Dr. Sindhutai Sapkal

Directions Website Contact the organization

Dr. Sindhutai Sapkal Sindhutai Sapkal AKA” Maai” & “MOTHER OF ORPHANS” is an Indian social worker

08/10/2026

For online donation : www.officeofsindhutai.org/donation

माईंच्या पवित्र कार्यात आपण योगदान दिल्यास , ते अतिशय मोलाचे ठरेल..!

🪔 ममता बाल सदनमध्ये गणरायाचे मंगलमय आगमन! 🙏🌺तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया।संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती ...
14/09/2026

🪔 ममता बाल सदनमध्ये गणरायाचे मंगलमय आगमन! 🙏🌺

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया।
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया।।

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण येथे गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर विघ्नहर्त्या श्री गणरायाचे मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि थाटामाटात मंगलमय आगमन झाले.

“गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया!” या जयघोषाने संपूर्ण ममता बाल सदनचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. संस्थेतील मुलींनी पारंपरिक लेझिम पथकाच्या तालावर तसेच ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे उत्स्फूर्त स्वागत केले. बाप्पाच्या आगमनाने मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह आणि भक्तिभाव अक्षरशः ओसंडून वाहत होता. त्यानंतर गणरायाची विधिवत पूजा-अर्चना, मंत्रोच्चार आणि मंगलमय वातावरणात स्थापना करण्यात आली. यावेळी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ माईंचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण संस्थेचे अध्यक्ष श्री. दिपकदादा गायकवाड यांच्या हस्ते श्री गणरायाची भक्तिभावाने पूजा करण्यात आली.

माईंच्या संस्कारांनी घडलेल्या या मुलींच्या आयुष्यात बाप्पा सुख, समृद्धी, आरोग्य, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य घेऊन येवो, तसेच ममता बाल सदनच्या प्रत्येक लेकीच्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर करून तिच्या स्वप्नांना बळ मिळो, अशी मनोभावे प्रार्थना यावेळी करण्यात आली. या मंगलमय सोहळ्यास संस्थेचे संचालक मंडळ, मुली आणि कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्ती, संस्कार, आनंद आणि आपुलकीने भारलेल्या या वातावरणामुळे ममता बाल सदनमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित झाला.

“माईंच्या मायेच्या अंगणात,
गणरायाच्या चरणांनी आज पावनता नांदली…
प्रत्येक लेकीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला,
आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात
ममता बाल सदनची दुनिया भक्तिमय झाली!” 🙏🌺
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! 🚩🙏

www.officeofsindhutai.org

Address

Mamata Bal Sadan, Kumbharvalan
Sasvad
412301

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Sindhutai Sapkal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dr. Sindhutai Sapkal:

Shortcuts

Share