Kherwadi Nirbhaya Pathak

Kherwadi Nirbhaya Pathak

Share

Mobile 5 nirbhaya

Photos from Kherwadi Nirbhaya Pathak 's post 29/04/2023

आदरणीय सर,
जय हिंद

दिनांक 19/04/2023 रोजी 14.00 ते 14.50 वा च्या दरम्यान निर्भया पथकाद्वारे *पीडब्लूडी मैदान जवळील हॉल, शासकीय वसाहत, बांद्रा पूर्व मुंबई 51* याठिकाणी अंगणवाडी सेविकांची बैठक घेण्यात आली.
सदरवेळी उपस्थितांना निर्भया पथकाच्या कामकाजाबाबत माहिती देण्यात आली.
* सेफ टच, अनसेफ टच याबाबत मुलांना माहिती देणे.
* लहान मुलांबाबत होणारे गुन्हे
* मार्केट परिसरामध्ये वावरताना घ्यावयाची दक्षता * प्रवासामध्ये होणारी छेडछाड,
* घरगुती अत्याचार याबद्दल जनजागृती करण्यात आली.
* आधुनिक काळात सोशल मीडिया वरून होणाऱ्या गुन्ह्यांबाबत माहिती देऊन त्यापासून बचावासाठी घ्यावयाची दक्षता
* सायबर क्राईमचे प्रकार व दक्षता
* ओटीपी शेअर करण्याचे तोटे* ऑनलाईन फ्रॉड
* अनोळखी नंबर वरून येणारे video call, त्याद्वारे होणारी फसवणूक, त्यासाठी घ्यावयाची काळजी
* बँक फ्रॉड, फेक कॉल्स, फेक मेसेजेस, त्यापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी इ
माहिती दिली.
तसेच महिलांसाठी असणारे हेल्प लाईन नंबर 100, 103 तसेच *8591935807* याबद्दल माहिती देऊन मदतीसाठी संपर्क साधण्यास कळविण्यात आले.
सदरवेळी पोउपनि रूपाली साळुंखे, मपोह. मोरे, पोह.पागधरे हे उपस्थित होते.

आदरपूर्वक सादर,

(आनंदा बागडी)
प्र.वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खेरवाडी पोलीस ठाणे.

Photos from Kherwadi Nirbhaya Pathak 's post 16/03/2023

आदरणीय सर,
जय हिंद

दिनांक 16/03/2023 रोजी 18.20 ते 18.40 वा च्या दरम्यान निर्भया पथकाद्वारे *जोगर्स पार्क, शासकीय वसाहत, बांद्रा पूर्व मुंबई 51* याठिकाणी कॉर्नर मीटिंग घेण्यात आला.
सदरवेळी उपस्थितांना निर्भया पथकाच्या कामकाजाबाबत माहिती देण्यात आली.
📍वयोवृद्ध महिलांच्या बाबतीत होणाऱ्या सोनसाखळी चोरी सारख्या गुन्ह्यांबाबत माहिती देऊन सुरक्षित राहण्याबाबत सूचना दिल्या.
📍गर्दीच्या ठिकाणी उद्भवणारे गुन्हे, याबाबत करावयाच्या घ्यावयाची दक्षता
📍लहान मुलांबाबत होणारे गुन्हे
📍मार्केट परिसरामध्ये वावरताना घ्यावयाची दक्षता 📍प्रवासामध्ये होणारी छेडछाड,
📍टपरी किंवा नुक्कड वर बसलेल्या व्यक्तींकडून विनाकारण comment पास करण्यासारख्या घटना,
📍घरगुती अत्याचार याबद्दल जनजागृती करण्यात आली.
📍आधुनिक काळात सोशल मीडिया वरून होणाऱ्या गुन्ह्यांबाबत माहिती देऊन त्यापासून बचावासाठी घ्यावयाची दक्षता
📍सायबर क्राईमचे प्रकार व दक्षता
📍ओटीपी शेअर करण्याचे तोटे📍ऑनलाईन फ्रॉड 📍 सायबर स्टॉकिंग 📍 सायबर मोर्फिंग 📍अनोळखी नंबर वरून येणारे video call,
त्याद्वारे होणारी फसवणूक, त्यासाठी घ्यावयाची काळजी
📍बँक फ्रॉड, फेक कॉल्स, फेक मेसेजेस, त्यापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी इ
माहिती दिली.
तसेच महिलांसाठी असणारे हेल्प लाईन नंबर 100, 103 तसेच *8591935807* याबद्दल माहिती देऊन मदतीसाठी संपर्क साधण्यास कळविण्यात आले.
सदरवेळी पोउपनि रूपाली साळुंखे, पोशि.जाधव हे उपस्थित होते.

आदरपूर्वक सादर,

(राजेंद्र मुळीक)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खेरवाडी पोलीस ठाणे.

Photos from Kherwadi Nirbhaya Pathak 's post 09/03/2023

आदरणीय सर
जय हिंद

दिनांक 08/03/2023 रोजी खेरवाडी पोलीस ठाणे अंतर्गत *जागतिक महिला दिनाचे* औचित्य साधून पोलिस ठाणेस कार्यरत असणाऱ्या महिला अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान करण्याबद्दल कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आपले पोलिस दलातील कर्तव्य आणि संसारातील दैनंदिन काम करत असताना नेहमीच्या कामकाजातून स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे पोलिसांना वेगवेगळे आजार होण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. * त्यासाठी शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यामध्ये _योग साधना_ कशाप्रकारे मदत करते* या विषयावर पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी योग विषयाचा अभ्यास असलेल्या *_श्रीमती हिल्डा लॉईड परेरा*_ यांचे लेक्चर आयोजित करण्यात आले.
सदर कार्यक्रमामध्ये पोलीस ठाणेस उत्तम काम करणाऱ्या महिला तसेच इतर सर्व कार्यरत महिलांचा देखील सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

सविनय सादर,

(श्री. राजेंद्र मुळीक)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
खेरवाडी पोलीस ठाणे,मुंबई.

Photos from Kherwadi Nirbhaya Pathak 's post 01/03/2023
Photos from Kherwadi Nirbhaya Pathak 's post 30/01/2023

आदरणीय महोदय,
जय हिंद,

आज दि. 30/01/2023 रोजी 18.20 वा. ते 18.35 वा.चे दरम्यान खेरवाडी पोलिस ठाणे हद्दीत,

➡️ *राजधानी बेकरीजवळील कोचिंग क्लासेस, शासकीय वसाहत, बांद्रा पूर्व, मुंबई* येथे कोचिंग साठी येणाऱ्या मुलांची कॉर्नर मीटिंग घेण्यात आली, सदर वेळी त्यांना *निर्भया पथका* विषयी माहिती देण्यात आली.
🔸आधुनिक काळात सोशल मीडियावर द्वारे होणारे गुन्हे 🔸ऑनलाईन गेम
🔸ऑनलाईन ॲप. 🔸सायबर क्राईम
🔸सोशल मीडिया गुन्हे 🔸सायबर स्टॉकिंग
🔸बालकांवर होणारे अत्याचार
🔸इंटरनेटचा गैरवापर 🔸सायबर मोर्फिंग
🔸महिला मुलींचे छेडछाडीचे प्रकार
🔸लहान मुलांचे फसवणुकीचे प्रकार
🔸मोबाईल फोन वापराचे फायदे आणि तोटे
🔸वाढत्या वयामध्ये अंमली पदार्थांचे आकर्षण
आणि त्यांचे लागणार व्यसन, होणारे दुष्परिणाम इत्यादी विषयी सदर वेळी मार्गदर्शन करण्यात आले.
हेल्पलाईन क्रमांक 100,103 तसेच निर्भया मो. न.*8591935807* बाबत माहिती देऊन आणि आपले संरक्षण करण्याबाबत मार्गदर्शन केले.
सदर वेळी निर्भया पथक अधिकारी पो.उप.नि रूपाली साळुंखे, मपोह.मोरे, पो.ना. राठोड, पोशि. दुवे हे उपस्थित होते.

आदरपूर्वक,

(श्री. राजेंद्र मुळीक )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खेरवाडी पोलीस ठाणे, मुंबई

Photos from Kherwadi Nirbhaya Pathak 's post 27/01/2023

आदरणीय महोदय,
जय हिंद,

आज दि. 27/01/2023 रोजी 12.25 वा. ते 13.10 वा.चे दरम्यान खेरवाडी पोलिस ठाणे हद्दीत,

➡️ *रामकृष्ण परमहंस उच्च माध्यमिक शाळा, शासकीय वसाहत, बांद्रा पूर्व, मुंबई* येथील दिव्यांग मुलांसोबत *_प्रजासत्ताक दिना_* चे औचित्य साधून,
♦️ *_पोलीस दीदी कार्यक्रम_* ♦️ अंतर्गत
संवाद साधण्यात आला.
सदरवेळी दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांना देखील संबोधित करण्यात आले असून मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
हेल्पलाईन क्रमांक 100,103 तसेच निर्भया मो. न.*8591935807* बाबत माहिती देण्यात आली.
सदर वेळी दिवसपाळी पर्यवेक्षक अधिकारी पो.नि. बुरांडे, निर्भया पथक अधिकारी पो.उप.नि रूपाली साळुंखे, मपोह.मोरे हे उपस्थित होते.

आदरपूर्वक,

(श्री. राजेंद्र मुळीक )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खेरवाडी पोलीस ठाणे, मुंबई

Photos from Kherwadi Nirbhaya Pathak 's post 25/01/2023

आदरणीय महोदय,
जय हिंद,

आज दि. 25/01/2023 रोजी 16.20 वा. ते 17.10 वा.चे दरम्यान खेरवाडी पोलिस ठाणे हद्दीत,

➡️ *कार्डिनल स्कूल, सुभाष नगर, बांद्रा पूर्व, मुंबई* येथे इयत्ता 3 री च्या विद्यार्थ्यांसोबत♦️ *_पोलीस दीदी कार्यक्रम_* ♦️ अंतर्गत
संवाद साधून त्यांना *सेफ टच, अनसेफ टच* विषयी तसेच *निर्भया पथका* विषयी माहिती देण्यात आली.
✏️शिक्षणाचे महत्त्व ✏️ऑनलाईन गेम ✏️ऑनलाईन ॲप. ✏️सायबर क्राईम
✏️सोशल मीडिया गुन्हे
✏️बालकांवर होणारे अत्याचार
✏️इंटरनेटचा गैरवापर. ✏️गुड टच बॅड टच
✏️ स्वसंरक्षण. ✏️बालकांचे छेडछाडीचा प्रकार
✏️महिला मुलींचे छेडछाडीचे प्रकार
✏️लहान मुलांचे फसवणुकीचे प्रकार
✏️मोबाईल फोन वापराचे फायदे आणि तोटे
✏️अंमली पदार्थांबाबत माहिती देऊन त्यांचे
लागणार व्यसन आणि दुष्परिणाम
इत्यादी विषयी सदर वेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्वसंरक्षण बाबत घ्यायची काळजी व दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. तसेच काही चुकीच्या गोष्टी निदर्शनास आल्यास , जाणवल्यास तर त्वरित त्या संदर्भात पोलिसांना कळवने बाबत सूचना दिल्या.
हेल्पलाईन क्रमांक 100,103 तसेच निर्भया मो. न.*8591935807* बाबत माहिती देऊन आणि आपले संरक्षण करण्याबाबत मार्गदर्शन केले.

सदरवेळी दिवसपाळी पर्यवेक्षक पो.नि. बागडी, निर्भया पथक अधिकारी पो.उप.नि रूपाली साळुंखे, म.पो.ह. मोरे, मपोशि. जाधव हे उपस्थित होते.

आदरपूर्वक,

(श्री. राजेंद्र मुळीक )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खेरवाडी पोलीस ठाणे, मुंबई

Photos from Kherwadi Nirbhaya Pathak 's post 23/01/2023

आदरणीय महोदय,
जय हिंद,

आज दि. 23/01/2023 रोजी 13.15 वा. ते 13.30 वा.चे दरम्यान खेरवाडी पोलिस ठाणे हद्दीत,

➡️ *चेतना कॉलेज, शासकीय वसाहत, बांद्रा पूर्व, मुंबई* येथे कॉलेज मधील मुलांची कॉर्नर मीटिंग घेण्यात आली, सदर वेळी त्यांना *निर्भया पथका* विषयी माहिती देण्यात आली.
🔸 कॉलेज परिसरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून याबाबत सूचना,
🔸शिक्षणाचे महत्त्व 🔸ऑनलाईन गेम
🔸ऑनलाईन ॲप. 🔸सायबर क्राईम
🔸सोशल मीडिया गुन्हे 🔸सायबर स्टॉकिंग
🔸बालकांवर होणारे अत्याचार
🔸इंटरनेटचा गैरवापर 🔸सायबर मोर्फिंग
🔸महिला मुलींचे छेडछाडीचे प्रकार
🔸लहान मुलांचे फसवणुकीचे प्रकार
🔸मोबाईल फोन वापराचे फायदे आणि तोटे
🔸अंमली पदार्थांबाबत माहिती देऊन त्यांचे
लागणार व्यसन आणि दुष्परिणाम
इत्यादी विषयी सदर वेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्वसंरक्षण बाबत घ्यायची काळजी व दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. तसेच काही चुकीच्या गोष्टी निदर्शनास आल्यास , जाणवल्यास तर त्वरित त्या संदर्भात पोलिसांना कळवने बाबत सूचना दिल्या.
हेल्पलाईन क्रमांक 100,103 तसेच निर्भया मो. न.*8591935807* बाबत माहिती देऊन आणि आपले संरक्षण करण्याबाबत मार्गदर्शन केले.

सदर वेळी निर्भया पथक अधिकारी पो.उप.नि रूपाली साळुंखे, पो.ह. पागधरे, मपोशि. जाधव हे उपस्थित होते.

आदरपूर्वक,

(श्री. राजेंद्र मुळीक )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खेरवाडी पोलीस ठाणे, मुंबई

Photos from Kherwadi Nirbhaya Pathak 's post 14/01/2023

आदरणीय महोदय,
जय हिंद,

आज दि. 14/01/2023 रोजी 17.40 वा. ते 17.55 वा.चे दरम्यान खेरवाडी पोलिस ठाणे हद्दीत,

➡️ *डॉ.बाबासाहेब आंबेडकर गार्डन, बांद्रा पूर्व, मुंबई* येथे जवळपास 25 ते 30 मुले व त्यांच्या पालकांसोबत संवाद साधून त्यांना *गुड टच, बॅड टच* विषयी तसेच *निर्भया पथका* विषयी माहिती देण्यात आली.
🔸पतंगाचा मांजा अडकून रस्त्यावर होणारे
अपघाताविषयी माहिती
🔸शिक्षणाचे महत्त्व
🔸ऑनलाईन गेम
🔸ऑनलाईन ॲप
🔸सायबर क्राईम
🔸सोशल मीडिया गुन्हे
🔸बालकांवर होणारे अत्याचार
🔸इंटरनेटचा गैरवापर
🔸गुड टच बॅड टच
🔸बालकांचे छेडछाडीचा प्रकार
🔸महिला मुलींचे छेडछाडीचे
प्रकार
🔸लहान मुलांचे फसवणुकीचे
प्रकार
🔸मोबाईल फोन वापराचे फायदे
आणि तोटे
🔸अंमली पदार्थांबाबत माहिती
देऊन त्यांचे लागणार व्यसन
आणि दुष्परिणाम
इत्यादी विषयी सदर वेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्वसंरक्षण बाबत घ्यायची काळजी व दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. तसेच काही चुकीच्या गोष्टी निदर्शनास आल्यास , जाणवल्यास तर त्वरित त्या संदर्भात पोलिसांना कळवने बाबत सूचना दिल्या.
हेल्पलाईन क्रमांक 100,103 तसेच निर्भया मो. न.*8591935807* बाबत माहिती देऊन आणि आपले संरक्षण करण्याबाबत मार्गदर्शन केले.

सदर वेळी निर्भया पथक अधिकारी पो.उप.नि रूपाली साळुंखे, पो.ह. पागधरे, मपोशि. केणी, मपोशि. आवारी हे उपस्थित होते.

आदरपूर्वक,

(श्री. राजेंद्र मुळीक )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खेरवाडी पोलीस ठाणे, मुंबई

Want your business to be the top-listed Government Service in Santacruz?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Kherwadi Police Station
Santacruz
400051