Vishal B Yadav

Call Directions Contact the organization

Vishal B Yadav District General Secretary BJYM, Uttar Nagar, Media Incharge Shirdi Loksabha Constituency

Terrorism has No Religion..!But Tea Cups have Caste..!
31/08/2026

Terrorism has No Religion..!
But
Tea Cups have Caste..!

सुरक्षित महाराष्ट्राची 'देवेंद्र' गॅरंटी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६' आजपासून लागू. मुख्यमंत्री मा. Devendra ...
29/08/2026

सुरक्षित महाराष्ट्राची
'देवेंद्र' गॅरंटी!

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६' आजपासून लागू.

मुख्यमंत्री मा. Devendra Fadnavis जी यांच्या दृढ संकल्पामुळे 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६' आजपासून लागू.
फसवणूक आणि बेकायदेशीर धर्मांतराच्या विरोधात माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी आणि राज्याच्या अखंडतेसाठी मा.देवेंद्रजींनी उचललेले हे पाऊल महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.

नेतृत्व असावे तर असे!


भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची नवनियुक्त कार्यकारणी जाहीर झाल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक...
25/06/2026

भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची नवनियुक्त कार्यकारणी जाहीर झाल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा! 💐

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, मा. ना. डॉ. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, मा. सुजयदादा विखे पाटील, प्रदेश प्रभारी सुनीलजी राणे, प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे मार्गदर्शन तसेच भाजपा उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष मा. श्री. नितीनजी दिनकर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मा. श्री. रोहित जी चौधरी यांनी घोषित केलेली ही कार्यकारणी युवकांच्या शक्तीला संघटनात्मक बळ देत पक्ष विचार अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवेल, असा दृढ विश्वास आहे.

नव्या जोमाने, नव्या उत्साहाने आणि पक्षनिष्ठेच्या बळावर सर्व पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करतील, याची खात्री आहे.

सर्व नवनियुक्त जिल्हा पदाधिकाऱ्यांना उज्ज्वल राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!

२०१७ वेळी जगनमोहन रेड्डींच्या YSRCP पक्षाचे जवळपास सगळेच आमदार आपल्या पक्षात घेऊन TDP च्या मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूं...
18/06/2026

२०१७ वेळी जगनमोहन रेड्डींच्या YSRCP पक्षाचे जवळपास सगळेच आमदार आपल्या पक्षात घेऊन TDP च्या मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी जगनमोहन यांच्या पक्षाचा खुट्टा उपटला होता. नायडूंनी ज्या २३ आमदारांनी YSRCP पक्ष सोडून टीडीपी पक्षात प्रवेश केला त्यातल्या ४ जणांना कॅबिनेट मंत्रीपदे दिली. YSRCP पक्ष जगनमोहन रेड्डी सोडले तर जवळपास शून्यावर आला होता. त्यांच्याकडे कुठलेही जुने सहकारी उरलेले नव्हते.यावर जगनमोहन रेड्डी शांत घरात बसले नाहीत.किंवा रोज उठून मिडियात स्टेटमेंट दिले नाहीत.

हे सगळं होत असताना जगनमोहन रेड्डी यांनी अभूतपूर्व पदयात्रा काढली. देशातील कोणत्याही राजकारण्याने काढलेल्या सर्वात मोठ्या पदयात्रेचा विक्रम वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी मोडला. त्यांनी आंध्र प्रदेशातील 13 जिल्ह्यांमधून २४१ दिवसांत तब्बल ३६४८ किलोमीटर पायी प्रवास केला.

त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंदाजानुसार, या पदयात्रेदरम्यान जगन यांनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे २ कोटींहून अधिक लोकांशी संवाद साधला. तसेच, तीन महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये जगन यांच्या समर्थनाची मोठी लाट उसळेल आणि तेलुगू देसम पक्षाचा पराभव होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता. आणि झालेही तसेच!

२०१९ विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत वायएसआर काँग्रेस पक्ष आंध्र प्रदेश विधानसभेतील १७५ पैकी १५१ हून अधिक जागांवर आणि लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर विजय जिंकला. त्यांनी सत्ताधारी नायडूंच्या तेलुगू देसम पक्ष तसेच इतर सर्व पक्षांचा जवळपास पूर्णपणे सफाया केला.

ठाकरे जगनमोहन यांच्यासारखा संघर्ष करू शकत नाहीत.सत्ता नसतानाही आणि सत्ता असतानाही ठाकरे कधी मातोश्रीच्या बाहेर निघत नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचा करिष्मा होता म्हणून आजपर्यंत शिवसैनिक त्वेषाने लढायचे. बाळासाहेबांनी हिंदुत्ववादी विचारसरणीशी कधीही तडजोड केली नाही.

आज बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना एकनाथ शिंदेंचा आधार वाटतो कारण एकनाथ शिंदे यांची त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी असलेली २४×७ उपलब्धता हि जमेची बाजू आहे.एकनाथ शिंदे अर्ध्या रात्री आपल्या लोकांसाठी तन मन धनाने उपलब्ध असतात.हा माणूस पैशांना मागेपुढे बघत नाही. उद्धव विरूद्ध एकनाथ लढाईत उद्धव ठाकरेंना गर्दी जमत नाही तर एकनाथ शिंदे गर्दीशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे कधीच हातातून गेलेले नेते किंवा मतदार वापस मिळवू शकत नाहीत.

जोपर्यंत सत्तेचा वापर आपल्या लोकांसाठी तसेच कार्यकर्ते, नेते सांभाळण्याची ताकद एकनाथ शिंदेकडे आहे तोपर्यंत जाणाऱ्या लोकांना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत रोखू शकत नाहीत.त्यांच्याकडे तेच लोकं राहतील जे त्यांच्यावर विधानपरिषद आणि राज्यसभेसाठी अवलंबून असतात..

पत्थर जमा करते करते पारस हाथ से छूट गया.. भारतीय जनता पार्टी राष्ट्र प्रथम की विचारधारा से जुड़ी पार्टी हैं समर्पित भाव स...
05/06/2026

पत्थर जमा करते करते पारस हाथ से छूट गया..
भारतीय जनता पार्टी राष्ट्र प्रथम की विचारधारा से जुड़ी पार्टी हैं समर्पित भाव से जुड़े हर कार्यकर्ता की मेहनत ने इसे खड़ा किया है, पार्टी का प्रचार प्रसार करने में अनेक कार्यकर्ता बेनाम ही खत्म हो गए जिनके ख़िलाफ़ लड़े संघर्ष किया उनके जिंदाबाद के नारे लगवाने तक ठीक था, पर यूँ अपने विचारों को तिलांजलि देते हुए गठबंधन के लिए कार्यकर्ता का अस्तित्व ही ख़त्म कर देना यह तो भाजपा की कार्य पद्धति नहीं थी।
मान लिया परिवार बढ़ाने के लिए आप नई बहू ले आये पर घर गृहस्थी में आदेश सास का ही चलता हैं और सास को बहू बनाने में समय लगता हैं एक पीढ़ी का जहां जहाँ आतें ही बहुओं की चली हैं उन घरों का अंजाम बंटवारे से लेके बर्बादी तक गया हैं।
बाकी नेतृत्व पर विश्वास हैं कि काँच के टुकड़ों के लिए हीरे का सौदा नहीं होगा।

Bharatiya Janata Party (BJP)
Amit Shah
Nitin Nabin Ravi Anaspure Ravindra Chavan Devendra Fadnavis Nitin Dinkar

अन्नामलाई राजकीय बळी... 💥सगळीकडे आनंदी आनंद असताना सगळ्यात वाईट एका गोष्टीचं वाटतं..तामिळनाडूत काल परवा राजकारणात आलेला ...
11/05/2026

अन्नामलाई राजकीय बळी... 💥

सगळीकडे आनंदी आनंद असताना
सगळ्यात वाईट एका गोष्टीचं वाटतं..
तामिळनाडूत काल परवा राजकारणात आलेला विजय शंभरपेक्षा अधीक आमदार निवडून आणून मुख्यमंत्री झाला आहे. पण सिस्टीम मधे बदल घडवायला स्वताची चालू नौकरी सोडून राजकारणात आलेले अन्नामलाई मात्र राजकारणात शून्य वर पोहचले.
भाजप मधील अंतर्गत राजकारण, AIADMK सोबत seat-sharing वाद, आणि त्याला योग्य जागा न मिळणं. तो स्वतः म्हणाला की त्याने उभं राहण्याचा निर्णय घेतला नव्हता, पण अनेक समर्थकांना ते खटकलं होतं. त्यांच्या मेहनतीचा (Coimbatore सारख्या ठिकाणी) प्रभाव दिसला, पण पक्षीय गणित आणि मतदारांच्या लाटेने वेगळंच चित्र उभं केलं.
विजयच्या विजयाला अन्नामलाई यांनी 'Generational Shift' म्हणलं आहे. म्हणजे ४०-५० वर्षात दोनच पक्ष आलटून पालटून सत्ता राबवत होते आणि एक व्यक्ती नवीन पक्ष बनवून दोन वर्षात राज्यात सत्ता आणून दाखवतो हे एैतिहासिक आहे‌.
बाकी अन्नामलाई आता पुन्हा हवी‌ तशी उभारी घेऊ शकतील असं वाटत नाही कारण तामिळनाडूने आजपर्यंत ज्या पण सिनेकलाकाराला उचलून धरलं तो मरेपर्यंत त्यांनी त्याला डोक्यावर घेतलं आणि पाठोपाठ मुख्यमंत्री बनवलं आणि ते कलाकार पण कालांतराने चांगले राजकारणी ठरले. याचं उदाहरण म्हणजे MGR आणि जयललिता..
असो, विजयचा उदय झाला आहे पण हा अन्नामलाईचा अंत नक्कीच नाही. आशा करतो ते पुन्हा मैदानात उतरतीत.
अन्नामलाई परत भरारी मारतील. विजय चार दिन की चांदणी असणार आहे. अण्णामलई लंबी रेस का घोडा आहे. लवकरच केंद्रीय मंत्री होईल. पुढील लढाईत अग्रभागी असेल. यावेळीचा पराभव त्यांचे माथी नाहीय.
एकदा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, राजकारणात patience is a virtue.
जरा दम धरा. ओडिशा, पश्चिम बंगाल हे अजिंक्य वाटणारे किल्ले देखील ढासळले. प्राथमिकतेनुसार प्रत्येकाला रिंगणात घेतले जाईल.

आज लोकसभेत अत्यंत विचित्र दृश्य पाहायला मिळाले.नारी शक्ती वंदन अधिनियमासाठी आवश्यक असलेले संविधान दुरुस्ती विधेयक काँग्र...
17/04/2026

आज लोकसभेत अत्यंत विचित्र दृश्य पाहायला मिळाले.
नारी शक्ती वंदन अधिनियमासाठी आवश्यक असलेले संविधान दुरुस्ती विधेयक काँग्रेस, टीएमसी, डीएमके आणि समाजवादी पक्ष यांनी मंजूर होऊ दिले नाही. महिलांना 33% आरक्षण देणारे हे विधेयक पाडणे, त्याचा आनंद साजरा करणे आणि जयघोष करणे हे खरोखर निंदनीय आणि कल्पनेपलीकडचे आहे.
आता देशातील महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% आरक्षण, जे त्यांचा हक्क होता, ते मिळू शकणार नाही. काँग्रेस आणि तिच्या सहयोगींनी हे प्रथमच केलेले नाही, तर वारंवार असेच केले आहे. त्यांची ही भूमिका ना महिलांच्या हिताची आहे, ना देशाच्या.
मी त्यांना सांगू इच्छितो की, नारी शक्तीचा अपमान येथेच थांबणार नाही, तर दूरपर्यंत जाईल. विरोधकांना ‘महिलांचा आक्रोश’ केवळ 2029 च्या लोकसभा निवडणुकीतच नव्हे, तर प्रत्येक स्तरावर, प्रत्येक निवडणुकीत आणि प्रत्येक ठिकाणी सहन करावा लागेल..

श्रीरामपूर शहरातील सर्व नागरिकांना विनम्र आवाहन 🙏आपले नाव मतदार यादीत योग्य प्रकारे नोंदलेले आहे का, हे तपासणे ही प्रत्य...
08/04/2026

श्रीरामपूर शहरातील सर्व नागरिकांना विनम्र आवाहन 🙏
आपले नाव मतदार यादीत योग्य प्रकारे नोंदलेले आहे का, हे तपासणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
🗳️ SIR मॅपिंग प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा आणि आपल्या मतदानाच्या हक्काचे संरक्षण करा.
📱 ECINET App चा वापर करून आपले नाव सहज शोधा
📄 आवश्यक तपशील BLO कडे देऊन प्रक्रिया पूर्ण करा
✔️ भविष्यात कोणतीही अडचण टाळण्यासाठी आजच कार्यवाही करा

“जागरूक नागरिक, मजबूत लोकशाही” 🇮🇳

गॅस बुकिंग बंद नाही! बुक करण्याची नियमावली समजून घ्या!खोट्या अफवा पसरवत असाल तर तुरुंगात जाल! गॅस बुकिंग बंद असल्याच्या ...
13/03/2026

गॅस बुकिंग बंद नाही! बुक करण्याची नियमावली समजून घ्या!

खोट्या अफवा पसरवत असाल तर तुरुंगात जाल!

गॅस बुकिंग बंद असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; माहिती करून घ्या नवे नियम! सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून 'गॅस बुकिंग बंद झाले आहे' किंवा 'सिलिंडर मिळणे कठीण होणार आहे' अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मुळात गॅस बुकिंग अजिबात बंद झालेले नाही. ग्राहकांनी घाबरून न जाता पुरवठा साखळीतील बदलांचे नियम समजून घ्या.

✅ गॅस बुकिंगचे नेमके गणित काय?

- गॅस कंपन्यांनी सिलिंडरच्या बुकिंगसाठी एक निश्चित 'टाइम लाईन' (वेळापत्रक) ठरवून दिली आहे. त्या नियमांचे पालन केल्यासच पुढील बुकिंग स्वीकारले जाते.

- २५ दिवसांचे अंतर : केंद्र सरकारच्या आणि ऑइल कंपन्यांच्या नियमानुसार, एका बुकिंगनंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी किमान २५ दिवसांचे अंतर असणे आवश्यक आहे. जर तुम्ही आज सिलिंडर बुक केला, तर त्या तारखेपासून पुढील २५ दिवस तुम्हाला दुसरे बुकिंग करता येणार नाही.

- आधीच बुकिंग करणे का गरजेचे? जेव्हा तुम्ही एक नवीन सिलिंडर शेगडीला लावता, तेव्हा तो साधारणपणे महिनाभर चालतो. म्हणूनच, तो संपण्यापूर्वी (उदा. १०-१५ दिवस आधी) बुकिंग करणे तुम्हाला सोयीचे ठरते. परंतु, हे बुकिंग मागील बुकिंगच्या २५ दिवसांनंतरच शक्य होते.

- वेळेचे नियोजन : ज्या वेळेला तुमचा गॅस संपत येतो, त्याच सुमारास तुमची २५ दिवसांची मुदत पूर्ण होत असते. त्यामुळे बुकिंग 'बंद' नसून ते ठराविक कालावधीनंतरच 'सुरू' होते.

महत्वचा मुद्दा....

✅ जर तुम्हाला बुकिंग करताना अडचण येत असेल, तर ते तुमच्या मागील बुकिंगच्या तारखेपासून २५ दिवस पूर्ण झाले नसल्यामुळे नवीन बुक करता येत नाही. त्यामुळे संयम ठेवा आणि अधिकृत ॲप्स उदा. Indane, HP Pay, My LPG किंवा अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवरूनच बुकिंग करून तपासा..

पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आणि राजकारण यातला फरक..!श्रीरामपुर नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ४ मधून उमेदवारी बाबत मारुती भा...
02/01/2026

पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आणि राजकारण यातला फरक..!

श्रीरामपुर नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ४ मधून उमेदवारी बाबत मारुती भाऊ बिंगलेना शेवटच्या दिवसापर्यंत सकारात्मक अश्वासन देण्यात आले होते,
मारुती भाऊंनी सर्व तयारी केली होती, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी निश्चीत असल्याने त्यांनी सकाळी सर्व तयारी केली होती.
अगदी आर्जाच्या रॅलीची सुद्धा तयारी झाली होती.

मुदत संपण्याच्या काही तासांआधी भाजपा आणि राष्ट्रवादी कांग्रेस ची युती झाली आणि काही जागा राष्ट्रवादी ला सोडाव्या लागतील त्यात प्रभाग ४ ची ही जागा होती त्यांना कळवण्यात आले की त्यांना उमेदवारी मिळणार नाहीये आपल्याला युती म्हणून काम करावे लागेल आणि भाजपा चा नगराध्यक्ष निवडून आनन्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

मारुती भाऊंला शिवसेनेकडून AB फॉर्म देण्यात आला भाऊने नम्रपणे तो नकारला व सर्व कार्यकर्ता आणि सामर्थकांना सांगितले मी माझ्या उमेदवारीचा विषय ईथेच थांबवत आहे व भाजप साठी काम करत राहिल.

राज्यभर काय प्रकार झाला हे आपण दोन दिवस झालं पाहतोय.

पण मारुती भाऊंनी कार्यकर्त्यांसोबत कुठे गोंधळ घातला नाही,
कोणत्या वरिष्ठांवर टीका केली नाही, कोणत्या सहकाऱ्यांवर टीका केली नाही,नाराज होण्याचे कोणते नाटक केले नाही.
मारुती भाऊ 3 वर्ष युवा मोर्चा अध्यक्ष आणि 9 वर्षे भारतीय जनता पार्टी
चे अध्यक्ष म्हणून काम बघितले तरी ही शेवट च्या टप्प्यात उमीदवारी नाकरली पण भारतीय जनता पार्टी चा नगराध्यक्ष होईल आणि भाजपा ची सत्ता नगरपालिका वर येईल या आशेने प्रामाणिकपणे काम केले..

हा संघ स्वयमसेवकाचा आणि निष्ठावान कार्यकर्ताचा संयम आहे,
वरिष्ठांचा निर्णय बरोबर की चूकीचा हा विषय बाजूला ठेऊन त्यांनी शिस्त दाखवली.

संघ हा या कारणामूळेच भाजपच्या पाठीचा कणा आहेे.

आम्ही फक्त ऐवढीच आशा करू शकतो की भाजप संघटणात्मक कार्यकर्त्यांचा सकारात्मक विचार करेल.

कोण आपलं आहे आणि कोण सत्तापाहून आपले असल्यासारखे वागतात यातला फरक समजेल..!

Address

Behind RBNB College Shrirampur Yadavnagar Ward No1 Shrirampur
Shrirampur
413709

Telephone

+919890162062

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishal B Yadav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vishal B Yadav:

Shortcuts

Share