DM, Yavatmal

Directions Website

DM, Yavatmal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from DM, Yavatmal, Government Organization, Collector Office, LIC Square, Bangar Nagar, Yavatmal.

श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
14/09/2026

श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
10/09/2026

शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

केंद्र शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावादिशा जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा खासदार...
08/09/2026

केंद्र शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा
दिशा जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा खासदार खा. संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार संजय देरकर, आमदार किसनराव वानखेडे, जिल्हाधिकारी तथा समितीचे सचिव विकास मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कृषी, पीक विमा, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, सिंचन, आवास, स्वच्छ भारत मिशन, महावितरण, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे यांसह विविध केंद्र शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणी व प्रगतीचा सुमारे चार तास सखोल आढावा घेण्यात आला.
योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी समन्वयाने व निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना खा. संजय देशमुख यांनी दिल्या.

आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांचे बेमुदत आंदोलन स्थगितआदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या मध्यस्थीला य...
07/09/2026

आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांचे बेमुदत आंदोलन स्थगित
आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या मध्यस्थीला यश
विविध मागण्या मान्य; १५ सप्टेंबरला मुख्य सचिवांकडे बैठक
यवतमाळ : विशेष पदभरती व इतर मागण्यांसाठी सुरु असलेले आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांचे बेमुदत आंदोलन आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी विकास मीना, विभाग प्रमुख अधिकारी व आंदोलनकर्त्यांची बैठक झाली. यावेळी पदभरती, रिक्त पदे, बिंदुनामावली व सेवा प्रवेश नियमांबाबत सकारात्मक चर्चा झाली. शासनस्तरावरील अडचणी सोडविण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी मुख्य सचिवांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा निर्णय झाला. सकारात्मक चर्चेनंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

परकीय सत्तेविरोधात क्रांतीची ज्योत पेटवणारे, स्वराज्याच्या लढ्याचे धाडसी सेनानी आणि क्रांतिसूर्य उमाजी नाईक यांना जयंतीन...
07/09/2026

परकीय सत्तेविरोधात क्रांतीची ज्योत पेटवणारे, स्वराज्याच्या लढ्याचे धाडसी सेनानी आणि क्रांतिसूर्य उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाचा आधार!गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत शेती करताना अ...
06/09/2026

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाचा आधार!
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत शेती करताना अपघाती मृत्यू किंवा कायस्वरूपी अपंगत्व आल्यास पात्र शेतकरी व त्यांच्या वारसांना २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
📌 पात्रता : १० ते ७५ वर्षे वयोगटातील पात्र शेतकरी व कुटुंबातील पात्र सदस्य
📄 आवश्यक कागदपत्रांसह अपघातानंतर ३० दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक.
शेतकरी बांधवांनी योजनेचा लाभ घ्यावा व पात्र वारसांनी वेळेत अर्ज करावा.

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या!मतदार यादीत नवीन नाव नोंदणी, नाव वगळणे, दुरुस्ती किंवा स्थलांतरास...
05/09/2026

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या!
मतदार यादीत नवीन नाव नोंदणी, नाव वगळणे, दुरुस्ती किंवा स्थलांतरासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती जाणून घ्या आणि आपले नाव मतदार यादीत नोंदवा.
लोकशाहीत सक्रिय सहभाग घ्या! मतदान करा, देश घडवा!

माजी राष्ट्रपती, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या ह...
05/09/2026

माजी राष्ट्रपती, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐

राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📚

महाराष्ट्राचा राज्य उत्सव – ‘महागणेशोत्सव २०२६’ 🙏महाराष्ट्र राज्य उत्सव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी व्हा आण...
04/09/2026

महाराष्ट्राचा राज्य उत्सव – ‘महागणेशोत्सव २०२६’ 🙏
महाराष्ट्र राज्य उत्सव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्या गणेशोत्सवाची भव्यता जगासमोर आणा!

Address

Collector Office, LIC Square, Bangar Nagar
Yavatmal
445001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when DM, Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share