11/07/2026
अतिदुर्गम नाणेल येथील बीएलओ आशाराणी यमकर ठरल्या
ईएफ डिजिटायझेशन पूर्ण करणाऱ्या पहिल्या बीएलओ
सातारा दि.10- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या सातारा जिल्ह्यात मतदार यादीच्या 'विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR-2026)' अंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओ मार्फत घरोघरी जाऊन गणना फॉर्म भरुन घेऊन त्याचे डिजिटायझेशन केले जात आहे. या मोहिमेत पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिदुर्गम असलेल्या 'मौजे नाणेल' (मतदार यादी भाग क्र. ३२) या गावातील मतदारांचे गणना प्रपत्र (EF) बीएलओ ॲपद्वारे शंभर टक्के ईएफ डिजिटायझेशन (EF Digitization) पूर्ण करणारे सातारा जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. बीएलओ आशाराणी रामचंद्र यमकर यांनी हे काम यशस्वीरित्या पूर्ण केले.
याबाबत बीएलओ श्रीमती आशाराणी यमकर यांचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक देऊन विशेष अभिनंदन करण्यात आले.