Sourabh Raju Shetti Official

Directions

Sourabh Raju Shetti Official Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sourabh Raju Shetti Official, Social service, Shetti mala, arjunwad Road, shirol, Shirol.

14/09/2026
09/09/2026

स्वाभिमानी अग्रो प्रोडक्ट प्रोड्युसर कंपनीच्या (स्वाभिमानी दूध संघ) नवीन वास्तूतील प्रथम वर्धापन दिनानिमित्त पूजा संपन्न...

नवीन इमारतीतील पहिल्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीच्या प्रगतीसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी कंपनीतील आधिकरी ,कर्मचारी, सप्लायर्स, ट्रेडर्स, डिलर, संकलन संस्था तसेच डेअरी संदर्भात अनेक पुरवठादार यांना निमंत्रित करून कंपनीतील वस्तूंची पूजा करण्यात आली.

यावेळेस स्वाभिमानी दूध संघाचे सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.

सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासाने प्रगतीची ही वाटचाल अशीच अविरत सुरू राहो, हीच सदिच्छा! 🙏🌱

08/09/2026

पवित्र श्रावण सोमवारनिमित्त जयसिंगपूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात महाआरतीला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले.
श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन व आशीर्वाद घेतले.
उज्जैन श्री महाकालेश्वर मंदिरातील आरती आणि स्वामींच्या आशीर्वादाची अनुभूती मनाला विशेष आध्यात्मिक समाधान देणारी ठरली.
यावेळी संपूर्ण मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने भक्तिमय झाला.
मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांमुळे श्रद्धा आणि भक्तीचे सुंदर वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी सर्वांच्या आयुष्यात आनंद,भरभराट आणि मंगलमय दिवस यावेत,अशी प्रार्थना केली.
हर हर महादेव! 🚩
श्री सिद्धेश्वर महाराज की जय! 🙏

श्री काळ भैरवनाथ यात्रा नांदणी 🚩यात्रेनिमित्त श्री काळ भैरवनाथाचे पावन दर्शन घेण्याचे आणि आरती करण्याचे परम सौभाग्य लाभल...
30/08/2026

श्री काळ भैरवनाथ यात्रा नांदणी 🚩

यात्रेनिमित्त श्री काळ भैरवनाथाचे पावन दर्शन घेण्याचे आणि आरती करण्याचे परम सौभाग्य लाभले.
भैरोबा चरणी माथा टेकवून मन भक्ती, श्रद्धा आणि समाधानाने भरून आले.
भैरवनाथाच्या नावानं चांगभलं! 🚩🙏🏻

15/08/2026

"क्रिकेटच्या मैदानावर रंगत आहे मराठी मनोरंजनाचा सोहळा!” 🏏
सांगली येथे अभिजीत कदम मेमोरियल फाऊंडेशन या वतीने आयोजित ‘विश्वजीत’ मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग पर्व–३ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांच्या मनोरंजनासोबतच क्रिकेटच्या माध्यमातून खेळाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी या लीगने एक आगळेवेगळे आणि मनोरंजक व्यासपीठ निर्माण केले आहे. या कार्यक्रमासाठी माझे मित्र जितेश कदम यांनी आग्रहाचे निमंत्रण देत आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती केली होती. विविध क्षेत्रातील कलाकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीने या पर्वाला विशेष रंगत आली आहे.

यावेळी आमदार श्री. विश्वजीत कदम, श्री.जितेश कदम, शांतिनाथ ग्रुपचे प्रमुख संदीप पाटील, अभिनेते प्रविण तरडे, रमेश परदेशी, संतोष जुवेकर, गौरव मोरे, तसेच सांगलीतील पदाधिकारी व युवक यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

09/08/2026

प.पू. १०८ आचार्यश्री विदेहसागरजी महाराज यांच्या पावन प्रेरणेने पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच भव्य युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या प्रेरणादायी संमेलनास मोठ्या संख्येने युवा वर्गासह श्रावक-श्राविका उपस्थित होते.

या प्रसंगी आध्यात्मिक वक्ते स्काय किंग आकाश जैन, तसेच मिरज येथील नगरसेवक निरंजन आवटी व नगरसेवक/नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

व्यसनमुक्ती, संस्कार, अध्यात्म आणि आजच्या युवांसमोरील विविध आव्हाने यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मान्यवर वक्त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. युवकांनी सकारात्मक विचार, सुसंस्कार आणि आत्मविश्वासाच्या बळावर समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढाकार घ्यावा, असा प्रेरणादायी संदेश या संमेलनातून देण्यात आला.

यावेळी समाजकार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांचा “युवा वात्सल्य” पुरस्काराने सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

Address

Shetti Mala, Arjunwad Road, Shirol
Shirol
416106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sourabh Raju Shetti Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category