज खरे आव्हान असेल. "SHE TEAM " च्या माध्यमातून तेलंगणा पोलिसांनी अत्यंत स्तुत्य प्रयत्न करुन यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. मा. विश्वास नांगरे पाटील, वि.पो. महानिरिक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी या संकल्पनेला ' निर्भया पथक ' च्या माध्यमातून कोल्हापूर परिक्षेत्रात मूर्त स्वरुप देण्यास पुढाकार घेतला आहे.

मा. विश्वास नांगरे पाटील, वि. पो. महानिरिक्षक , को. प., कोल्हापूर हे पुणे ग्रा. पोलीस दलाच्या ' निर्भया पथकाला दि. ११.0८.२०१६ रोजी हिरवा झेंडा दाखवून जिल्हयांतील सर्व पोस्टेला रवाना करणार आहेत..

ध्येय -
🔹महिलांची छेडछाड हा माहिलांवरील अत्याचारातील अगदी पहिला टप्पा आहे. फोन कॉल, मेसेज, इ मेल, सोशल मिडियाचा वापर करुन किंवा प्रत्यक्ष महिलेची छेड काढली जाते.
🔹 अशा वेळी महिलांना विनाविलंब पोलीसांची मदत उपलब्ध करून देवून तिच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे.
🔹 क्षुल्लक बाब समजून महिला / शाळकरी मुलींच्या छेडछाडीकडे होणारे दुर्लक्ष व त्यातून अपराध्याचे वाढणारे बळ यांवर प्रभावी नियंत्रण आणणे.
🔹पुरुषांना विशेषत : तरुणांना त्यांच्या गैरवर्तनाची समुपदेशनातून जाणीव करून देणे व कुटुंबियांच्या मदतीने त्याना सुधारण्याची संधी देणे.

कार्यपद्धती -
🔹 महिला / तरुणींचे छेडछाड होण्याची शक्यता असणारी ठिकाणे शोधून काढण्यात येतील.. उदा. शाळा / कॉलेज, बस स्टँड, बाजारपेठ, महिला वसतीगृहे, सिनेमा हॉल, उद्याने इ.
🔹 निर्भया पथक अशा ठिकाणी टेहाळणी करुन उडाणटप्पू मुले / तरुण / पुरुष यांना शोधेल.
🔹 त्यांनी केलेल्या कृत्याचे स्वरूप लक्षात घेता त्यानुसार उचित कलमांन्वये गुन्हा दाखल करतील. आवश्यकतेनुसार दोषारोपपत्र मा. न्यायालयाला सादर करणे वा अत्पवयीन अपराध्याला समज देवून पालकांच्या ताब्यात देतील.
🔹 तक्रारदार पिडीताची ओळख जाहीर होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल..

सामाजिक कर्तव्य -
आवश्यकतेनुसार गुन्हा घडते वेळी हजर साक्षीदारांनी सामाजिक जबाबदारीतून स्वतःहून तपासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं.

निर्भया पथकाशी ' संपर्क -
🔹डायल १००/ १०९१
🔹 व्हॉटस् अप क्रमांक - ९९२३४६३१००
🔹नियंत्रण कक्ष क्रमांक - ०२०- २५६५७१७१
🔹 ई मेल [email protected]
🔹 मोबाईल फोन अॅप - https://play.google.com/store/apps/details?id=com.snt.askpcr&hl=en

निर्भया पथक पुणे ग्रामीण पोलीस Government organization

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Pune Rural Police
Pune
411008