08/09/2023
जालना घटनेचा निषेध व मराठा आरक्षण ते ही 50% ओबीसीमधुन ही मागणी करण्यासाठी 17 तारखेला मराठा क्रांती मोर्चा सांगलीकडून निघणाऱ्या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी व जबाबदारी घेऊन समिती बनवण्यासाठी उद्या बैठकीला उपस्थित रहावे.
उद्या शनिवार दिनांक : 09/09/2023 दूपारी 1 वाजता.
ठिकाण : मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन,राजमाता जिजाऊ मार्ग,गारपीर चौक,सिव्हील हॉस्पिटल पाठीमागे,सांगली
06/02/2023
ओबीसी समर्थक मराठ्यांची किंवा पद आणि पैशयाला हावरया वकीलांची समिती बनवून Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेब तुम्ही कधीच मराठ्यांना न्याय देऊ शकत नाही.मराठा समाजाला न्याय देण्यासाठी तुम्हाला घटनात्मक व कायदेशीर भूमिका घ्यावी लागेल.राजकीय फायदा अथवा मतांचा विचार न करता मराठ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागेल अगदी तशी जशी गुवाहाटीला जाताना आणि सर्वोच्च न्यायालयात पक्ष मिळवायला देताय तशी भूमिका घ्यावी लागेल.
#मराठा_आरक्षण
#मराठासेवक
28/01/2023
मराठा समाजाचे घटनात्मक अधिकार डावलून बेकायदेशीर ओबीसी आरक्षण वाचवत घेतलेली निवड प्रक्रिया मराठे रोखून दाखवतील पण याची किंमत येणाऱ्या निवडणुकीत Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांच्या गटाला व Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वात मराठ्यांची कायम फसवणूक करणाऱ्या भाजपा गटाला मोजावी लागेल.विरोधी पक्षाच्या भूमिका या त्यांचे राजकीय अस्तित्व ठरवणाऱ्या असतील,न्याय नाही मतदान नाही ही मानसिकता मराठ्यांनी बनवली असल्याने राजकीय पक्षांनी आता शहाणे होणे गरजेचे आहे.
#मराठा_आरक्षण
28/01/2023
सांगली जिल्ह्यातील मराठा,कुणबी-मराठा समाजातील 18 ते 45 वयोगटातील 10 पास ते पदवी पर्यंत शैक्षणीक आहर्ता असणाऱ्या 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नॉन क्रिमिलेयर गटाच्या सर्व विद्यार्थी - विद्यार्थीनी तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणी यांच्यासाठी मोफत प्रशिक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज CSMS-DEEP प्रकल्प अंतर्गत सुवर्णसंधी..
#प्रशिक्षण_कालावधी
6 महीने - 6 आठवडे -1 तासाचे 3 सेशन प्रतीदिन प्रमाणे,
#अभ्यासक्रम
1) CSMS-DEEP DIPLOMA MODULE 1 ECS
इंग्रजी भाषा कौशल्य प्रमाणपत्र.
संवाद कौशल्य व सॉफ्ट स्कील.
2) CSMS-DEEP DIPLOMA MODULE 2 ITS
मूलभूत माहिती तंत्रज्ञान कौशल्यांमध्ये प्रमाणपत्र.
( रोजगारक्षमता वाढीसाठी )
3) CSMS-DEEP DIPLOMA MODULE 3 DS-BDS
डोमेन विशिष्ट मूलभूत डिजिटल कौशल्यांमध्ये प्रमाणपत्र
4) CSMS-DEEP DIPLOMA MODULE 4 DS-ADS
डोमेन विशिष्ट प्रगत डिजिटल कौशल्यांमध्ये प्रमाणपत्र
विद्यार्थ्यांनी वरनमूद अभ्यासक्रमांपैकी 1 व 2 मॉड्युल अनिवार्य असतील तर पुढील 10 करियर ट्रॅकमधून कोणताही एक ट्रेक 3 रे व 4 थे मॉड्युल म्हणून निवडायचे आहेत.
१) Data Entry & Data Management
२) Accounting - Finance Accounting with Tally
३) Accounting - Advanced Financial Accounting
४) Designing - Desktop Publishing (DTP)
५) Designing - Web Designing
६) Hardware & Networking
७) Programming - Mobile App Developer
८) Digital Freelancing
९) Management - Retail Management
१०) Management - Banking, Finance,Services Insurance,
नाव नोंदणीसाठी संपर्क : [email protected]
सांगली जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रशिक्षण केंद्रांची यादी
१) आटपाडी : परिवार कॉम्प्युटर,मेन रोड,आटपाडी,सांगली.
२) जत : मंजुनाथ इन्फोटेक,मंगळवार पेठ,जत.
३) कडेगांव : अमोल कॉम्प्युटर,एसटी स्टँडजवळ,कडेगांव.
४) कवठेमहांकाळ : विवेकानंद इन्स्टिट्यूट फॉर इन्फोर्मशन अँड टेक्नॉलॉजी,मेन रोड,कवठेमहांकाळ,
५) विटा- खानापूर : यशोधन कॉम्प्युटर्स,एसटी स्टँडमागे,विटा,
६) मिरज : रिसोर्स एडवांन्सड कॉम्प्युटर,गणेश तलावाजवळ,मिरज.
७) सांगली : इन्फोसावंत टेक्नॉलॉजीस,कर्मवीर भाऊराव चौक,मिरज रोड,सांगली.
८) कुपवाड : श्री अकादमी कॉम्प्युटर सेंटर,मेन रोड कुपवाड,
९) सांगली : राजर्षी शाहू महाराज अकादमी, मराठा समाज,आंबेडकर रोड,सांगली.
१०) पलूस :सिटी कॉम्प्युटर सेंटर, जाधव हॉस्पिटल समोर,पलूस
११) शिराळा : महाराष्ट्र सेल्फ-एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग बोर्ड,पूल गल्ली,शिराळा.
१२) तासगांव : वक्रतुंड कॉम्प्युटर्स,गणपती मंदीर जवळ,तासगांव
१३) वाळवा : फिनिक्स कॉम्प्युटर एजूकेशन,विलासराव शिंदे शॉपिंग सेंटर,आष्टा.
१४) वाळवा : मॉडर्न कॉम्प्युटर्स,एसटी स्टँडमागे,इस्लामपूर,
वरील ठिकाणी देखील संपर्क करून नोंदणी करता येऊ शकते.
नाव नोंदणी नंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी तपासण्यासाठी : www.mkcl.org/csmsdeep या संकेतस्थळावर तपासू शकता.
जास्तीजास्त पात्र मराठा विद्यार्थी वर्गाने याचा लाभ घ्यावा.
सदरकामी काही अडचण उद्भवल्यास संपर्क करा
प्रशांत भोसले
7757837777
मराठासेवक समिती महाराष्ट्र
मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र
23/09/2022
करूया सीमोल्लंघन संकटाचे,
लूटूया या सोने नवनिर्मीतीचे !!
मराठा समाजासमोर आज अनेक संकट आहेत एकीकडे सर्वपक्षीय राजकीय अभिनिवेशामुळे शिक्षण आणि शासकीय नोकरयामध्ये समाजावर अन्याय होत आहे,त्या विरोधात जी लढाई सुरु आहे ती सुरुच राहील.याशिवाय समाज संघटीत होऊन ज्या गोष्टी करु शकतो त्यावर देखील काम करने आवश्यक आहे.
आरक्षणा पलीकडे असलेले जग अनुभवण्यासाठी नक्की या संकटावर मात करुन विजयश्री होण्यासाठी आवश्यक असलेले पर्याय आपण सगळे मिळून तयार करूया.
#मराठासेवक
#दसरामेळावा_2022
22/09/2022
चला विचारांचं सोनं लुटूया..
प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकूया !!
🚩🚩मराठा दसरा मेळावा २०२२🚩🚩
बुधवार, ०५ ऑक्टोबर २०२२
सकाळी १० वाजता
स्थळ : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृह, स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ, सातारा रोड, पद्मावती, पुणे
मराठा सेवक समिती, महाराष्ट्र.
22/09/2022
सर्वपक्षीय राजकारणी लोकांना प्रश्न विचारायची वेळ आली आहे !!
राजकीय पक्ष आरक्षण देतील का ?
कोणताच पक्ष आपल्याला ओबीसीमधून आरक्षण देणार नाही ?
असले फालतू गुलामीत जगायला शिकवणारे प्रश्न विचारत बसण्यापेक्षा,
आयोगाने घटनात्मक आरक्षण देण्याची शिफारस केलेली असताना बेकायदा घटनाबाह्य आरक्षण का दिले ?
मागास लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त आरक्षण का दिले ?
वेळोवेळी न्यायालयाने ओबीसी समाजाचे फेरसर्वेक्षण करा म्हणून सांगितलेले असताना ते का केले जात नाही ?
लक्षात घ्या आरक्षण देण्याची भूमिका राजकीय पक्षांनी घेण्यापूर्वी ती तुम्ही घेणे आवश्यक आहे.ओबीसी कधी म्हणतले आहेत का आम्हाला जास्त आरक्षण का देताय संख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या.बोगस आरक्षण घेणारे मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत.खोट्या भुलथापाना बळी पडू नका,संघटीत व्हा,वाचा, लिहा आणि प्रसार प्रचार माध्यमातून समाज प्रबोधन करुन आपले हक्क मिळवायला तयार व्हा.
प्रशांत भोसले
22/09/2022
#मराठासेवक
#मराठा_आरक्षण_परिषद
#मराठाआरक्षण
16/09/2022
आलच पाहीजे !!
या राज्यात फक्त मराठा म्हणून अधिकार डावलले जात असतील तर समाजाने पुन्हा एकत्र यावे लागेल,
शासकीय सेवेतून मराठ्याना हद्दपार करुन त्यांच्या खुल्या प्रवर्गातील जागा मागास लोकांना वाटण्याच सुरु असलेले षड्यंत्र उधलून लावण्यासाठी,
व्यावसायिक शिक्षणात पात्रता असून प्रवेश मिळत नसलेल्या व्यथा संपवण्यासाठी,शैक्षणीक फी मुळे होणारी गळती रोखण्यासाठी, वस्तिगृह व शैक्षणीक अडचणी मुळे होणाऱ्या आत्महत्या पुन्हा घडू नयेत यासाठी,एकत्र यावे लागेल.
सवलतीच्या नावाखाली मराठ्यांची सुरु असलेली फसवणूक थांबवायसाठी,
आपल्या हक्कासाठी,
आपल्या न्यायासाठी,
50% मधील आरक्षण मिळवण्यासाठी,
#चलो_सोलापूर
#मराठा_आरक्षण_परिषद.
30/08/2022
34% ओबीसी समाजाला 55% प्रतिनिधित्व आणि 32 टक्के असलेल्या मराठा समाजाला 18% प्रतिनिधित्व ही कुठली समानता ?. मराठ्यांचा आता ओबीसी मध्ये समावेश करावाच लागेल यासाठी काही ओबीसीची सुपारी घेतलेले समाजाची दिशाभूल करुन समाजात फुट पाडत आहेत.
Review Petion मधील मुद्दे कोणते असणारे त्यात जिंकणार कसे ?
इंद्रा सहानी निकालाने जी अपवादात्मक परिस्तिथी मध्ये आरक्षण देण्यासाठी भौगोलिक स्थिती दर्शवली आहे ती कशी दूर करणार ?
एका जातीसाठी स्वतंत्र प्रवर्ग कसा तयार करणार आणि टिकनार कसा ?
नवीन सर्वेक्षण म्हणजे गायकवाड आयोग बोगस होता अस म्हणणे नाही का ?
50% बाहेरचे आरक्षण म्हणजे आता जे प्रतिनिधित्व मिळत आहे तेच आरक्षण म्हणून घेऊन ओबीसीच बोगस आरक्षण सुरु ठेवण्याला मदत करणे आहे हे माहीती असताना समाजाची दिशाभूल का ?
ओबीसी मधून आरक्षण मिळवून खुल्या प्रवर्गात अतिरिक्त जागांवर मराठा समाजाचा अनुशेष भरून निघनार असेल तर ओबीसी समर्थक अभ्यासक असलेल्या व सातत्याने समाजाला फसवणाऱ्या अभ्यासकाला अडचण का असावी ?
सातत्याने दिखावा करुन समाजाची दिशाभूल करुन घात करणारे वरील प्रश्नांची उतर देणार नाहीत.आपण आपली लढाई लढूया आपल्याला हरवायला अनेक जण तयार आहेत कारण त्याना मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नाही फक्त दुकानदारी सुरु ठेवायची आहे.
#मराठासेवक