01/06/2026
Government ITI Sangli Official
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Government ITI Sangli Official, Government Organization, Sangli.
01/06/2026
29/05/2026
श्री आर व्ही मोहिते सर इलेक्ट्रिशन यांचा सेवापूर्ती गुणगौरव सोहळा जल्लोषात उत्साहात संपन्न Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
29/05/2026
https://youtu.be/JI6ChyUHnhg?si=IVsho8yo_ecQcXqF
श्री आर व्ही मोहिते सर इलेक्ट्रिशन यांचा सेवापूर्ती गुणगौरव सोहळा जल्लोषात उत्साहात संपन्न Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
21/05/2026
https://youtu.be/1LQXhadyH0A?si=RaPh_3zAdZGd2Xad
मशिनिस्ट ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्याची सक्सेस स्टोरी Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
16/05/2026
_*प्रवेश सत्र २०२६-२०२७ आणि २०२६-२०२८ साठी आतिशय महत्वाची माहिती*_
*१) प्रवेश संकेतस्थळ: https://admission.dvet.gov.in या संकेत स्थळ ( web site ) वर जवळच्या शासकीय आय.टी.आय. मध्ये किंवा नेट कॅफेमध्ये किंवा महा-ई सेवा केंद्रामध्ये प्रवेश अर्ज भरायचा आहे.*
*अर्ज भरण्यासाठी ३ ते ४ आठवड्याचा कालावधी दिला जाऊ शकतो (अर्ज भरला पण ऐन प्रवेश घेतेवेळी एखादे मुळ प्रमाणपत्र सादर करु शकले नाहीत तर अश्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होवू शकतो याची नोंद घेवून अर्ज करण्यापुर्वी सर्व आवश्यक कागदपत्र ( डॉक्युमेंटस )जमा करावीत )*
*२१ मे,२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून वरील वेब साईटवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.अर्ज भरताना अर्जातील सर्व माहिती अचुक भरावी.*
*२)प्रवेश अर्ज शुल्क:*
राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी (Reserved Category): रु.100/- महाराष्ट्र राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी (Outside Maharashtra State): रु.300/-
अराखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी (Unreserved Category): रु.150 /- अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी(Non Residential Indian): रु.500/-
*या प्रमाणे प्रवेश अर्ज शुल्क भरुन अर्जाची प्रिंट काढुन ती प्रिंट जवळच्या शासकीय आय.टी.आय. मध्ये अर्जामध्ये नमुद केल्या प्रमाणे सर्व मुळ कागदपत्रे तपासून घेवून त्यांची एक झेरॉक्स प्रत आर्जाला जोडुन तो अर्ज त्यासंस्थेत जमा करुन त्याची पोच (“अर्ज निश्चितीकरण पावती” (Application Confirmation Slip)घ्यावी.*
*३) आय.टी.आय. आणि त्या आय.टी.आय.मधील व्यवसाय योग्य पसंतीक्रमाणे निवडणे.*
०१ जून, २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्यक्रम सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक (Registration No.) व पासवर्ड
(Password) व्दारे प्रवेश (Login) करुन आपल्या पसंतीची संस्था निवडुन त्या संस्थेतील *किमान एक किंवा एकापेक्षा जास्त व्यवसाय तुमच्या पसंती क्रमाने निवडावेत.*
*फेरीनिहाय कॅपराउंडचे रीतसर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल व ते या गृपवर टाकले जाईल.*
DVET | MAHARASHTRA प्रवेशप्रक्रीयेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रवेशोच्छुक उमेदवारांच्या सोईसाठी "MahaITI App" नावाचे Android App ची रचना संचालनालया....
💥💥विशेष सूचना 💥💥
आपल्या जिल्ह्यातील उज्ज्वल भविष्य आणि शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) संधींबाबत महत्त्वाची सूचना☄️☄️☄️
सोमवार दिनांक ११ मे २०२६ रोजी आपल्या संस्थेत बीटीआरआय विभाग, सांगली तर्फे आयोजित 'प्रधानमंत्री नॅशनल अप्रेंटिसशिप मेळाव्या' निमित्त सर्व निदेशकांना एक अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक बाब निदर्शनास आणून द्यायची आहे.
💥सध्या अनेक विद्यार्थ्यांचा ओढा केवळ पुण्यासारख्या शहरांकडे वाढत आहे. मात्र, तेथे केवळ उत्पादनाचे (Production) एकसारखे काम केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा म्हणावा तसा विकास होत नाही. अनुभवाअभावी हीच मुले दोन-तीन वर्षांनी परत आल्यावर त्यांना स्थानिक कंपन्यांमध्ये स्थिरस्थावर होणे कठीण जाते.
💥सदर परिस्थितीचा विचार करिता
BTRI विभागाने स्थानिक उद्योगांशी थेट चर्चा करून आणि बैठका घेऊन विद्यार्थ्यांच्या स्टायपेंड बाबत सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यातून खालील गोष्टी साध्य झाल्या आहेत:
💥आकर्षक विद्यावेतन (Stipend): आपल्या जिल्ह्यातील मेळाव्याकरिता येणाऱ्या कंपन्यांनी आता किमान ₹१२,०००/- व कमाल ₹१४,०००/- पर्यंत स्टायपेंड देण्याचे मान्य केले आहे.
💥शासकीय प्रोत्साहन भत्ता: केंद्र शासनाच्या NAPS आणि MAPS योजनेद्वारे मिळणारे ₹५,०००/- अतिरिक्त प्रोत्साहन मिळून, विद्यार्थ्यांना दरमहा एकूण ₹१७,०००/- ते ₹१९,०००/- पर्यंत मासिक पगार मिळू शकतो.
💥स्थानिक MSME कंपन्यांमध्ये कामाचे वैविध्य असल्याने विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते आणि ते सर्वगुणसंपन्न तंत्रज्ञ बनतात.
तसेच स्थानिक कंपन्यांमध्ये काम केल्यास भविष्यात त्याच ठिकाणी कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे.तरी सर्व निदेशकांना विनंती आहे
कृपया आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ही वस्तुस्थिती समजावून सांगावी. पुण्यात मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत आता आपल्या जिल्ह्यातही तितकाच पगार मिळत आहे आणि त्यासोबतच आपल्या घरात राहून नोकरीची मोठी संधी उपलब्ध आहे. तरी सर्व निदेशकांनी या मॅसेजचे महत्व आपल्या पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्याना समजाऊन सांगावे ही विनंती आहे
💥मेळाव्याचे ठिकाण: आय टी आय सांगली
दिनांक: ११-०५-२०२६ ,
वेळ- सकाळी ११.०० AM
💥मेळाव्यास येताना मुलांना आपला रिझ्युम हार्ड कॉपी मधे घेऊन येण्यास सांगावे.
शुभेच्छांसह,
BTRI विभाग, सांगली.
01/05/2026
https://youtu.be/q2ZhbjvgQqo?si=BeVf5qjihaUEl4Q3
Sangli Government ITI ITI सांगली येथे 1मे महाराष्ट्र दिन कामगार दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Sangli
416416
