23/04/2026
विचारांचा जागर — प्रेरणेचा सन्मान!
भारतरत्न Dr. Babasaheb Ambedkar यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त
Saraswati Education Society’s Tasgaonkar Group of Institution कर्जत येथे आयोजित विशेष कार्यक्रमात “आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर व्याख्यान देण्याचा मान मला लाभला.
व्याख्यानाचे प्रमुख वक्ते शिवश्री ॲड.रोशन मारुती पाटील (वकील:उच्च न्यायालय मुंबई, युवा समाज प्रबोधनकार) उपस्थित होते, तसेच संस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार तासगावकर यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संविधानाची ताकद, समानतेचा संदेश आणि सामाजिक न्यायाची गरज यावर सखोल विचार मांडता आले. बाबासाहेबांच्या विचारांनी आजही समाजाला दिशा देण्याची ताकद आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली.
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या संदेशातून प्रेरणा घेत, समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार अधिक दृढ झाला.
🙏 या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी संस्थेचे, सर्व मान्यवरांचे व आयोजकांचे मनःपूर्वक आभार.
Motivation Inspiration ProudMoment AdvRoshanPatil