Shramik Mukti Dal

Shramik Mukti Dal

Share

Shramik Mukti Dal (toilers’ liberation league), is a political organization in rural Maharashtra, India.

25/03/2026

भाजपला विरोध ही Bharat Patankar यांची मुख्य भूमिका. डॉक्टर पाटणकर ज्यांच्या तालमीत तयार झाले त्या क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचीही हीच भूमिका होती.त्यांच्या भाजपला विरोध करण्याच्या आगळ्या वेगळ्या गोष्टी सांगली सातारा जिल्ह्यात आजही चर्चेत असतात.तोच कित्ता डॉक्टर पाटणकर यांनी गिरवला आहे.
भाजपला विरोध हा भारत पाटणकर यांच्या राजकारणाचा प्रमुख भाग राहिला आहे आणि भाजपला विरोध म्हणून त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची पाठराखण केली.गेल्या अनेक वर्षांपासून ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करत आहेत. पाटणकर यांची मदतीची भावना वेगळी होती आणि आहे.भाजप तत्सम पक्षाला त्या विचारधारेला विरोध म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या टिकेचे धनी व्हायला लागले.त्यांच्यावर टीका झाली हे होत असतानाही पाटणकर मात्र भाजप सत्तेत नको म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत करत राहिले..

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते (जे अनेक वर्ष सत्तेत होते)ते मतदार संघाचा विकास करायला भाजपमध्ये निघाले होते,जात होते.त्यांना भाजप सत्तेत येणार याची ठाम खात्री होती. हे दोन्ही पक्ष अडचणीत असताना डॉ पाटणकर यांच्यासारख्या माणसांनी आघाडीचे मनोबल वाढवले. जेव्हा पाठींबा देण्याची गरज होती तेव्हा हे लोक पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणून या पक्षांच्या सोबत राहिले..

डॉक्टर पाटणकर यांचा राजकीय प्रभाव किती?आणि किती मतदार संघात त्यांच्यामुळे फरक पडला हा व्यवहारी राजकीय प्रश्न विचारला जाऊ शकतो.त्याची उत्तरे सुद्धा देता येतील.पण जेव्हा सगळेच पक्षी उडून जात होते तेव्हा पाटणकर यांच्यासारख्या नैतिक अधिष्ठान असलेल्या माणसाने 'आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणणं ही गोष्टच थोर होती.कारण ज्यांना मोठे केले ते ईडीच्या भीतीने किंवा ईडीला भ्यायलो अस सोंग करून भाजपमध्ये निघाले होते तेव्हा मात्र पाटणकर यांच्यासारखा त्यागी माणूस कोणतीही अपेक्षा न ठेवता आघाडीच्या सोबत राहिला..
आपण एकटेच आडरानातून प्रवास करत असतो तेव्हा एकट्याला खूपच भीती वाटते.तेव्हा एक म्हातारा माणूस वाटेत भेटतो,तेव्हाचा प्रवास सुरक्षित वाटतो.आपल्याकडे तारुण्य असते,शक्ती असते.पण त्या म्हाताऱ्याकडे असतो अनुभव.अनेक उन्हाळे पावसाळे खाल्ल्याचा. तोच आपला रात्रीच्या अंधारातला प्रवास सुखकर करतो.आपल्याला उजेडापर्यत यायला साथ देतो..असाच हा म्हातारा माणूस..धोतर नेसत नाही म्हणून म्हातारा वाटत नाही.दरम्यान विधान परिषदेच्या जागांची चर्चा सुरू होती तेव्हा त्यांचेही नाव चर्चेत आले.तेव्हा भारत दादा म्हणाले,"मी असाच बरा आहे.मला आमदारकी नको.."
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेपर्यंतच्या प्रवासात अनेकांचा वाटा आहे, त्यात डॉक्टर भारत पाटणकर यांचा आहेच.
संपत लक्ष्मण मोरे

22/03/2026

#क्रांतीवीर_नागनाथ_अण्णा_नायकवडी
#स्मृतीदिन_१४_वे_वर्ष

"१९९३ मध्ये "नागनाथ अण्णांनी" पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे आटपाडी तालुक्यासह १३ दुष्काळी तालुक्यातील शेतात पाणी बघणार मगच पाणी चळवळ थांबवणार"
- डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष श्रमिक मुक्ती दल.

दि.२२ मार्च २०१८ - आटपाडी जि. सांगली

१९९३ मध्ये या आटपाडी तालुक्यामध्ये पाण्याचा लढा उभा करण्यासाठी मी जेव्हा आटपाडी येथे प्रथम आलो. त्यावेळी विलास खरात यांनी मला ज्यावेळी पुढच्या वेळी याल, त्यावेळी क्रांतिवीर नागनाथ अण्णांना पाण्याचा लढा उभा करण्यासाठी घेऊन येण्यास सांगितले. मी याबाबत नागनाथ अण्णानां विनंती केली की, 'तुम्हाला पण आटपाडी येथे विलास खरात पाण्याचा लढा उभा करण्यासाठी बोलवत आहेत तुम्ही येणार का?? 'त्यावर नागनाथअण्णांनी कोणताही मागचा पुढचा विचार करता लगेच 'होकार' दिला.

त्यावेळी लगेचच त्याच महिन्यामध्ये क्रांतिवीर नागनाथ अण्णाच्या नेतृत्वाखाली आटपाडी मध्ये 'जाहीर सभेचे' आयोजन केलेले होते. या सभेस लोकांची प्रचंड अशी गर्दी गोळा झालेली होती. सभा प्रचंड जोमात आली असताना, स्टेजवर असा एक प्रसंग घडला की, क्रांतिवीर नागनाथ अण्णांनी त्या जाहीर सभेमध्ये आपल्या भाषणा मध्ये जाहीर केले की, "जो पर्यंत आटपाडी तालुक्यासह १३ दुष्काळी तालुक्यामध्ये पाणी येत नाही. तो पर्यंत आटपाडी मध्ये पाण्याच्या लढयासाठी मुक्कामचं करायचा. त्यासाठी आटपाडी मध्ये कायमस्वरूपी "मुक्कामाचा तंबू" ठोकायचा, असे नुसते बोलून नागनाथ अण्णा थांबले नाहीत तर लगेचच सभेनंतर आटपाडी मध्ये "मुक्कामाचा तंबू" माझ्या आणि अण्णाच्या देखरेखीखाली ठोकण्यात आला.

आज आटपाडी मध्ये हा 'जाहीर सत्कार' स्वीकारत असताना माझ्यासह आपण सर्वजण '२०१८' मध्ये प्रवेश करीत आहोत, 'क्रांतिवीर नागनाथ अण्णांच्या' इच्छे प्रमाणे, ११९३ मध्ये उभा करण्यात आलेला "मुक्कामाचा तंबू" २४ वर्षानंतर आटपाडी मध्ये राहिला नसला तरी, त्या "मुक्कामाच्या तंबू" इतकेच ठामपणे आम्ही श्रमिक मुक्ती दल आणि पाणी संघर्षाच्या नेतृत्वाखाली, या आटपाडी तालुक्याच्या माती मध्ये आजही 'दमदारपणे' पाय रोवून उभा आहोत, नुसते उभा नाही तर आपल्या सर्वांच्या साक्षीने आज या सभेमध्ये जाहीर करतो की, "१९९३ मध्ये क्रांतिवीर नागनाथ अण्णांनी पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे आटपाडी तालुक्यासह १३ दुष्काळी तालुक्यातील शेतात पाणी बघणार मगच पाणी चळवळ थांबवणार. आणि ही घोषणा १०० टक्के राबवल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही." असे वचन मी डॉ.भारत पाटणकर आपणा सर्वाना देऊ इच्छितो.

आटपाडी तालुक्यासह १३ दुष्काळी तालुक्यातील 'आजचा प्रत्येक माणूस म्हणजेच क्रांतिवीर नागनाथ अण्णांच्या स्वप्ना मधील एक "मुक्कामाचा तंबू" आहे. आणि हा "मुक्कामाचा तंबू" आता पूर्वी सारखा आटपाडी मध्ये एका ठिकाणी नसला तरी आटपाडी तालुक्यासह १३ दुष्काळी तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आजही जिवंत आहे. त्या स्वप्ना प्रमाणे १९९३ पासून आजपर्यंतच्या २५ वर्षा मध्ये आपण जे यश संपादन केले ते यश असच पुढे ठेवून "क्रांतिवीर नागनाथ अण्णांनी '१९९३' मध्ये आटपाडी तालुक्यासह १३ दुष्काळी तालुके "कायमस्वरूपी दुष्काळमुक्त" करणेचे पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहूया, लढत राहूया, संघर्ष करत करत विजयी पताका उभा करूया........."

जय हिंद....
- डॉ. भारत पाटणकर.

(नागनाथ अण्णांच्या " ०६ स्मृतीदिनी" (दि.22 मार्च २०१८) आटपाडी जि. सांगली येथे समन्यायी पाणी वाटप आणि पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने धरणग्रस्त आणि दुष्काळग्रस्त जनतेची ऐतिहासिक एकजूट व संघर्षाचा भव्य विजयी मेळावा आणि जाहीर नागरी सत्कारा वेळी चळवळी चे नेते डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष श्रमिक मुक्ती दल, यांनी केलेल्या जाहीर भाषणामध्ये वरील उदगार काढले)

शब्दांची जुळवाजुळव - सुधीर नलवडे, तासगाव जि. सांगली.

14/03/2026
14/03/2026

मणदूर (वाड्या- वस्त्यांसह) उखळू या गावांना होणारा वन्य प्राण्यांचा त्रास, गव्यांचे हल्ले, वारणा कॉलनी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे काढणे आणि त्या जमिनी मणदूर गावच्या शेतकऱ्यांना परत देणे, वन्य प्राण्यांच्या त्रासापासून शेती वाचवण्यासाठी अभयारण्य हद्दीला कुंपण घालणे यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली गेले सहा दिवसा ( ता. ९ मार्च २०२६) पासून ही स्त्री- पुरुष जनता सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करीत आहे.
मधल्या काळात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याबरोबर बैठक होऊन यांच्या बरोबर बैठक होऊन मणदूर गावाचे ग्रामस्थ सोडून जी बाहेरील अतिक्रमण धारक आहेत, ज्यांना जागा खाली करण्यास नोटिसा दिल्या आहेत, त्यांची मुदत उलटूनही जागा खाली केली नाही, त्यांच्यावर FIR दाखल करण्यास पोलीस ठाण्यात पत्र पाटबंधारे विभागाने दिले आहे, त्याचबरोबर कॉलनीतील इमारती पडून मोठ्या प्रमाणात केंजाळ व जंगल वाढले आहे. रस्ते पूर्णपणे झाकून गेले आहेत, त्यामध्ये गवे, बिबटे, रानडुकरे, माकडे, यांचे निवस्थान झाले आहे. शेतीकडे जाणे सुद्धा जीवघेणे ठरत आहे. ते सर्व साफ करून रस्त्यावर लाईट लावण्याचे ठरले, त्यानुसार जेसीबी आणून पाटबंधारे विभागाने जनतेच्या रेट्यामुळे सुरुवात केली आहे. यामुळे जनतेमध्ये समाधान झाले आहे.
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या कार्यालयासमोर जनता बसली असताना सुद्धा व्याघ्रप्रकल्पाचे सक्षम अधिकारी आंदोलन ठिकाणी फिरकले नाहीत. यामुळे या जनतेने त्यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ज्या जागेतून व्याघ्रप्रकल्पाची ये जा चालू आहे, ज्या पर्यटकांच्या नावे त्यांचा व्यवसाय चालतो. तो रस्ताच मणदूर व वाड्यांच्या शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या जमिनीतून जातो. या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई किंवा संपादन झालेले नाही. त्यामुळे ही जनता सोमवार ता. १६ पासून त्यांच्या जागेत जाऊन तेथून बेकायदेशीर होणारी वाहतूक रोखण्यासाठी मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष, मुले जाऊन रस्त्यावर बसणार आहेत.

11/03/2026

#छत्रपतीसंभाजीमहाराज
#स्मृतिदिन
#मार्च11

वयाच्या नवव्या वर्षी राजकारणात उतरलेले युवराज ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती, एक दैदीप्यमान पराक्रमी आणि तेवढाच खडतर जीवनप्रवास.

छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिवस. महापराक्रमी, संस्कृतपंडित, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना स्मृतीदिना निमित्त त्रिवार मुजरा 🙏

डॉ आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारांचा सिद्धात गेल ऑम्वेट यांनी कसा मांडला? 08/03/2026

https://youtu.be/SXaQPZKyVnY?si=bhxkYRiIeCBgqhJB

डॉ आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारांचा सिद्धात गेल ऑम्वेट यांनी कसा मांडला? भारताशी कोणताही थेट संबंध नसताना मुळच्या अमेरिकन डॉ. गेल ऑम्वेट यांनी इथल्या वंचित आणि बहुजनांसाठी मोठं कार्य के...

07/03/2026

आपली उपस्थिती आवश्यक आहे 🙏🙏

07/03/2026

🙏🙏

07/03/2026

🙏🙏

सर्वानी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती

Photos from Shramik Mukti Dal's post 24/01/2026

व्यवस्थेला प्रश्न विचारले जाऊ नयेत अशा तरुणांचे तांडे आजची शिक्षण व्यवस्था निर्माण करीत आहे...
प्राचार्य कॉम्रेड डॉ आनंद मेणसे

कासेगाव-
अर्धशिक्षित बेकार तरुणांचे तांडेच्या तांडे फिरताहेत त्यांना धार्मिक कामात गुंतवले जात आहे. तरुणांनी व्यवस्थेला प्रश्न विचारू नये यांची पद्धतशीर सोय व्यवस्थेने आज केली जात आहे. असे परखड मत प्राचार्य कॉम्रेड आनंद मेणसे यांनी केले. ते क्रांतिवीर बाबूजी पाटणकर आठवण दिनानिमित्त बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड कृष्णा पाटील होते. यावेळी डॉ भारत पाटणकर, कॉम्रेड धनाजी गुरव, कॉम्रेड जयंत निकम, प्रशांत पवार, विठ्ठल डांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदा दलित बहुजनांना शिक्षणाची संधी मिळाली. राखीवतेच्या धोरणामुळे त्यांना नोकरीची संधी मिळाली यातूनच एकप्रकारे मनुस्मृतीतून दलित बहुजनांना मुक्ती मिळाली. या दृष्टीने त्याकाळातील सरकारांनी कांही पाऊले उचलली. आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. या देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं खाजगीकरण करण्याच्या दिशेने आजच्या सरकारने धोरणे घेतली आहेत. खरंतर त्याची सुरवात नव्वदच्या दशकात झाली आहे. शाळेच्या बकालीकरणातून शाळेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अनास्था निर्माण करायची म्हणजे सरकारी शाळा आपोआप ओस पडतील आणि खाजगी शाळांचे आकर्षण निर्माण होईल, ही नीती सरकारने अवलंबवली आहे.

शिक्षण व्यवस्था जेंव्हा संपूर्णपणे खाजगी क्षेत्राच्या ताब्यात जाईल त्यावेळी पहिली कुऱ्हाड मुलींच्या शिक्षणावर घातली जाईल. आज तरुणांना गुमराह करण्यासाठी धार्मिक विद्वेषाचे राजकारण जाणीवपूर्वक पेरले जात आहे. त्याविरोधात आपल्याला ठाम भूमिका घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल.

डॉ भारत पाटणकर म्हणाले की लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक आवश्यक असताना निवडणूक ही लोकशाही नष्ट करण्यासाठी आज वापरली जात आहे. अशावेळी चळवळी तीव्र असायला हव्यात पण आज त्या संपल्या आहेत असं चित्र आहे. हक्क मागणाऱ्या चळवळी दडपून टाकल्या जात आहेत. आणीबाणी पेक्षा भयानक अवस्था आज आहे. यासाऱ्याला हादरवून टाकणारी चळवळ उभी करणे हीच खरी स्वातंत्र्यवीरांना आदरांजली ठरेल. शिक्षण हा व्यापार झाला आहे आणि गरिबांचे डोके सुद्धा त्याला बळी पडले आहे, अशी परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली आहे. स्वप्न हरवलेला हा आज आपला देश आहे. आणि स्वप्न मरणे हे सर्वात धोकादायक आहे.

अध्यक्ष पदावरून बोलताना ऍड कृष्णा पाटील म्हणाले, की ब्रिटिश सरकार गेल्यानंतर भारतात नेमकं कसं सरकार हवं याचं मॉडेल म्हणजे प्रति सरकार आहे. प्रतिसरकारचं प्रत्यक्ष काम अमलात आणणारी ही भूमी असून त्याची संपूर्ण जबाबदारी बाबूजी पाटणकर यांनी घेतली होती हा इतिहास आहे. गावातले तंटे गावातच मिरवण्याची जी प्रतिसरकारची पद्धत होती ती आता कायद्यात आली आहे. इतकं महत्व प्रतिसरकरच आहे.
यावेळी कॉ संपत देसाई, सुधीर नलवडे, दिलीप पाटील, विठ्ठल डांगरे, डी के बोडके, दाऊद पटेल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक कॉम्रेड जयंत निकम यांनी कार्यक्रमाचचे सूत्रसंचालन ऍड संदीप पाटील यांनी केले. आभार संतोष गोटल यांनी मांडले.

20/01/2026

अदानी वीज निर्माण प्रकल्प हानीकारक. जनतेच्या लढ्याचा पुढचा टप्प्या ....

विभागीय आयुक्त आणि कार्यकारी संचालक यांच्या बरोबर बैठक आयोजित करण्याचे ठरले.
तोपर्यंत अदानी- तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाच्या कामाचा वेग संथगतीने-- डॉ. भारत पाटणकर

तारळे -- प्रतिनिधी,
तारळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात निवडे गावाजवळ अदानी कंपनीने बेकायदेशीरपणे पंप स्टोरेज हायड्रो प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे, त्याविषयी आज ता.१६ रोजी अदानी-तारळी पंप स्टोअरेज जलविद्युत प्रकल्प विरोधी कृती समितीने काम बंद आंदोलन जाहीर केले होते. त्यानुसार तोंडोशी येथे लोक आंदोलनास जमले असता पाटबंधारे विभागाचे अधिकारी, अदानी कंपनीचे अधिकारी आणि कृती समिती अशी बैठक झाली. यावेळी विभागीय आयुक्त व कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या बरोबर लवकरात लवकर बैठक लावून पुढील निर्णय घेण्याचे ठरले असे डॉ. पाटणकर यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, जलाशयाच्या पाणी साठ्या लगत अदानी कंपनीने उत्खनन करून त्यांचा मुरूम, माती, दगड असा माल टाकला आहे, तो धरणामध्ये जाऊन, गाळ साठून पाणी साठा कमी होणार आहे, हल्ली केव्हाही पाऊस पडत आहे, त्यामुळे तो तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावा अशी भूमिका समितीने घेतली होती, त्यानुसार कंपनीने उद्या पासून तो उचलण्यास सुरुवात करतो असे मान्य केले.
ते पुढे असेही म्हणाले की, या प्रकल्पाला सध्या महाराष्ट्रात सुरू असलेला प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम याही प्रकल्पाला लागू आहे, त्याचबरोबर केंद्र शासन व पुढे महाराष्ट्र शासनाने काढलेले २०१४ चे राजपत्र सुद्धा लागू असून त्यानुसार कंपनीने जनतेशी व्यवहार करायला पाहिजे, यासाठीच विभागीय आयुक्त आणि कार्यकारी संचालक, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची बैठक आवश्यक असून या बैठकीनंतर आम्ही आमची पुढील भूमिका ठरवू.
यावेळी बाळासाहेब सपकाळ यांनी कंपनीच्या मान्यतेसाठी असणाऱ्या अटी व नियम कोणते आहेत आणि ते सर्व नियम या कंपनीने असे धाब्यावर बसवून काम पुढे रेटले आहे ते सांगितले.
यावेळी डॉ. प्रशांत पन्हाळकर, प्रदीप निकम, यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस अधिक्षक अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता श्रद्धा सुडेवाड कंपनीचे अधिकारी विकेश शर्मा, कुणाल व अमोल सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते, तर कृती समितीच्या वतीने रमेश शिंदे, आनंदा सपकाळ, देवानंद कदम, गणपत पन्हाळकर, गुलाब काटे, बाजीराव पन्हाळकर, श्रीकांत शिर्के, बाजीराव शिंदे, विकास मेष्ठे, शिवाजी जाधव, कृष्णात पन्हाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष उपस्थित होते.
यावेळी उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
००००००००००००००००००००००

07/01/2026

श्रमिक मुक्ती दल अधिवेशन ३०वे वर्ष ४२वे ,दुसरा दिवस.

Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Sangli