07/09/2025
डफा वर थाप कंठातून संघर्षशील व मुक्तीचे गाणी गाणारे शाहीर आजही तुरुंगात ....
कबीर कला मंचाचे तीन कलावंत कार्यकर्ते... सागर गोरखे, रमेश गायचोर आणि ज्योती जगताप... सागर आणि रमेश यांना आज दिनांक सात सप्टेंबर रोजी अटक होऊन पाच वर्षे झालेली आहेत आणि आठ सप्टेंबर रोजी ज्योती जगताप यांना अटक होऊन पाच वर्षे होतील. 'जामीन हा नियम आणि जेल हा अपवाद' भीमा कोरेगाव- एल्गार परिषद आणि दिल्ली खटल्यामध्ये लागू होत नाही!
खटला अजून सुरू नाही तरीही तुरुंगात सडविण्याचा त्यांचा डाव आहे, ज्यांनी लेखक- वकील- प्राध्यापक-कलावंतां विरुद्ध खोटे पुरावे पेरलेले आहेत... मुक्तीचा स्वर -संगीत सर्वाधिक गरज असलेल्या काळात तुम्ही सारे कोठडीत आहात... आम्ही सारे तुमच्या मुक्तते साठी कटिबद्ध आहोत...
- समता कला मंच
01/08/2025
"ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून, दलितांच्या तळहातावर तरलेली आहे"..
- अण्णाभाऊ साठे, दलित साहित्य संमेलन (1958)
"जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव"
कॉम्रेड, क्रांतिकारी लोकशाहीर, अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
अण्णा भाऊंना क्रांतिकारी जयभीम...लाल सलाम..
13/06/2025
समतेचा वाटेवरचा योध्दा..!
विद्रोही लोकशाहीर शंतनु कांबळे
तू अखेरच्या श्वासापर्यंत लढत होतास.
तुझं फकिरासारखं जगणं-मरणं या विषमतावादी भांडवली व्यवस्थेविरुद्ध विद्रोहच होतं एक समर्पित विद्रोही कवी, कार्यकर्ता-शाहीर म्हणून सदैव आम्हां सर्वांच्या स्मरणात आहेस.
तुझ्या स्मृतीदिनी (१३ जून) क्रांतीकारी अभिवादन..
जय भीम लाल सलाम ... !
15/04/2025
महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने..."समता कला मंच" व "इंशाअल्लाह बेब्स बँड" यांच्या शाहीरीच्या माध्यमातून महापुरुषांना अभिवादन करत...
"गटातटात विभागुन दशोदिशेत भरकटवलेल्या आणि दडपशाही करून चिरडल्या गेलेल्या आंबेडकरी चळवळीला पुन्हा बाबांसाहेबांच्या विचार-मार्गावर आणता येईल हे सुचवणारं गीत"...'भरकटलं बाळ' सादर करीत आहेत...
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यू ट्यूब चॅनल वर जा..
https://youtu.be/D7FTFoG7FnU?si=Wu8xwEgArNFuIAiz
#समताकलामंच
Watch this story by समता कला मंच on Instagram before it disappears.
2,388 Followers, 271 Following, 167 Posts