15/08/2023
'इस तानाशाह सरकार के खिलाफ सड़क पर आओ, मैं साथ हूं', CJI चंद्रचूड़ ने ऐसा कब कहा? “हम लोग अपनी तरफ से पूरी कोशिश कर रहे हैं भारत के संविधान, भारत के लोकतंत्र को बचाने की. लेकिन आप सबका सहयोग भी इसके ल...
it's,about motivation,politics,social,& true facts
15/08/2023
'इस तानाशाह सरकार के खिलाफ सड़क पर आओ, मैं साथ हूं', CJI चंद्रचूड़ ने ऐसा कब कहा? “हम लोग अपनी तरफ से पूरी कोशिश कर रहे हैं भारत के संविधान, भारत के लोकतंत्र को बचाने की. लेकिन आप सबका सहयोग भी इसके ल...
15/05/2023
सकाळ चे पत्रकार शैलेश पेठकर यांनी सध्या सांगली जिह्यातील गुहेगारी संबंधित वस्तुस्थिती सकाळ वृत्तपत्रातून मांडली आहे.
आता तरी पोलीस अधीक्षक सांगली यांनी गांभीर्याने लक्ष घालून वाढत्या गुन्हेगारीला चाप बसवणे अत्यंत आवश्यक आहे.
सर्व सामान्य जनतेचे वावरणे अत्यंत मुश्किल झाले आहे, किशोरवयीन,युवा वर्ग नशेच्या आहारी जात आहे,
नशेची तलप भागीवण्या करिता लागणार्या पैश्या करिता
चोऱ्या, माऱ्या, दरोडे,खंडण्या,प्रसंगी खून इतके गंभीर गुन्हे केले जात आहेत, नुकतीच मिसरूड फुटलेली पोरे टोळके बनवून दादागिरी करत आहेत.हे सर्व पोलीस प्रशासनाला फाट्यावर मारून बिनधास्त केले जात आहे विशेष.
त्यामुळे फक्त पोलीस अधीक्षक यांनीच नाही तर सर्वच पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी अश्या टोळक्यानां, गाव गुंडांना पोलिसी खाक्या दाखवून सर्व सामान्य जनतेस दिलासा देने गरजेचे आहे.
24/01/2023
फायनांस कंपन्यांची मुजोरी.......त्यांना पाठीशी घालणारे प्रशासन.......हे कुठे तरी आता थांबायलाच हवे.
यायला लागतंय.…..
२६ जानेवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली समोर #धरणे आंदोलन.
*बेकायदेशीर पणे कर्जदाराची संपत्ती जप्त करणे.
*बेकायदेशीर पणे कर्जदाराची मालवाहतूक वाहने जप्त करणे,व परस्पर त्याची विल्हेवाट लावणे.
*बेकायदेशीर पणे कर्जदारास वारंवार फोन करून मानसिक त्रास देणे, थकीत हफत्या साठी कर्जदारच्या घरात वसुलीच्या नावाखाली दोघे-चौघे जाऊन ठाण मांडून बसणे व कर्जदारच्या संपूर्ण कुटुंबास वेठीस धरणे.
जसे कर्ज देताना सर्व कागदोपत्री प्रक्रिया पार पाडून कर्ज दिले जाते तसे थकीत कर्जाच्या वसुली साठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने कायदेशीर प्रक्रियेनेच कर्ज वसूल करण्याचे आदेश यांना देऊन सुद्धा सर्व कायदे धाब्यावर बसवून बेकायदेशीर कर्ज वसुलीची प्रक्रिया राबवून कर्जदारास व त्याच्या कुटुंबास देशोधडीला लावले जात आहे.
एखाद्या कर्जदाराने यांचे विरोधात प्रशासनाकडे तक्रार केल्यास, त्या कर्जदाराची प्रशासनाकडून दाद घेतली जात नाही व स्वतःच गुन्हेगार असल्या प्रमाणे कर्जदारास नाहक, अवास्तव चौकशी च्या फेऱ्यात अडकवून त्याची प्रशासनाकडूनच पिळवणूक केली जाती.
थोडक्यात आरोपी मोकाट व कर्जदार मात्र अवास्तव यांच्या धाकात अशी परिस्थिती आहे.
01/01/2023
आयुष्यभराच्या अमूल्य #बंधनात बंधत असताना, या अविस्मरणीय सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका सुद्धा
#बंधनंम मधीलच हव्यात.......येताय ना मग.
लग्नपत्रिकांचे #अफलातून नमुने............
४ रु पासून 200 रु च्या वेगवेगळ्या नमुन्यांच्या प्रत्येकाच्या मागणी नुसार, बजेट नुसार लग्नपत्रिका उपलब्ध.
बंधनम कार्ड्स, सांगली.
गुजराती हायस्कुल समोर, रेनॉल्ट शोरूम शेजारी, वखार भाग सांगली. संपर्क - 8983539295
24/12/2022
नोकरीच्या मागे लागण्या पेक्षा, शासनाच्या अश्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होणे हीच काळाची गरज आहे हे ओळखून तरुणानी स्वतःचे व्यवसाय सुरू करून स्वतःचा आर्थिक उत्कर्ष साधावा.
24/12/2022
23/12/2022
घाबरू नका......चीन मधील कोरोनाबाबतचे खरी वस्तुस्थिती ABP माझा ने चीन मधील भारतीय डॉ.अचल श्रीखंडे यांचे शी सवांद साधून प्रकाशात आणली आहे.
तरी TRP साठी व काही राजकीय लोकांचे व काही मूठभर व्यसायिकांचे भले करण्यासाठी माध्यमे अतिरंजित बातम्या दाखवून जनतेस वेठीस धरत आहेत.
China: ना सरकारी कार्यालयं ना बाजार बंद, चीनमधील कोरोनाच्या बातम्या अतिरंजित आणि चुकीच्या; डॉ. अचल श्रीखंडे यांचा चीनमधून संवाद - https://marathi.abplive.com/news/india/china-corona-live-updates-dr-achal-shrikhande-on-china-coronavirus-situation-covid-deaths-to-abp-majha-1132793
*An Indian Doctor straight from.China is saying , the news spread on Twitter and news channels with respect to Covid situation are exaggerated and wrong*
Pls forward to public at large to avoid any panic and financial loss
*कृपया लोकांनी घाबरून जाऊ नये.*
*चीनमधील कोरोनाच्या बातम्या अतिरंजित आणि चुकीच्या; डॉ. अचल श्रीखंडे यांचा चीनमधून संवाद.*
*धीराने घ्या. घाबरु नका*
संकलन - डॉ. अशोक सोनवणे.
नाशिक. 98813 30508
साभार - राहुल कुलकर्णी.
ABP माझा.
22 डिसेंबर 2022.
https://youtu.be/0Zfgkk8-6hA
.. डॉ. रवि गोडसे.
*चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी काळजीची परिस्थिती नाही, सर्वकाही नॉर्मल असल्याची माहिती डॉ. अचल श्रीखंडे यांनी 'एबीपी माझा'ला दिली. शांघाय: चीनमध्ये पुन्हा एकदा उद्रेक होत असल्याच्या बातम्या येत आहेत. जगभरातल्या माध्यमांमधून येत असलेल्या या बातम्यांमुळे भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा आपण दोन वर्षापूर्वीच्या स्थितीकडे परत जातोय की काय अशीही चर्चा होताना दिसतेय. पण चीनमधील जे काही चित्र आपल्यासमोर उभं केलं जात आहे ते वास्तविक नाही, चीनमध्ये तशी काहीच गंभीर आणि काळजीची परिस्थिती नाही असं डॉ. अचल श्रीखंडे यांनी एबीपी माझाला सांगितलं. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. डॉ. अचल श्रीखंडे हे सध्या चीनमधील शांघाय येथे आहेत.*
कोविड हा आपल्यासोबत राहणारच आहे, तो पूर्णता नष्ट होणार नाही. कोविड आता संसर्गजन्य रोग बनला असून तो सगळ्यांनाच होईल. सध्या चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पण त्याची काही काळजी करण्यासारखं नाही असं डॉ. अचल श्रीखंडे यांनी म्हटंलं.
गंभीर आणि चिंताजनक परिस्थिती नाही...
डॉ. अचल श्रीखंडे चीनमधील वास्तविक परिस्थितीची माहिती देताना म्हणाले की, "चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे हे खरं आहे. परंतु त्यामुळे चिंताजनक स्थिती कुठेही नाही. आम्ही डॉक्टर खुश आहोत. आम्हाला किमान कोरोनाचे रुग्ण तपासता येत आहे. लोक खूष आहेत. त्यांना सततची सक्ती होती ती दूर झाली आहे. जगभरात दाखवण्यात येतंय तशी काही परिस्थिती चीनमध्ये नाही. चीनमध्ये पसरणारा व्हेरियंट हा ओमिक्रॉन आहे. तो वेगाने पसरतो आहे, परंतु अतिशय माईल्ड आहे. तीन दिवसांच्या उपचारानंतर सर्व वयोगटातील लोक बरे होत आहेत. केवळ दोन गोळ्या आम्ही देत आहोत."
ऑक्सिजनची कमतरता नाही, हॉस्पिटल भरलेली नाहीत.
शांघायचा विचार करायचं झालं तर बहुसंख्य रुग्ण हे असिमटॅमीक आहेत असं डॉ. अचल श्रीखंडे म्हणाले. ते म्हणाले की, "चीनमध्ये भारतीय वंशाचे डॉक्टर किंवा मराठी बोलणारे मंडळीपैकी कुणीही भयंकर स्थिती असल्याचं मला सांगितलं नाही. मी ज्या अंतरराष्ट्रीय रुग्णालयांमध्ये काम करतो तिथेही अशी स्थिती नाही. रूग्णालयं रुग्णांनी भरली नाहीत. या ठिकाणी ॲाक्सिजनचीही कमतरता नाही. लोकांना व्हेंटिलेशनवर जाण्याची गरज पडत नाही. मृत्यूदर हा अत्यंत कमी असून तो केवळ 60 वर्षानंतरच्या काही रुग्णांमध्ये आढळतो."
चीनमध्ये लोक रस्त्यांवर मोकळे फिरतायत, आनंद घेतायत
जगभरात दाखवलं जातंय तशी परिस्थिती चीनमध्ये आजिबात नसल्याचं सांगत डॉ. अखंड अचल म्हणाले की, चीनमधील क्वारंटाईन सेंटर्स बंद करण्यात आली आहेत. ज्यांना कोरोनाची लक्षणं आहेत त्यांना सात दिवसांसाठी घरातच रहावं लागतं. झीरो कोविड पॉलिसी मागे घेतल्याने लोक रस्त्यांवर मोकळे फिरत आहेत, मॉल्समध्ये जात आहेत आणि आनंद घेत आहेत. कोणीही कशाही पद्धतीच्या चिंतेमध्ये नाहीत.
चीनमध्ये रुग्णांचं लक्षणं काय आहेत?
डोकं दुखणं, नंतर ताप येणं ही सर्वसामान्य लक्षणं चीनमधील लोकांमध्ये असल्याचं डॉ. अचल श्रीखंडे यांनी सांगितलं. मग त्यावर पॅरासिटॉमल देणं हाच उपचार करण्यात येतोय. तीन दिवसांपर्यंत लोक बरं होतात. सातव्या दिवशी पुन्हा कोरोना चाचणी केली जाते आणि तो व्यक्ती कामावर परतू शकतो अशी माहिती त्यांनी दिली.
देशातील दोन स्वदेशी कोरोना लसींना प्राधान्य दिले जात आहेत, त्याचा बुस्टर डोसही देण्यात आला आहे अशी माहिती डॉ. अचल श्रीखंडे यांनी दिली.
भारतीयांनी आजिबात चिंता व्यक्त करु नये.
चीनमध्ये असलेला व्हेरियंट हा ओमिक्रॉन असल्याची माहिती डॉ. अचल श्रीखंडे यांनी दिली. त्याच्या तुलनेत अधिक प्रभावी असलेल्या डेल्टा व्हेरियंटमधून भारतीय नागरिक गेले आहेत. त्यामुळे कोरोनाबद्दल चिंता करण्याचं कारण नसल्याचं ते म्हणाले. डॉ. अचल श्रीखंडे म्हणाले की, कोविडमुळे चीनमध्ये मृत्यूचं थैमान सुरू आहे अशा आशयाच्या बातम्या चुकीच्या आहेत. भारतीयांनीही त्याची काळजी करण्याची गरज नाही.
ना सरकारी कार्यालय बंद, ना बाजार बंद
आम्ही सगळे डॉक्टर्स यासाठी तयार होतो, रुग्णालय तयार होती. हा नॉर्मल फ्लू आहे. रुग्णाला व्हेंटिलेशनची गरज पडत नाही. त्यामुळे आम्ही याला अतिशय नॉर्मली ट्रीट करत आहोत. एक ते दोन दिवसांमध्ये रुग्ण घरी परत जातो आहे. बहुसंख्य रुग्ण तर रुग्णालयात येतच नाहीत. त्यांना कंपल्सरी सात दिवस घरी थांबायचे आहे. कुठेही काहीही बंद करण्यात आलेलं नाही. ना शाळा बंद आहेत, ना सरकारी कार्यालय बंद आहेत, ना बाजार बंद आहे.
*संकलन - डॉ अशोक सोनवणे. सिन्नर, नाशिक. 9881330508*
*22 डिसेंबर 2022.*
चीनमधील कोरोनाच्या बातम्या अतिरंजित आणि चुकीच्या; डॉ. अचल श्रीखंडे यांचा चीनमधून संवाद China Corona Updates: चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी काळजीची परिस्थिती नाही, सर्वकाही नॉर्मल असल्याची माहिती डॉ...
02/12/2022
शासकीय/निमशासकीय कार्यालयातील भारतीय दंड संहिता १८६० च्या कलमांचे अनधिकृत बेकायदेशीररित्या लावलेले फलक काढणेबाबत....
आज दि.०२/१२/२०२२ रोजी मा.निवासी उपजिल्हाधिकारीसो, सांगली यांना समक्ष भेटून यवतमाळ निवासी उपजिल्हाधिकारीसो श्री.लालतिकुमार वऱ्हाडे यांनी दि.२१/११/२०२२ रोजी यवतमाळ जिह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील भारतीय दंड संहिता १८६० च्या सेक्शनचे अनधिकृत बेकायदेशीररित्या लावलेले फलक काढणेबाबत केलेल्या आदेशान्वये मा.निवासी उप जिल्हाधिकारीसो यांनी सुद्धा असे कायदेशीर आदेश सांगली जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यलयाना पारित करावेत या विषयांतर्गत निवेदन दिले.
सदर निवेदन देत असताना तब्बल ३० मिनिटे मा.निवासी उपजिल्हाधिकारीसो यांचेशी चर्चा झाली सदर चर्चे दरम्यान सदर फलकाचा वापर करून शासकीय कार्यलयात कामा निमित्त येणाऱ्या सर्वसामान्य नागरींना काही कामचुकार/भ्रष्ट अधिकारी,कर्मचारी फोउजदारी गुन्ह्याच्या दहशती खाली ठेवतात व स्वतःची मनमानी करतात यांचे उदाहरणा सहित वस्तुस्थिती मांडली.
तसेच सदर फलक काढण्याचे आदेश आपण देऊ शकत नसाल तर भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत शासकीय कार्यालयातील लोक सेवकांनी कर्तव्यात कसूर केल्यास, नागरिकांची कामे कायदेशीर पद्धतिने पार न पाडल्यास, नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्यास, शासकीय कागद पत्रांची हेराफेरी करून भ्रष्टाचार केल्यास त्यांचेवर दाखल करण्यात येणाऱ्या फोजदारी गुन्ह्याचे सुद्धा फलक शासकीय कार्यलयात दर्शनी भागात लावावेत जेणे करून सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याची माहिती होईल व अश्या कामचुकार, कर्तव्यात कसूर करून मनमानी करणाऱ्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचेवर चाप बसेल अशी मागणी केली.
सदर निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते उदय ओंकार,तोहीद शेख, नितीन पवार, आनंद राव,विजय बोगांने आदी उपस्थित होत.
सदर निवेदन देत असतानाचे छायाचित्र घेण्यास मा.उपनिवासी जिल्हाधिकारीसो यांनी मनाई केली.
(शेवटी तो त्यांचा वैयक्तिक निर्णय व अधिकार आहे)
निवेदना सोबत
१.मा.निवासी उपजिल्हाधिकारीसो यवतमाळ यांनी काढलेल्या आदेशाची प्रत जोडली आहे.
२.सदर फलकां बाबत कोणतही माहिती अभिलेखावर उपलब्ध नसले बाबत सांगली मिरज कुपवाड महानगर पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीची प्रत जोडली आहे.