khatatop

khatatop

Share

नमस्कार, खटाटोप हा नवनवीन विषयांवर नवनवीन माध्यमातून पोहचवण्याचा

28/09/2023

प्रत्येकाने ऐकावी अशी विचारांची दिवाण-घेवाण ...... नक्की ऐका आणि कळवा कशी वाटली ते.

28/09/2023

Khatatop

28/09/2023

28/09/2023
21/06/2023

POST 5
एकीचे बळ
#एकता

Photos from khatatop's post 21/06/2023

POST 4 - 31 July 2021
#ध्येय

21/06/2023

POST 3
#प्रवास
मला अनेकदा वाटतं, आपलं आयुष्य हा एक प्रवास आहे, मला स्वतः ला तसं जाणवत म्हणून सुद्धा असेल कदाचित, पण वाटतं. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रवासाला त्यात ठरवलेल्या मार्गाना आपआपली अशी वैयक्तिक कारणं असतात मग तस कारण आपल्या आयुष्याच्या प्रवासाला नसावं का??
जरी असलं तरी आपण कुठे जायचं ,कसं जायचं हे ठरवू शकतो पण जाताना वाटेत काय मिळेल हे ठरवू शकत नाही तसंच आयुष्याच्या प्रवासात अनेक गोष्टी आपल्याला हव्या हव्या वाटणार्या येतात तर काही अगदी नको वाटणार्या स्वतःची परिक्षा घेणार्या सुद्धा असतात/येतात, मग ती माणसं असोत वा प्रसंग.
यात आपण निसर्गाच अनुकरण नक्कीच करू शकतो,जस निसर्ग त्याच्या ॠतूमानानुसार काम करत असतो ,त्यात बदल घडवतो तसा काही वेळेला बदल सुद्धा अपेक्षित असतात. आपल्याला अनेकदा वाचायला मिळतं की प्रत्येकजण स्वतःच्या 'टाईम झोन'नुसार काम करत असतो पण आपण मात्र दुसर्याबरोबर तुलना करून निराश अथवा सुखावतं असतो पण आपण हे विसरतो आपली स्पर्धा आपल्याशीच आहे. मग जस आपण बस मध्ये भेटलेल्या सहप्रवाशाबरोबर बोलतो, जी आत्मियता निर्माण होते मग ती अगदी थोड्या काळापुरती का असेना. तरीही त्या व्यक्तीचा थांबा आला की तिला जावंच लागत तसंच आपल्या आयुष्यात आशा अनेक गोष्टी येतात ज्या आपल्याला हव्या हव्याशा वाटायला लागतात, मग त्या आपल्यासोबत आयुष्यभर असाव्या असं वाटतं नि मग आपण त्या गोष्टी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो नि अधिक गुंता गुंतीच्या करतो, यामागच काही आठवतं असेल तर बघूया या आधीसुद्धा आपण अशा जवळच्या खूप खास वाटतं असणार्या गोष्टी, काही कारणांमुळे,परिस्थितीमुळे किंवा अजून कशामुळे मागे सोडून आलो आहोत पण तरी आपल्या आयुष्याचा प्रवास थांबला आहे का मग ते कसंही नि काहीही असो. मग आता यापुढे सुद्धा ते तितक्याच मनमोकळेपणाने सोडून देता यायला हवं. आपण अनेकदा वाचतो की वाळू हातात पकडली तर ती हळू हळू हातातून निसटतेच तसंच आणि तितकाच आपण जितकं साठवण्याचा, बांधून ठेवण्याचा प्रयत्न करू तितकाच ते निसटून जावून अधिक गुंतागुंतीच होईल नि आपल्या प्रवासातल्या प्रवासाबद्दलच्या तक्रारी वाढतील, नि प्रवास सुखकर होण्याच्या ऐवजी खूप कठीण नि त्रासदायक होईल त्यापेक्षा पुन्हा नवीन सुखकर काहीतरी होईल या आशेवर प्रवास करत राहू ,मागे न फिरता 😊 खूप शुभेच्छा 🤗⚘🌷
- भाग्यश्री वासुदेव पाटील.



चूक भूल द्यावी घ्यावी 🤗

21/06/2023

POST 2
#निरोप
निरोप मुळातच् चांगल्या किंवा वाईट नवीन गोष्टी च रोपण करत असतो आणि म्हणून त्याला निरोप म्हटलं जात असावं हा पण आता हे ज्याच्या त्याच्या वर आहे, काहींच्या आयुष्यात निरोप हा त्यांचा नव्या रोपणाची सुरवात असते काहींच्या आयुष्यात शेवट पण गोष्टी कुठे थांबवायच्या नि कुठे सुरू करायचा हे समजलं की सार काही सोपं होत जातं पण थांबणं नि सुरू करणं हा काय जणू त्या निरोपाचा अलिखित नियमच, जो कुणालाही सुटलेला नाही. मग यात काही गोष्टी सोडून द्याव्या लागतील तर काही सुटून जातील पण काही नव्याने उपजतीलदेखील. आपण आपलं आयुष्य खुप चौकोनी जगत आहोत काही गोष्टी या आशा आहेत, अशाच असणार आहेत याची लेबल लावून पुढे काय होईल यामुळे आज काय होणार आहे, होत आहे याचा विचार न करता ज्या त्या वेळच जगणं मात्र गमावतो नि नंतर मात्र मनमुराद जगण्याच उसण अवसान आणतो, पण हे सगळं का ? कशासाठी आणि कुणासाठी या प्रश्नांना दूर कुठेतरी न परतीच्या वाटेवर सोडून आल्याच्या अर्विरभावात. असं म्हणलं जात निरोप हसतं हसतं द्यावा मग जसं दुखाःला आपण हसत निरोप देवू तसंच सुखाला का देता येत नाही, आपल्याला फक्त आपल्या सोयीच्या वाटणार्या गोष्टींची वाहवा करत नावडत्या गोष्टींना नाक मुरडण्याची सवय लागली असावी जसं एखादी मुलगी नटली थटली की ती सुदंर दिसत आहे हे जितक्या सहजतेने सांगतो नि ती ते सहजतेने स्विकारते आणि सुखावते तसंच एखाद वेळी ती वेगळी, विचित्र दिसत असेल नि ते तीला कोणी सांगितलं तर ति तितक्याच सहजतेन स्विकारेल की दुखावेल तसंच आपल्याला आपल्या आयुष्यात फक्त चांगल्याच नि मनासारख्या गोष्टी घडाव्यात असं वाटतं नि ते नाही झालं तर मात्र आपण आपल्या नशीबाला, वेळेला दोष देत राहतो आताच्या जगण्याला मुकतो, म्हणून आपल्याला आपल्या प्रवासात आलेल्या प्रत्येक फेज ला नीट, मोकळेपणानी स्विकारता नि "निरोप" देता यायला हवा तर जास्त मजा येईल.
-भाग्यश्री वासुदेव पाटील.



चूक भूल द्यावी घ्यावी 🤗

21/06/2023

POST 1
The Bird Story 🤩🤩 13 June 2021
हा किस्सा आहे रविवार सकाळ सकाळ चा नि मला या गोष्टी च इतकं अप्रूप वाटलं कि रविवारी ज्या ज्या लोकांशी बोलले तर फिरून फिरून हाच किस्सा शेअर केला नि आता फक्त इथे लिहणं बाकी होत,😀 तर किस्सा असा रविवारी मी उठले नि बाहेर पक्ष्यांचा खूप किलबिलाट ऐकू येत होता तर माझं सहज लक्ष बाहेर गेलं तर एक पक्षी विजेचा धक्का लागून खाली पडला होता, नि रस्त्यावरचं कुत्र त्या पक्ष्याला खाऊ पहात होतं पण तिथे असलेल्या काही लोकांनी त्याला (कुत्र्याला) हटकलं पण तरी ते कुत्रं पक्ष्याला पकडायला येत होत मग तिथे असलेल्या लोकांनी त्या कुत्र्यांला दगड मारून घालवलं नि ते कुत्र केकाटत तिथून जात होत तर त्या पक्षासोबतचे साथीदार "आता कसं झालं?" या अविर्भावात त्याच्याजवळ जाऊन वर उडून गेले नि या गोष्टी मला नवलंच वाटलं, मग हळू हळू तो पक्षी त्या कट्ट्यावर जाऊन बसला मग त्याचे सोबती येवून त्याला खाऊ घालू लागले, थोडी धक्का बुक्की करून त्याला उडायला भाग पाडत होते मग पक्षी सुद्धा खाली चालून त्या कट्ट्यावर उडून बसायचा प्रयत्न करू लागला नि अस करत करत त्याच्या प्रयत्नांना यश येवून त्याने उंच भरारी🕊🕊 घेतली नि हे सगळं मी बघत होते त्यामुळे मला याच अप्रूप वाटलं 🤗🤗 पण राहून राहून दिवसभर डोक्यात अनेक विचार येत होते आपण माणसं असून आपली संवेदनशिलता कमी झाली आहे का?? कारण आपल्या जवळ अनेकदा काही लोक पडत,धडपडतं असतात पण आपण दुर्लक्ष करून पुढे जातो आणि मला सावरायला कोण नाही यासाठी आपण काही वेळा धडपडण सोडून देतो आणि अजून एक, पक्षी जरं आपल्याला त्रास न देता जगत आहेत तर आपला काय अधिकार आहे त्यांना त्रास देण्याचा, तुम्हाला काय वाटतं??????

29/06/2021

खटाटोपच्या पहिल्या सिरीज च्या दहाव्या भागात सर्वांचे खूप खूप स्वागत 🤝

आजचा भाग माझ्यासाठी खास आहे, कारण या निमित्ताने मला नविन मैत्रिण मिळाली नि तिला खटाटोपमुळे अधिक जाणून घेता आल. आपल्या प्रत्येकाकडे एक वेगळा गुण असतो पण गरज असते ती शोधण्याची. वाचक असणं हि फार मोठी गोष्ट नाही, पण मला वाटतं जी व्यक्ती वाचन आपल्यापुरत न ठेवता सर्वांपर्यंत पोहोचवून त्यांना वाचायला प्रोत्साहन देते, याला जर कलेची जोड मिळाली तर अधिक उत्तम. वाचन हे खरंच खूप ऊर्जा देणारी गोष्ट आहे आणि काही वेळा आपल्याला आपलं आयुष्य नव्यान दृष्टीने जगण्याच निमित्त ठरतं, याबद्दल अधिक जाणून घेवू या आजच्या भागात.

🎙मुलाखतदाती - राजेश्वरी औटी.
BDS, वाचक, 'एकपात्री' कलाकार

🎙 संवादक - भाग्यश्री पाटील.
सामाजिक कार्यकर्ती


🌸 Do Visit Link in Bio

मुलाखत दिनांक - 10/12/2020

सुचनांच स्वागतच आहे नक्की बघा आणि कळवा
धन्यवाद 🙏



Follow Instagram page -








Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Sangli
415409