Nature Conservation Society

Nature Conservation Society

Share

NGO working for the Cause of Environmental Protection and Wild-life Preservation

Group of young enthusiasts and professionals from different backgrounds came together with a definite vision of contributing their bit in Conserving Nature. Work started at the very grassroots level in the form of Wild-animals rescue & rehab, conducting awareness camps at many social places like schools, Colleges, Villages, etc. Over the past 13 years, the organization has evolved as major entity

Photos from Nature Conservation Society's post 28/12/2025


आज शनिवार दि. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी सांगलीतील नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, सांगली (NACONS) आणि Cosmic Eye, सांगली तर्फे आयोजित अवकाश निरीक्षण आणि Digital Detox (डिजिटल उपकरणांपासून घेतलेली विश्रांती) कार्यक्रमाचे आयोजन शहरातील विश्रामबाग परिसरातील विद्यानगर येथील एका इमारतीच्या छतावर केले होते.
सायंकाळी 7 ते 10 असे 3 तास झालेल्या सदर कार्यक्रमात कॉस्मिक आय चे खगोलशास्त्र अभ्यासक श्री.शंकर शेलार सर आणि हौशी खगोलशास्त्र अभ्यासक संजय अष्टेकर यांनी उपस्थित स्थानिक नागरिक, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक यांना खगोलशास्त्राची ओळख करून देताना निसर्गातील आणि अवकाशातील भन्नाट आणि विस्मयकारक गोष्टींचा खजिना उजागर केला. यावेळी शेलार सरांच्या दूरदर्शक दुर्बिणीमधून उपस्थितांना पश्चिम क्षितिजाकडे दिसणारा 143 कोटी किमी दूरचा शनि ग्रह आणि त्याचे चंद्र, तसेच पृथ्वीपासून 59 कोटी किमी दूर असणारा आणि सध्या पूर्वेकडे दिसणारा गुरू ग्रह आणि त्याचे चंद्र, युरेनस ग्रह, देवयानी (Andromeda galaxy) आकाशगंगा, orion nebula (ताऱ्यांचे जन्मस्थान), मृग राशी यांचे सखोल निरीक्षण करता आले. यावेळी शेलार सरांनी उपस्थितांमध्ये खगोलशास्त्र (Astronomy) विषयी असलेल्या अंधश्रद्धा बद्दल उद्बोधन केले. सध्याच्या सामाजिक प्रश्नांपैकी एक बहु चर्चेला जाणारा जटिल प्रश्न म्हणजे लहान मुलांचे आणि तरुणांचे डिजिटल माध्यमांकडे असलेले व्यसन! या तीन तासाच्या कार्यक्रमात सर्वांनी आपापले फोन बंद ठेवले आणि तीन तास पूर्णतः खगोलशास्त्र, त्याविषयीच्या चर्चा, गप्पा आणि निरीक्षणे यामध्ये अतिशय उत्तमरीत्या सर्वांनीच कार्यक्रमाचा आनंद घेतला. शंकर शेलार सरांनी यावेळी अधिकाधिक नागरिकांनी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी NACONS संस्थेचे अरुष जाधव, आदित्य पाटील, अमित काटकर, सांगली पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता श्री अमर सूर्यवंशी, प्रा. दिपाली वळवडे, प्रा. सविता जाधव, आर्किटेक्ट मिलिंद कोष्टी, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
Thanks Shankar Shelar

Photos from Nature Conservation Society's post 11/12/2025

आज सांगलीच्या नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी (NACONS) आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कॉलेज मिरज च्या प्राणीशास्त्र विभाग यांच्यामध्ये MOU सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ. अनिल पाटील सर, प्राणिशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुनील कांबळे सर, वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ.पुंडलिक सुतार सर आणि प्राणीशास्त्र विभागाचे इतर शिक्षकवृंद आणि संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष जमालखान उर्फ तबरेज भैय्या, संस्थेचे खजिनदार अरविंद सोमन, आणि अमोल जाधव उपस्थित होते.

Photos from Nature Conservation Society's post 06/12/2025

आज सकाळी नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी NACONS तर्फे सांगली सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये विद्यामंदिर प्रशाला मिरज शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पक्षीनिरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संस्थेचे सभासद आशिष करंदीकर यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, निसर्गप्रेमी नागरिक आणि हॉस्पिटल मधील डॉक्टर्स यांना पक्षांची माहिती दिली.
तसेच पाठबंधारे कार्यालय परिसर, वारनाली विश्रामबाग येथे सांगलीतील चिंतामणराव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट अँड रिसर्च (CIMDR) च्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी पक्षीनिरीक्षण आणि निसर्गवाचन सहल घेण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये उपस्थित विद्यार्थी जे शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये शिकतात त्याचा सोर्स म्हणजे विविध व्यवस्थापन कौशल्ये ही पक्षीजीवन आणि निसर्गामध्ये कशी बघायला मिळतात यावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे सुखदा कुलकर्णी मॅडम आणि अमोल जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पाटबंधारे विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर श्री अमर सूर्यवंशी सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

Photos from Nature Conservation Society's post 23/11/2025

Today Nature conservation Society Nature Conservation Society conducted Bird monitoring trail in traversing habitats at Bhose Lake, Pandharpur road, Sangli. During study tour, participants observed interspecies and intra species behavior, habitat preference, challenges, opportunities in life of birds.

11/11/2025

Press coverage of Birding trail on occasion of Bir week 2025 by team Nature Conservation Society

09/11/2025

5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर साजरा होणारा पक्षीसप्ताह सांगली शहरातही उत्साहात साजरा.
रविवार 9 नोव्हेंबर रोजी सकाळी सांगलीच्या नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी (NACONS) टीम तर्फे 6व्या राज्यस्तरीय पक्षीसप्ताहानिमित्त सांगलीतील हरिपूर संगम परिसरामध्ये पक्षीनिरीक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेत सांगली, मिरज, कळंबी, भोसे, हरिपूर येथील नागरिक, शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थी अशा 29 जणांनी सहभाग नोंदविला. सदर कार्यशाळेत संस्थेचे अध्यक्ष तबरेज खान, सदस्य अमोल जाधव, आशिष करंदीकर, प्रमोद जगताप, विशाल कुलकर्णी, विशाल कोठावळे यांनी उपस्थितांना पक्ष्यांच्या विविध स्थानिक आणि स्थलांतरित प्रजाती, पक्ष्यांची दिनचर्या, परस्पर संवाद, त्यांचे खाद्य मिळविण्यासाठीचे शारीरिक अनुकूलन आणि त्यानुसार असलेल्या सवयी, पक्षांचे निसर्गातील आणि मानवी जीवनामध्ये त्यांचे असलेले अनन्यसाधारण महत्व, इ. विषयावर माहिती दिली. सदर कार्यशाळेदरम्यान 51 प्रकारचे विविध पक्षी प्रजातिची ebird या संकेतस्थळावर नोंद केली गेली. यामध्ये चिमणी, कावळे, पोपट, मैना, दयाळ, सुभग, राखी बगळा, राखी धनेश, वेडा राघू, हुदहुद, नकल्या खाटिक, ब्राह्मणी घार, नदी सुरय, सातभाई, सूर्यपक्षी इ. स्थानिक प्रजातींसोबत राखाडी धोबी, ब्लीथचा वटवट्या, चातक, तिरचिमणी अशा स्थलांतरित पक्षी प्रजातींची नोंद केली गेली.

05/11/2025

📣📣 सांगलीकरहो, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, सांगली (NACONS) आणि वनविभाग, सांगली संयुक्त विद्यमाने पक्षीसप्ताहानिमित्त आयोजित
पक्षीनिरीक्षण कार्यशाळा🦅
चला, पक्षांच्या सुरेल आवाज आणि निसर्गातील भन्नाट गमती-जमतींच्या निरीक्षणाने मंत्रमुग्ध होऊया.
येत्या रविवारी, 9 नोव्हेंबर रोजी,
सकाळी 7.00 ते 9.00 वा. पर्यंत
*हरिपूर संगम, हरिपूर सांगली* येथे.

Google Map location-: https://maps.app.goo.gl/zuRPS5raB8tsJsFfA

इच्छुकांनी सकाळी ठिक 6.50 वा.

📍 हरिपूर संगम पार्किंग, हरिपूर येथे पोहोचावे.

सदर कार्यक्रम 6 वर्षांवरील सर्वांसाठी मोफत आहे.

*येताना आणावयाचे साहित्य*-:
(असल्यास) दुर्बीण/ कॅमेरा, पाण्याची बाटली, *पायामध्ये बूट असावेत (किमान घोट्यापर्यंत उंच)* आणि निसर्गाशी मिळत्या-जुळत्या रंगाचे कपडे, वही, पेन/पेन्सिल, कोरडा खाऊ, छत्री/रेनकोट, इ.

संपर्क-: अमोल जाधव-: 9921034555
तबरेज खान –: 9881247520

Follow and support 🙏

🌱Website: www.nacons.org

🐾Instagram: https://instagram.com/nacons_ngo?igshid=YmMyMTA2M2Y=

🐯Facebook: https://www.facebook.com/Nacons

🐝Twitter: https://twitter.com/nacons_ngo?s=20&t=7qrdCLKW9h4zf-Mh_FvK1Q

🐍LinkedIn: https://www.linkedin.com/in/nature-conservation-society-nacons-b252b4251

♻️Conserving Nature 🌳
🫱🏼‍🫲🏼Sustaining Life

Photos from Nature Conservation Society's post 27/10/2025

आपल्या नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, सांगली (NACONS) तर्फे नांगोळे मियावाकी घनवन प्रकल्प, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली या ठिकाणी भेट दिली. सदर प्रकल्प पूर्ण होऊन चार वर्ष होत आली. प्रकल्पामध्ये लागवड केलेल्या विविध वनस्पतींची वाढ अगदी उत्तम आहे. सदर घनवन प्रकल्पांमध्ये स्थानिक जैवविविधता भरभराट होते आहे. काही पक्षांची घरटी, काही उडण्यास तयार झालेली पक्ष्यांची पिल्ले, मधमाशांची पोळी आणि सूची–१ मधील काही दुर्मिळ असे वन्यजीव सुद्धा तिथे वास्तव्यास आणि वावर असतो हे सगळे बघून खूप समाधान वाटले. जलबिरादरी टीम, वनविभाग आणि ग्रामस्थांनी छान जपलं आहे जंगल.

09/10/2025

Discovery of Photosynthesis

The Discovery of Photosynthesis ✨🌿

1️⃣ In 1774, Joseph Priestley, a theologian and scientist, carried out a curious experiment: he placed a burning candle and a mouse under a glass container. The candle went out quickly, and the mouse died due to lack of air.

2️⃣ Interested in the result, Priestley repeated the test but added a mint plant inside the container. To his surprise, the candle stayed lit longer, and the mouse survived.

3️⃣ He concluded that plants restored the “spoiled air,” which he called “dephlogisticated air.” In reality, he had just discovered oxygen (O₂).

4️⃣ What he observed was photosynthesis, the process by which plants produce oxygen using light, water, and carbon dioxide.

5️⃣ In 1779, physician and scientist Jan Ingenhousz proved that sunlight was essential to this process. He showed clearly that plants create their own food and release oxygen only in the presence of light.

🌱 These findings were crucial in revealing that plants depend not only on water and soil but also on light to survive and sustain all life on Earth.

02/10/2025

Renowned zoologist, anthropologist and especially a primatologist Dr. Jane Gudall passed away yesterday night. She studied and researched social and family interactions of wild Chimpanzees for more than 60 years and was therefore considered to be world's foremost expert on the topic. She brought the urgent need of conservation of primates to the attention of the world. Wildlife conservationists in African countries are always at the risk of getting assasinated by organised gangs of poachers. Dr. Gudall did not give in to such threats and continued her work. She also authored many research papers and books on the topic. She was the founder of Jane Gudall institute and Roots and shoots, the organisations dedicated to wildlife conservation. She was also appointed as United Nations messanger of peace in the year 2002. She was also honoured with many other prestigious accolades in the world for her extraordinary contribution to the field of wildlife conservation. She was and will be a true inspiration for the nature conservationists all over the world. May her soul rest in peace ! 🙏💐

जगद्विख्यात जीवशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, विशेषतः मर्कट आणि कपी कुळातील प्राण्यांच्या तज्ञ डॉ. जेन गुडाल यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. डॉ. गुडाल यांनी सुमारे ६० वर्षांहून अधिक काळ चिंपांझिंच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाबद्दल सखोल संशोधन केले आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्व जगाला पटवून दिले. आफ्रिकेतील देश हे वन्यजीव संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांच्या हत्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत. या लोकांच्या जीवाला शिकाऱ्यांच्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडून सतत धोका असतो. पण त्यांना न जुमानता, जीवाची पर्वा न करता त्यांनी अखंडपणे आपलं संशोधनकार्य सुरू ठेवलं. त्यांनी या विषयांवर विपुल लेखन सुद्धा केलं. त्या जेन गुडाल इन्स्टिट्यूट आणि रूट्स अँड शूट्स या संस्थांच्या संस्थापक होत्या. तसेच २००२ साली त्यांची संयुक्त राष्ट्रांच्या शांतीदूत म्हणूनही नियुक्ती झाली होती. याव्यतिरिक्त त्यांना त्यांच्या कार्यासाठी जगभरातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. म्हणूनच त्या निसर्ग संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांसाठी प्रेरणादायी असे आदर्श व्यक्तिमत्व होत्या. डॉ. जेन गुडाल यांना भावपूर्ण आदरांजली ! 🙏💐

Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


C/o-. Arts, Opposite Of Eid-gah Maidan, Old Budhgaon Road
Sangli
416416