26/10/2026
🗓️ २६-१०-२०२६ 📍 बालाजी मंगल कार्यालय, श्रीगोंदा
सखी सन्मती फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद विद्यार्थ्यांचा, निर्धार न्यायाचा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थी बांधवांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि करिअरविषयक प्रश्नांवर चर्चा करत त्यांच्या आकांक्षा, अडचणी आणि भविष्याविषयीच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून पुण्यातील एमपीएससी विद्यार्थी आंदोलनातून नावारूपास आलेले श्री. विवेकानंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मीदेखील विद्यार्थ्यांच्या करिअरविषयी थोडक्यात मार्गदर्शन करताना योग्य ध्येय निश्चित करणे, सातत्याने अभ्यास करणे, आत्मविश्वास जपणे आणि अपयशाने खचून न जाता जिद्दीने पुढे जाणे यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, त्यांना योग्य संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावे, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे.
याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सुजीत क्षिरसागर जी, श्रीगोंदा तहसीलदार श्री. सचिन डोंगरे जी, पोलीस निरीक्षक श्री. सुभाष सानप जी, श्री. ऋषिकेश गांगुर्डे, श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक श्री. प्रशांत ओगले, सौ. हेमांगी ओगले आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी बांधव उपस्थित होते.