Panchayat Samiti Mawal

Directions Website

Panchayat Samiti Mawal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Panchayat Samiti Mawal, Government Organization, Mawal, Vadgaon.

🌱 पंचायत समिती मावळ | लोकसेवा हीच प्रथमता
🏛️ शासनाच्या विविध योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय
🤝 ग्रामविकास, पायाभूत सुविधा व सामाजिक कल्याणासाठी योगदान
📌 शिक्षण, आरोग्य, महिला-बालविकास आणि रोजगार हमी यांची प्रभावी अंमलबजावणी

आज रोजी दिनांक ०५/०३/२०२६ रोजी पंचायत समिती मावळ येथे सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा स्व...
09/03/2026

आज रोजी दिनांक ०५/०३/२०२६ रोजी पंचायत समिती मावळ येथे सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सर्व खाते प्रमुख, अधिकारी/कर्मचारी व ग्रामपंचायत अधिकारी यांची समन्वय सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये अभियानातील विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली तसेच ग्रामपंचायत स्तरावर अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
सभेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मा. सदस्यांना २१ ग्रामपंचायती दत्तक देण्यात आल्या. त्यामुळे ग्रामविकासाच्या कामांना अधिक गती मिळून अभियान प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
तसेच स्वच्छता, प्लास्टिकमुक्त गाव, घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, वृक्षलागवड, ग्रामविकासाची कामे तसेच नागरिकांचा सहभाग वाढविणे या विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी परस्पर समन्वय साधून मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करू, असे मत व्यक्त केले.
यावेळी गट विकास अधिकारी मा. श्री. के. के. प्रधान साहेब, तसेच मा.श्री. विठ्ठल अण्णा शिंदे माजी सभापती पंचायत समिती मावळ, मा. श्री. गणेश भाऊ खांडगे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, सहायक गट विकास अधिकारी मा. श्री. एस. डी. थोरात साहेब तसेच सर्व खाते प्रमुख, अधिकारी/कर्मचारी व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. अनंता हनुमंत पावशे, मा. श्रीमती पल्लवी संदीप दाभाडे, मा. श्रीमती दिपाली दीपक हुलावळे, मा. श्री. संतोष गबलू राऊत, मा. श्रीमती मनीषा नितीन मुऱ्हे तसेच पंचायत समिती सदस्य मा. श्रीमती प्राची देविदास गायकवाड, मा. श्रीमती आशा ज्ञानेश्वर मोरमारे, मा. श्री. राजेंद्र गुलाब कडलक, मा. श्री. दिलीप नामदेव ढोरे, मा. श्री. समीर खंडू जाधव, मा. श्रीमती रेश्मा राजू देवकर, मा. श्री. योगेश मुलीधर लोहर, मा. श्रीमती शैला रामचंद्र कालेकर, मा. श्री. साहेबराव नारायण कारके, मा. श्रीमती सुनिता मनोहर येवले उपस्थित होते

मा. गटविकास अधिकारी मा. श्री. प्रधान साहेब यांनी वराळे व उर्से येथे भेट देऊन मॉडर्न स्कूल अंतर्गत सुरू असलेल्या रोबोटिक ...
09/03/2026

मा. गटविकास अधिकारी मा. श्री. प्रधान साहेब यांनी वराळे व उर्से येथे भेट देऊन मॉडर्न स्कूल अंतर्गत सुरू असलेल्या रोबोटिक लॅबच्या कामाची पाहणी केली. लॅबचे काम चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे आढळून आले. तसेच घरकुल कॉलनी कामाचा आढावा घेऊन ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेस ISO प्रमाणपत्र त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले

आज ग्रामपंचायत देवले ता. मावळ येथे माननीय गटविकास अधिकारी श्री. प्रधान साहेब यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज ...
05/03/2026

आज ग्रामपंचायत देवले ता. मावळ येथे माननीय गटविकास अधिकारी श्री. प्रधान साहेब यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत प्लास्टिक वापर टाळणे व कापडी पिशव्यांचा वापर वाढविणे याबाबत जनजागृती करण्यात आली. या अभियानाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी गावातील कुटुंबांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

अभियानांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत देवले येथील गॅप ऑफ फिलिंगची कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या व त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच जिल्हा परिषद शाळा देवळे येथे भेट देऊन माननीय गटविकास अधिकारी श्री. प्रधान साहेब यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले व त्यांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी ग्रामपंचायत देवलेच्या सरपंच सौ. वंदना बाळासाहेब आंबेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी जळकोटे मॅडम तसेच सहायक ग्रामपंचायत अधिकारी जाधव भाऊसाहेब उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंचायत समिती वडगाव मावळ येथे प्रशासक तथा गट विकास अधिकारी मा. श्री. के. के. प्रधान साहेब यांच्या...
27/01/2026

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंचायत समिती वडगाव मावळ येथे प्रशासक तथा गट विकास अधिकारी मा. श्री. के. के. प्रधान साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रध्वजास सामूहिक मानवंदना देण्यात आली. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, गौरवपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात पार पडला.

मावळ तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. कुलदीप प्रधान साहेब यांनी आज दिनांक 13/01/2026 रोजी सुदुंबरे गावास भेट देऊन मुख्यमंत...
15/01/2026

मावळ तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. कुलदीप प्रधान साहेब यांनी आज दिनांक 13/01/2026 रोजी सुदुंबरे गावास भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा सविस्तर आढावा घेतला.
या भेटीदरम्यान
🏠 घरकुल योजना
🛠️ MGREGS / मनरेगा
💧 घरपट्टी व पाणीपट्टी वसुली
👩‍👩‍👧‍👦 बचत गटांचे कार्य
🏫 शाळा व अंगणवाडी
या सर्व घटकांची पाहणी करून संबंधितांना उपयुक्त व दिशादर्शक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्हा परिषद पुणे कडून देण्यात आलेल्या इलेक्ट्रिक घंटागाडीचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाजाची पाहणी करून सुरू असलेल्या व प्रस्तावित विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला.यावेळी सरपंच श्रीमती. मंगल गाडे उपसरपंच श्री. राहुल गाडे सदस्य श्रीमती. अलका गाडे, श्रीमती. सविता गाडे, श्री. कालिदास गाडे, श्रीमती. माधुरी गाडे, श्रीमती. सतिका शिंदे ग्रामपंचायत अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Address

Mawal
Vadgaon
412106

Alerts

Be the first to know and let us send you an email when Panchayat Samiti Mawal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share