27/09/2026
कन्या म्हणजे चैतन्य, घराची अस्मिता.. मुलांपेक्षा मुलींमध्ये नेहमीच सुज्ञपणा फार लवकर येतो.. लहानशी बोबडे बोलणारी कन्या मोठं होऊन सगळ्याच कुटुंबाची काळजी कधी घेऊ लागते ते कळतच नाही...
वात्सल्य, आत्मीयता आणि निस्वार्थ जिव्हाळा हा स्त्रीमध्ये मुळचाच असतो, म्हणूनच स्त्रीला भारतीय संस्कृतीत 'शक्ती स्वरूप' मानले जाते...
'नवरात्रीच्या मंगलमय काळात कन्या दिन म्हणजे दुग्ध शर्करा योग..' समाजातील प्रत्येक कन्येला निरोगी दीर्घायुष्य लाभावे, प्रत्येक लेकीचे स्वप्न पूर्ण व्हावे हीच सदिच्छा, कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !