04/03/2026
📰 समस्या • सेवा • समाधान
प्रभागातील विविध ठिकाणी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
🔹 सोन्या मारुती समोरील पाण्याच्या लाईनची गळती दुरुस्त
सोन्या मारुती मंदिरासमोरील पाण्याच्या लाईनला झालेली गळती तातडीने दुरुस्त करण्यात आली. त्यामुळे पाण्याचा अपव्यय थांबला.
🔹 हळदे बँड समोरील सार्वजनिक मुतारीची दुरुस्ती
हळदे बँड परिसरातील सार्वजनिक मुतारीची दुरुस्ती करून स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्यात आली.
🔹 खतीब बोळातील ड्रेनेज लाईन क्लिअर
खतीब बोळ येथे तुंबलेली ड्रेनेज लाईन साफ करून सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला.
🔹 रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण
प्रभागातील विविध ठिकाणी पडलेले खड्डे डांबराच्या माध्यमातून बुजविण्यात आले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
🔹 विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट दुरुस्ती करण्यात आली,
झुंजे बोळ, जुने विठ्ठल मंदिर, वीरभद्र मंदिर, युनिक हॉस्पिटल, हळदे बँड बोळ, गद्रे लक्ष्मी मंदिर बोळ व इतर परिसरातील बंद स्ट्रीट लाईट त्वरित दुरुस्त करून प्रकाश व्यवस्था सुरळीत करण्यात आली.
प्रभागातील नगरसेवक अमर पुदाले, प्रवीण दर्गोपाटील, बबिता धुम्मा यांच्या समन्वयाने व झोन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे ही कामे पूर्ण होऊ शकली. परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुविधायुक्त ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
सौ.गीता गोविंद गवई
नगरसेविका
प्रभाग-८