22/04/2023
डायरेक्ट*जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर सिटीचा शपथ विधी संपन्न*
तारीख :- 15/०4/2023
कार्यक्रम:- नूतन अध्यक्ष व कार्यकारीणि शपथविधी सोहळा.
जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर सिटी ग्रुपचा शपथविधी सोहळा कोल्हापुर येथील हॅाटेल रामकृष्ण येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यासाठी जा.वे. फाउंडेशन केंद्रीय समिती सदस्य मा.श्री.प्रमोदजी शहा ,जा.वे. फाउंडेशन विशेष समिती सदस्य सौ.मंगलाताई कुलकर्णी, फेडरेशन चे माजी अध्यक्ष ॲड.रविंद्र नागवेकर ,डॉ. राजकुमार पोळ, फेड. उपाध्यक्ष श्री. रामदास रेवणकर ,फेड.पी.आर.ओ सौ. मंदाकिनी साखरे, , जा.वे. फाउंडेशनचे स्पे.ॲाफिसर डॉ. शरदचंद्र दिवाण ,फेड.डायरेक्टर श्री. सुरेश खांडेकर , फेड.ॲाफिसर डॉ. आशा शितोळे ,सौ.सुषमा पोळ, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शपथविधी व पदग्रहण सोहळा पार पडला.
सर्वप्रथम दीप प्रज्वलन व प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर सर्वाचे स्वागत व ओळख करून देणेत आली. नंतर माजी अध्यक्षा श्री.प्रकाश वर्णे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री.सुरेश खांडैकर यांनी नवीन सभासद, नवीन कार्यकारिणी आणि नवीन अध्यक्ष यांना शपथ दिली. नूतन अध्यक्ष श्री.किशोर बेर्डे .यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर श्री.रामदास रेवणकर ,सौ.मंगला कुलकर्णी .ॲढ.रविंद्र नागवेकर ,डॉ.राजकुमार पोळ या सर्व पाहुण्यानी थोडक्यात मोलाचे मार्गदर्शन केले. सिटी ग्रुपच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी केलेल्या17 माजी अध्यक्षंचा सत्कार मान्यवरांचे शुभहस्ते करणेत आला.यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय समिती सदस्य मा.श्री.प्रमोदजी शहा यानी जायंटस् चळवळीचे महत्व ,फेलोशीप,सिटी ग्रुपची यशस्वी वाटचाल आढावा ,ग्रुपची यशस्वी वाटचाल व अपेक्षा यावर मनोगत व्यक्त केले.
सौ.नयना बडकर यांनी उत्कृष्ठ सूत्रसंचालन केले .तर श्री. सुभाष भाट सिटी ग्रुप उपाध्यक्ष यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने व स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.आणि हा कार्यक्रम सर्वांच्या सहभागाने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
22/04/2023
आज दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवरागिणी ग्रुप कडून राजारामपुरी येथील महिलांसाठी चैत्र गौरीचे हळदीकुंकू आणि कुंकूमार्चन कार्यक्रम ठेवला होता यावेळी ग्रुपचे अध्यक्ष कुमारी तेजस्वी पार्टे उपाध्यक्ष सौ पूजा भोसले कार्यवाह सौ रूपाली तोडकर खजिनदार सौ मीना शिंदे आयपीपी सौ शितल पंदारे सदस्य सो प्राजक्ता प्रधान तसेच प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या🙏🏻
22/04/2023
जायंटस् ग्रुप ऑफ सातारा सहेली च्या वतीने रमजान महिन्याचे निमित्ताने गुरुवार परज येथील मज्जिदच्या बाहेर रोजे सुटल्यानंतर रोजदार व येणाऱ्या जाणाऱ्यांना सरबत चे वाटप. रमजान पवित्र महिन्याच्या निमित्ताने रोजे सुटल्यानंतर सातारा सहेलीच्या वतीने ४०० रोजेदार व नागरिकांना सरबत चे वाटप करण्यात आले .. यावेळी उपक्रम यशस्वी करण्यासाठी जायंटस् ग्रुप ऑफ सातारा सहेली च्या अध्यक्षा सौ.अंजना जठार,उपाध्यक्ष सौ नयना कांबळे,,खजिनदार सौ नीलिमा भिंताडे, कॉर्डिनेटर सौ.श्रद्धा सावंत, सदस्या , निशा जाधव मॅडम उपस्थित होत्या..
22/04/2023
आज दिनांक 21 एप्रिल 2023 मुस्लिम बांधवांचे पवित्र रोजे सुरू आहेत आज शेवटचा रोजा निमित्त जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवरागिणी *ग्रुप कडून कोल्हापूर येथील *बाबूजमाल दर्गा येथे रोजा सुटल्यानंतर तेथील मुस्लिम बांधव आणि भगिनींसाठी ठेवलेल्या रोजा रफ्तार पार्टीमध्ये खाऊच्या पॅकेट चे वाटप करण्यात आले तसेच दर्ग्याबाहेर बसलेल्या लहान मुलांसाठी टी-शर्ट चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये फेडरेशन ऑफिसर श्री प्रकाश क्षीरसागर सर ग्रुपच्या अध्यक्षा कुमारी तेजस्वी पार्टे उपाध्यक्ष सौ संगीता खाडे कार्यवाहक सौ रुपाली तोडकर खजानिस सौ मीना शिंदे सदस्य सौ प्राजक्ता प्रधान सौ शर्मिला खातू उपस्थित होत्या
125 खाऊचे वाटप करण्यात आले
50 टी-शर्ट - सौ प्राजक्ता प्रधान
खर्च - शिवरागिणी ग्रुप
22/04/2023
'जायन्ट्स ग्रुप ऑफ एकता देशिंग ' या नवीन ग्रुप चा शपथविधी 20 तारखेला गुरुवारी सम्पन्न झाला. सौं अस्मिता सगरे नूतन अध्यक्ष म्हणून शपथ घेतली त्यांना व सर्व कार्यकारणी सदस्य व मेम्बर्स यांना युनिट डायरेक्टर जया जोशी यांनी शपथ दिली सांगली पर्ल या ग्रुप ने हा नवीन ग्रुप दिला पर्ल च्या अध्यक्ष सौं वैशाली कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले पदग्रहण सोहळ्या साठी gwf सेंट्रल कमिटी मेंबर डॉ सतीश बापट स्पेशल कमिटी मेंबर विलास पवार ipp फेडरेशन प्रेसिडेंट गिरीशजी चितळे, फेडरेशन अध्यक्ष 2023विकास पाटील, उपाध्यक्ष अनुजा पाटील, कोओरडनेटर स्नेहल कुलकर्णी, युनिट डायरेक्टर जया जोशी पर्ल अध्यक्ष वैशाली कुलकर्णी हे उपस्थित होते पदाधिकारी नी खूप चांगले मार्गदर्शन केले सर्व ग्रुप चे मेम्बर्स यांनी चांगले काम करण्याचे सांगितले ग्रुप मध्ये अनेक मान्यवर आहेत सभापती कोळेकर मॅडम यांनी आभार मानले बोगार सरांनी सूत्रसंचालन खूप च छान केले
14/04/2023
14 एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या दिनाच्या औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे बिंदू चौक येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व हया ,पेन दान करण्यात आले याप्रसंगी ग्रुपचे अध्यक्ष श्रीयुत एल डी कांबळे साहेब ग्रुपचे कोऑर्डिनेटर तानाजी पाटील साहेब आय पी पी चंद्रकांत लोहार साहेब युनिट डायरेक्टर प्रा. डॉ.एम ए शिंदे श्री सुभाष सूर्यवंशी साहेब व ग्रुपचे पी आ र ओ शहाजी नलवडे साहेब आदी उपस्थित होते🌹
03/04/2023
हरिपूर येथे युनिट्स.. 2 , 3 , 10
ची मल्टी pre unit council meeting अतिशय सुंदर रीतीने .. उत्साहात संपन्न झाली.
जया जोशी , सुनिता शेरिकर आणि सुधिर ( भैय्या) कुलकर्णी तीनही डायरेक्टर्स चे अभिनंदन...
आयोजक ग्रुप्स.. सांगली Pearl , प्रेरणा सहेली , दुर्गा सहेली या ग्रुप चे ही अभिनंदन💐💐
मान्यवरांचे मार्गदर्शन खूप छान ..
शेरीकर मॅडम आणि बालाजी garment चे विशेष आभार...🙏
03/04/2023
आज युनिट क्रमांक आठ व नऊ या दोघांची प्रि मल्टी युनिट कौन्सिल अतिशय सुंदर व खेळीेमे ळीच्या च्या वातावरणात पार पडली. प्रथमता मीटिंग कॉल टू ऑर्डर युनिट 8 चे डायरेक्टर प्रा. डॉ. एम ए शिंदे व युनिट 9 चे युनिट डायरेक्टर खांडेकर साहेब यांनी केली . या कौन्सिलचे सभा वृत्तांत लिहिण्यासाठी कोल्हापूर पर्ल ग्रुपचे श्री रवींद्र मेस्त्री यांची कार्यवाह म्हणून करण्यात आली स्वागत प्रास्ताविक कौन्सिलचे आयोजक कोल्हापूर ग्रुपचे अध्यक्ष श्री एल डी कांबळे यांनी केले तदनंतर उपस्थित सर्वांचे ओळख करून घेण्यात आली .ओपनिंग रिमार्क युनिट डायरेक्टर प्रा.डॉ.एम ए.शिंदे यांनी दिला व त्यांनी कौन्सिलच्या आयोजना मागचा हेतू स्पष्ट केला . या नंतर युनिट क्रमांक 8 व 9 मधील युनिट डायरेक्टरनी नियुक्ती केलेल्या युनिट ऑफिसर व फॉर्मर पा स्ट प्रेसिडेंट फोरम इन्चार्ज यांना त्यांचे नियुक्तीपत्रे देण्यात आली . प्रथमता माजी अध्यक्ष फोर म बाबत व इतर माहिती शरदचंद्र दिवाण साहेब यांनी सुंदरमाहिती दिली ग्रुपच्या पी आर ओ व कोऑर्डिनेटर बाबतची माहिती सौ मंदाकिनी साखरे मॅडम यांनी दिली. त्यानंतर ग्रुपचे उपाध्यक्ष बाबतची माहिती माधुरी चौगुले मॅडम यांनी दिली तर ग्रुपचे कार्य वाह व खजिनदार यांच्याबाबतची माहिती रामदास रेवण कर साहेब यांनी आणि ग्रुपचे अध्यक्ष बाबत तसेच सहेली सिंपोजियम आणि अवॉर्ड बिडिंग बाबतची माहिती व मार्गदर्शन सौ मंगलाताई कुलकर्णी मॅडम यांनी केले. उपरोक्त मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थित सर्वांना फेडरेशन ऑफिसर्स डॉक्टर सौ आशा शितोळे मॅडम सुरेखा गुप्ते मॅडम सौ बबीता जाधव मॅडम सौ सौ नंदिनी कलाल मॅडम साउथ प्रकाश वरणे आदींनी आपापला पोर्टपोलिओ समजावून सांगितला मिनिट डायरेक्टर संयुक्त सुरेश विजय खांडेकर साहेब यांनी क्लोजिंग रि मार्क देऊन कौन्सिल यशस्वी झाल्याचे सांगितले शेवटी आभार या कौन्सिलचे दुसरे आयोजक कोल्हापूर सहेलि ग्रुपच्या अध्यक्ष सौ.गायकवाड मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले या संपूर्ण कौन्सिल मीटिंग चे सूत्रसंचालन कोल्हापूर ग्रुप चे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सल्लागार श्री प्रकाश क्षीरसागर साहेब यांनी केले या संपूर्ण प्रि मल्टी युनिट कौन्सिल मध्ये युनिट क्रमांक आठ व युनिट क्रमांक नऊ मधील एकूण 12 ग्रुपचे पदाधिकारी फेडरेशन 2 क चे कौन्सिल मेंबर्स असे एकूण 74 जन उपस्थित होते शेवटी अल्पोपहार व चहापान नंतर वंदे मातरम म्हणून कौन्सिलची सांगता झाली 🙏🙏🙏🙏🙏🙏
28/03/2023
आज मंगळवार दि .21 मार्च2023 रोजी गुढी पाडव्या निमीत्त सिटी ग्रुप कोल्हापूर व वर्णेज फार्मा यांचे विद्यमाने भव्य रक्तदान ,मोफत नेत्र तपासणी,सवलती मध्ये चष्मे,औषधै व बी .पी. शुगर ,थॅाईराईड तपासणी चे भव्य शिबीराचे आयोजन केले होते.यावेळी उपस्थित मान्यवर 🪷श्री.राहूल चिकोडे,अध्यक्ष, भाजपा कोल्हापूर शहर,🪷यूवा नेते आप्पा लाड,🪷श्री.सुरेश खांडेकर,फेड डायरेक्टर,🪷श्री.डॅा.शरदचंद्र दिवाण,स्पे ॲाफिसर 🪷सौ.डॉ. आशा शिरोळे, फेड.ॲाफिसर🪷श्री.प्रकाश वर्णे, फेड. ॲाफिसर फेड 2क, 🪷श्री.संदिप कुंभार, अध्यक्ष शिव समर्थ ग्रुप,🪷श्री.किशोर बेर्डे,अध्यक्ष,🪷श्री.सुभाष,भाट,उपाध्यक्ष 🪷सौ.शकुतंला मोरे, कार्यवाह 🪷श्री.उदय माळी,खजानिस,श्री.सुधाकर पाटील ,सदस्य वगैरे सिटी ग्रुप पदाधिकारी उपस्थित होते.🎷🎷🎷🎷🎷रक्तदान शिबीर साठी 🌸वैभवलक्ष्मी ब्लड बँक, कोपूर,सर्व तपासणी साठी 🌸महालॅब कणेरी,🌸ओम हॉस्पिटल, व 🌸युवा ग्रामीण संस्था यांनी काम पाहीले.यावेळी एकूण रक्तदान 30 झाले.तसेच सीबीसी,थॅाईराईड, बी.पी शुगर व नेत्र तपासणी 50 रूग्णांची करणेत आली. सर्वांना अल्पोपहार व चहापान होवून शिबीराची सांगता झाली.या शिबीराचे सर्व नियोजन वर्णेज फार्मा यांचेवतीने करणेत आले.
28/03/2023
काल गुढीपाडव्याच्या निमित्त सांगलीत झालेल्या स्वागतयात्रे मद्ये जायन्ट्स ग्रुप ऑफ सांगली पर्ल तर्फे सर्व लोकांना शिरा वाटप करण्यात आले सर्वजनी शोभा यात्रे मध्ये सामील होऊन सर्वांना मदत करीत होत्या प्रेसिडेंट वैशाली कुलकर्णी, जया जोशी, तन्वी कुलकर्णी रेखा माळी अनिता पवार अक्षदा यादव, सरिता शेटे उषा पाटील अदिती बर्वे अनुराधा बापट, व यंग जायन्ट्स च्या सायली यादव सहित यंग जायन्ट्स ची मुले ही सामील झाली होती
28/03/2023
जायंटस् ग्रुप ऑफ सांगली सेंट्रल
काल दिनांक २२/३/२०२३ बुधवार गुढीपाडव्या निमित्त निघालेल्या शोभायात्रेत आम्ही सहभागी झालो . आयोजकांनी आपल्याला लहान टेंपो उपलब्ध करून दिली होती. टेंपो भोवती जायंटस् ग्रुप ऑफ सांगली सेंट्रल चे बॅनर लावून शोभायात्रेत सहभागी झालो.
राजमती ग्राउंड नेमीनाथ नगर सांगली येथून पूजा करून शोभायात्रा सुरुवात झाली. शोभायात्रा मार्ग राजमती ग्राउंड पासून विश्रामबाग स्टेट बॅंके पर्यंत. परत स्टेट बॅंके पासून हनुमान हाॅटेलच्या पुढच्या गल्लीतून विश्रामबाग चौकात शोभायात्रा समाप्त झाली
विविध खेळांचे प्रदर्शन व भारतमाता पूजनाने शोभायात्रेचा समारोप झाला
या शोभायात्रेत सहभागी होऊन पाणी वाटप केले
जायंटस् ग्रुप ऑफ सांगली सेंट्रल चे पदाधिकारी सभासद सहभागी झाले
श्री हसन समलेवाले , श्री सुबोध पाटील , श्री भालचंद्र लिमये,श्री परागेश जोशी श्री आंनदराव जाधव, अॅड प्रकाश पाटील, श्री शैलेश करमरकर
28/03/2023
मोफत HPV- Vaccination camp: 🌹🌹🌹
जायंट्स गृप आॅफ कोल्हापूर शिव समर्थ , यशोमंगल चॅरिटेबल टॢसट, पिंक इंडिया, Cancer Prevention Association, यांच्या संयुक्त विद्यमान ने दिनांक 25 March 2023 रोजी Kolhapur Medical Association Hall मध्ये WHO 2023 Theme , 'Health For All याला अनुरूप वय 10 ते20 या वयोगटातील मुलींना Cervical Cancer होऊ नये म्हणू न ( Preventive measure ) मोफत HPV ,vaccination
Camp organized .केला होता. या मध्ये 10 ते 20 वषें वयोगटातील 300 मुलींना हे vaccine मोफत देण्यात आले. या मध्ये 30 मुली अंधशाळेतील होत्या. यावेळी Cancer Association Incharge धनंजया सारानाथ ,डॉ राधिका जोशी ,शिवसमर्थ ग्रुपच्या फेडरेशन ऑफिसर डॉ आशा शितोळे मॅडम अध्यक्ष संदीप कुंभार आणि इतर सदस्य उपस्थित होते 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹