30/05/2026
अफजलखानाचे खुनी षडयंत्र! आधी संभाजीराजे नंतर शिवराय!
पुत्राच्या खुन्याला शहाजीराजांनी का मारले नाही?
https://youtu.be/sF-e7ojEJcI
खानाचा खरा चेहरा! कपट, घात आणि विषारी द्वेष!
जिजाऊपुत्र संभाजीराजांना अफजलखानाने कनकगिरीच्या लढाईत कट रचून मारले, पण त्या भयंकर दुर्दैवी घटनेतील अनेक महत्त्वाच्या प्रश्नाकडे मात्र इतिहास लेखनात, कथनात साफ दुर्लक्ष झालेले आहे!
हे प्रश्न म्हणजे 'अफजलखानाने संभाजीराजांना का मारले?', 'तेसुद्धा थेट स्वतः उघडपणे न मारता, परस्पर दुसऱ्याकडून कट रचून, दगा करून का मारविले?', 'अफजलखानाचे संभाजीराजांशी असे कोणते वैर होते? खान संभाजीराजांचा इतका द्वेष का करत होता?', 'अफजलखानाने संभाजीराजांऐवजी थेट शहाजीराजांचाच घात करण्याची हिम्मत का केली नाही?' आणि 'अफजलखानानेच संभाजीराजांना दग्याने मारले हे माहिती असूनसुद्धा शहाजीराजांनी अफजलखानाला का मारले नाही?' या प्रश्नांची नेमकी आणि समर्पक उत्तरे त्यामागील कारणांसह दिल्याशिवाय हा विषय पूर्ण होतच नाही!
अफजलखानाची मुख्य हत्यारे ही कपटकारस्थाने आणि विश्वासघात हीच कशी होती याच्या उघड दर्शनासह वरील सर्व अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे! सविस्तरपणे आणि अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
https://youtu.be/sF-e7ojEJcI
पुत्राच्या खुन्याला शहाजीराजांनी का मारले नाही? #जिजाऊपुत्र संभाजीराजे #अफजलखान
खानाचा खरा चेहरा! कपट, घातआणि विषारी द्वेष! जिजाऊपुत्र संभाजीराजांना अफजलखानाने कनकगिरीच्या पहिल्या लढाईत कट रच....
27/05/2026
अफजलखानाने संभाजीराजांना मारलेच नाही? खुद्द संभाजीराजांचाच पुरावा!
https://youtu.be/6nJSLKCdV3w
बखरींना कोलणारा हा पुरावा चूक की बरोबर?
शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांना अफजलखानाने मारलेच नव्हते, कारण ते अफजलवधानंतरसुद्धा जिवंत होते, असे सांगणारा एक महत्त्वाचा, समकालीन आणि अस्सल पुरावा आहे.
'अफजलखानाला मारून शिवरायांनी संभाजीराजांच्या हत्येचा सूड उगवला!' अशी हकीकत अनेक बखरींमधे आहे. पण एक अस्सल, समकालीन आणि खुद्द संभाजीराजांचाच शिलालेख बखरींमधील त्या हकीकतीला खोटा पाडणारा, साफ चुकीचे ठरविणारा असा आहे! 'अफजलखानाचा संभाजीराजांच्या मृत्यूशी काहीच संबंध नव्हता!' असेच हा पुरावा सांगतो.
'संभाजीराजांना अफजलखानानेच मारले!' या प्रचलित इतिहासाला कोलणारा हा पुरावा कोणता? त्यातून निघणारा निष्कर्ष बरोबर आहे का? मृत्यूनंतर संभाजीराजांनी दान कसे दिले? या अत्यंत अवघड प्रश्नांची समर्पक उत्तरे! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
https://youtu.be/6nJSLKCdV3w
बखरींना कोलणारा हा पुरावा चूक की बरोबर? #जिजाऊपुत्र संभाजीराजे #अफजलखान
जिजाऊंचेपुत्र संभाजीराजे यांना अफजलखानाने मारलेच नव्हते, कारण ते अफजलवधानंतरसुद्धा जिवंत होते, असा एक अत्यंत ब.....
23/05/2026
अफजलखानाच्या दगलबाजीमुळे जिजाऊपुत्र संभाजीराजांचा मृत्यू?
https://youtu.be/mNKry8k80Y4
तो भयंकर प्रसंग नेमका कसा घडला? "भावाच्या हत्येचा सूड घे!" जिजाऊंची शिवरायांना आज्ञा?
शिवरायांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजांचा कनकगिरीच्या लढाईत संशयास्पद मृत्यू झाला! यामागे अफजलखानाची दगलबाजी होती? की त्याने स्वतःच संभाजीराजांना मारले? की अफजलखानाचा त्या घटनेशी कसलाही संबंध नव्हता?
एका मान्यवर इतिहास संशोधकाने 'अफजलखानाला शिवरायांनी मारल्यानंतर चार वर्षांनी संभाजीराजांचा मृत्यू झाला, त्यामुळे अफजलखानाचा संभाजीराजांच्या मृत्यूची कसलाही संबंध नाही!' असा इतिहास मांडला आहे.
संभाजीराजांच्या मृत्यूची ती भयंकर दुर्दैवी घटना नेमकी कशी घडली होती? प्रतापगडापाशी अफजलखानाला मारून महाराजांनी याचाच सूड घेतला होता का? वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात मूळ ऐतिहासिक कागदपत्रांतील वर्णनांमधून!
जिजाऊपुत्र संभाजीराजांच्या मृत्यूचे गूढ उलगडणारा हा महत्त्वाचा पण अज्ञात इतिहास! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
https://youtu.be/mNKry8k80Y4
ती भयंकर घटना नेमकी कशी घडली होती? #जिजाऊपुत्र संभाजीराजे #अफजलखान
शिवरायांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजांचा कनकगिरीच्या लढाईत संशयास्पद मृत्यू झाला! यामागे अफजलखानाची दगलबाजी ....
15/05/2026
बाल शिवरायांच्या सुटकेसाठी थोरले भाऊ संभाजीराजे वयाच्या तेराव्या वर्षी शाहिस्तेखानाशी लढले होते!
https://youtu.be/hfZOsSG8n_0
जिजाऊपुत्र संभाजीराजे! जहाल पराक्रमाचा अकाली अंत! दुर्लक्षित युवराजाचा संपूर्ण इतिहास!
'राजा शिवाजी' या नव्या चित्रपटामुळे शिवरायांचे बंधू संभाजीराजे यांचे नाव प्रकाशझोतात आले! पण त्यांचे नाव 'संभाजी' ठेवण्यामागे एक रक्तरंजित घटना कारणीभूत होती! हे संभाजीराजे वयाच्या केवळ तेराव्या वर्षी जिजाऊ आणि बाल शिवरायांच्या सुटकेसाठी शिवनेरी गडापाशी थेट शाइस्तेखानाशी लढले होते! त्यांनी फरादखानाला पराभवाची धूळ चारुन पळायला लावले होते! शहाजीराजांनी यांना युवराज्याभिषेक केला होता! या जहाल पराक्रमी राजपुत्राचा दुर्दैवी अंत झाला तेव्हा त्यांना नुकताच पुत्र झाला होता!
संभाजीराजांच्या अल्प आयुष्यातील या सर्व थरारक घटना मात्र अजूनही अपरिचितच राहिलेल्या आहेत. कुठे, केव्हा, का आणि कसा घडला हा इतिहास?
अफजलखानामुळे अकाली मृत्यू पावलेल्या या जिजाऊपुत्राची ही तेजस्वी पण आजवर अंधारातच राहिलेली अज्ञात शौर्यगाथा! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
https://youtu.be/hfZOsSG8n_0
जहाल पराक्रमी युवराजाचा अकाली अंत! संपूर्ण इतिहास!
'राजा शिवाजी' या नव्या चित्रपटामुळे शिवरायांचे बंधू संभाजीराजे यांचे नाव प्रकाशझोतात आले! पण त्यांचे नाव 'संभाजी' ...