सांगली आपत्ती मदतकार्य समिती

सांगली आपत्ती मदतकार्य समिती

Share

नियंत्रण कक्ष : शिव मेरिडियन बिल्डिंग, कलेक्टर बंगल्यासमोर, स्टेशन रोड, सांगली. मोबाईल : 7517377771

01/08/2024
01/08/2024

*कोयना धरण*

आज दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वा. धरणामध्ये एकूण ८६.१९ टीएमसी ८१.८४ % पाणीसाठा झाला आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची (रेड अलर्ट) शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त येव्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढविणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीत सांडव्यावरून ४०,००० क्यूसेक्स विसर्ग चालू आहे. *उद्या दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. सांडव्यावरून सोडणेत आलेल्या विसर्गात वाढ करून ५०,००० क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे.* तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल.

धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ५२,१०० क्युसेक्स असेल.

*कोयना/कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.*

27/07/2024

ALERT MESSAGE FROM ALMATTI DAM

Considering discharges from Krishna River (Kallol Barrage)and Ghataprabha River (Lolasur Bridge), Inflow to Almatti Dam is increasing. Hence, *"Outflow to river will be gradually increased from present 3,00,000 cusec to 3,25,000 Cusec on 27.07.2024 at 10:30 PM*.

27/07/2024

*कोयना धरण*

*आज दि. २७ जुलै रोजी सकाळी ९:०० वा. सांडव्यावरील विसर्गात वाढ करून ४०,००० क्युसेक्स विसर्ग नियोजित होते. सदर वाढ तात्पुरती स्थगित करणेत येत आहे. सुधारित वेळ अलाहिदा कळविणेत येईल.*

27/07/2024

पूर नियंत्रण कक्ष
सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक–27/07/2024 8:00 AM

*पाणी पातळी - (फूट इंचामध्ये)*
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/26'05"
2) बहे पूल-(23.7)13'00"
3) ताकारी पूल (46)/43'07
4)भिलवडी पूल -(53)42'2"
5)आयर्विन- (45)/39'08"
6)राजापूर बंधारा-(58)/50'3"
7) राजाराम बंधारा-(43)/47'00"

*पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)*
1) कृष्णा पूल कराड- 65615
2) आयर्विन पूल - 96310
3) राजापूर बंधारा - 206375
4) राजाराम बंधारा - 65959
5) कोयनाधरण- 82.99 TMC/32100
6)वारणा धरण- 30.37 TMC/ 16385
7)अलमट्टी धरण- 76.698
आवक - 218230
जावक-300000

26/07/2024

*कोयना धरण*

*आज दि. २६ जुलै २०२४ रोजी सकाळी ७:०० वा. कोयना धरणाच्या सांडव्यावरून ३०,००० क्युसेक्स विसर्ग सोडणेत आला आहे.*

धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ३२,१०० क्युसेक्स आहे.

*कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.*

26/07/2024

पूर नियंत्रण कक्ष
सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक–26/07/2024 8:00 AM

*पाणी पातळी - (फूट इंचामध्ये)*
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/27'06"
2) बहे पूल-(23.7)12'09"
3) ताकारी पूल (46)/42'0"
4)भिलवडी पूल -(53)39'10"
5)आयर्विन- (45)/36'06"
6)राजापूर बंधारा-(58)/47'10"
7) राजाराम बंधारा-(43)/44'09"

*पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)*
1) कृष्णा पूल कराड- 69993
2) आयर्विन पूल - 81797
3) राजापूर बंधारा - 177500
4) राजाराम बंधारा - 64135
5) कोयनाधरण- 81.20 TMC/32100
6)वारणा धरण- 30.53 TMC/ 15785
7)अलमट्टी धरण- 83.486
आवक - 204098
जावक-275000

25/07/2024

*कोयना धरण*

आज दि. २५ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ५ वा. धरणामध्ये एकूण ७८.२९ टीएमसी ७४.३८ % पाणीसाठा झाला आहे.

*सद्यस्थितीत सांडव्यावरून १०००० विसर्ग चालू आहे.* तथापि, पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू असल्याने येव्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी *आज संध्याकाळी ७:०० वा. सांडव्यावरून सोडणेत आलेल्या विसर्गात वाढ करून २०००० क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल.*

धरण पायथा विद्युत गृहामधील १०५० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग २१०५० क्युसेक्स असेल.

*कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.*

Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Shiv Meridian
Sangli
416416