03/10/2021
🌳 *सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची सूचना...* 🌳
शासनाच्या आदेशानुसार दिनांक 4 ऑक्टोबर 2021 पासून इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीचे वर्ग सुरू होत आहेत.
त्या आदेशानुसार आपल्या शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग आपण *4 ऑक्टोबर पासून सुरू करत आहोत.*
🌳 *कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शाळेने केलेली तयारी खालील प्रमाणे...*🌳
♦️ वर्गखोल्या व बेंच पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत.
♦️शौचालय देखील स्वच्छ करण्यात आले आहेत.
♦️विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
♦️ दररोज आरोग्य तपासणी करण्यासाठी *कॉन्टॅक्ट लेस टेंपरेचर गन आणि ऑक्सिमीटर* शाळेने खरेदी केलेले आहेत.
♦️तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी *सॅनिटायझर* उपलब्ध केलेले आहे.
♦️प्रत्येक वर्गामध्ये *एका बेंचवर एकच विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था* असणार आहे.
♦️ *शाळेची वेळ 10 ते 2* अशी आहे.
(शासन आदेशानुसार यात आणखी बदल होऊ शकतो.)
🌳 *पालकांची जबाबदारी* 🌳
♦️ *आपल्या मुलामुलींना शाळेत पाठवण्यासाठी पालकांनी शासनाच्या आदेशानुसार त्यांचे संमतीपत्र भरून द्यायचे आहे.*
♦️यासाठी आपणाला संमतीपत्र शाळा उपलब्ध करून देणार आहे.
♦️इयत्ता 5 वी ते 7 वी त शिकणाऱ्या आपल्या मुलामुलींना नियमित शाळेत पाठवणे.
♦️ इयत्ता पहिली ते चौथी वर्ग सुरू करण्याविषयी अजून शासनाचे आदेश/परवानगी नाही, त्यामुळे या वर्गातील मुलामुलींना शाळेत न पाठवणे.
♦️आपल्या पाल्याकडे आवश्यक शालेय साहित्य जसे- वह्या, पुस्तके, कंपासपेटी, पाणी बाटली, चांगला मास्क.... उपलब्ध आहे का हे काळजीपूर्वक पाहणे.
(नसल्यास उपलब्ध करून देणे)
♦️आपला पाल्य (मुलगा/मुलगी) आजारी असल्यास त्याला शाळेत पाठवू नये.तसेच त्यांना लगेच योग्य उपचार उपलब्ध करून द्यावेत.
🌳 *विद्यार्थ्यांसाठी सूचना* 🌳
♦️ दिनांक 4 ऑक्टोबर 2021 पासून पाचवी ते सातवीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत यावे.
♦️ शाळेची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 अशी आहे.
♦️आपले दप्तर शोधून, स्वच्छ करुन, सर्व शालेय साहित्य त्यात भरून ठेवावे.
♦️ शिक्षकांनी वेळोवेळी सांगितलेला अभ्यास पूर्ण केला आहेच. त्याच्या वह्या, स्वाध्याय पुस्तिका तपासण्यासाठी सोबत आणाव्यात.
♦️ लवकर येऊन मैदानावर खेळणे, शालेय परिसरात गोंधळ घालणे असे प्रकार करू नयेत.
♦️ *प्रत्येक विद्यार्थ्याचे शरीराचे तापमान व ऑक्सिजन लेवल दररोज तपासायची असल्याने दिलेल्या सूचनांप्रमाणे शाळेत यावे.*
♦️शाळेत दररोजचा परिपाठ होणार नाही.
♦️येताना तोंडाला मास्क असावा.
♦️तसेच वर्गात बसल्यानंतर तोंडावरील मास्क काढू नये.
♦️मास्क ची अदलाबदल करू नये.
♦️आपल्याला नेमून दिलेल्या जागेवरच आपल्या वर्गात बसावे.
♦️ जेवणाचा डबा सोबत आणू नये.
♦️ तसेच शाळेमध्ये भात शिजवला जाणार नाही.
♦️ *घरून येतानाच पोटभर जेवण करून यावे.*
♦️येताना आपली स्वतःची पाण्याने भरलेली बाटली सोबत आणावी.
♦️ इतरांच्या बाटलीतील पाणी पिऊ नये.
♦️ प्रत्येकाने एकमेकांपासून योग्य अंतर राखूनच बसावे.
♦️ शालेय परिसरात घोळका करून फिरू नये.
♦️ शाळा सुटल्यानंतर थेट आपल्या घरी जावे.
♦️ सर्व शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास नियमित पूर्ण करावा.
♦️ *कोरोना रोगाच्या संदर्भात शासनाने सांगितलेल्या सर्व सूचनांचे आपल्याला तंतोतंत पालन करायचे आहे.*
-----------------------
शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबर ला आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी आपली शाळा सज्ज आहे.
-----------------------
*ही आवडते मज मनापासुनी शाळा....*
*लाविते लळा ही जसा माऊली बाळा....*
-----------------------