Dr. Omprakash Shete

Call Directions Website Contact the organization

Dr. Omprakash Shete President | Ayushman Bharat - Mission Maharashtra Committee | Ex-Secretary, Health Ministry, GOI | Former OSD to CM & CM Medical Asst. Cell, Mumbai.

Former O.S.D to chief Minister of Maharashtra, also Chief of Chief Minister Medical assistance cell.

26/10/2026

नालंदा आणि तक्षशिला यांसारख्या महान विद्यापीठांनी संपूर्ण जगाला ज्ञानाची दिशा दिली. भारताच्या या गौरवशाली शैक्षणिक वारशाची आजच्या पिढीला आठवण करून देणे महत्वाचे...

अभिमानाचा आणि भावनिक क्षण...!माझी कन्या कु. धनीशा हिचा एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी प्रवेश निश्चित झाला. आज आ...
24/10/2026

अभिमानाचा आणि भावनिक क्षण...!

माझी कन्या कु. धनीशा हिचा एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी प्रवेश निश्चित झाला. आज आमच्या कुटुंबासाठी हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. माझ्या लेकीने पाहिलेलं डॉक्टर होण्याचं स्वप्न आज पहिल्या टप्प्यावर सत्यात उतरलं आहे. मी व थोरले बंधू डॉ. शिवरत्न शेटे यांनी स्वतः गेली अनेक वर्षे आरोग्य क्षेत्रात रुग्णसेवा केली. कौटुंबिक चालत आलेला समाजसेवेचा हा वारसा आता माझी मुलगी पुढे नेणार आहे, यापेक्षा मोठा आनंद एका वडिलांसाठी कोणता असू शकतो?
देशसेवेसाठी आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी तुझं हे ज्ञान कामी येवो, याच मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद.
तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा बेटा! तू अशीच उंच भरारी घे.

तुझे तता,
- डॉ. ओमप्रकाश सदाशिवराव शेटे
(अध्यक्ष- आयुषमान भारत मिशन महाराष्ट्र समिती, महाराष्ट्र राज्य)

#धनीशा #रुग्णसेवा

दिल्लीचे आदरातिथ्य !असं म्हणतात की दिल्लीत लोकं 'चलती' ला नमस्कार करतात... पण जर आपले काम प्रामाणिक आणि वागणे प्रेमळ असे...
22/10/2026

दिल्लीचे आदरातिथ्य !

असं म्हणतात की दिल्लीत लोकं 'चलती' ला नमस्कार करतात... पण जर आपले काम प्रामाणिक आणि वागणे प्रेमळ असेल तर आपली माणसं कायम आपलीच राहतात, याचा प्रत्यय आज पुन्हा आला. आज दिल्ली येथे कामानिमित्त भेट दिली असता, कधीकाळी निर्माण भवन हे केंद्रीय आरोग्य मंत्रालय होते, आता ते कर्तव्य भवन येथे स्थलांतरित झाले आहे.
एअरपोर्टपासून ते कार्यालयापर्यंत तीच आपुलकीची व्यवस्था पाहायला मिळाली. विशेष आनंद म्हणजे माझ्या दिल्लीतील तत्कालीन शासकीय बंगल्यावर असणारा माझा लाडका स्वयंपाकी श्री. महेश बोले यांची भेट झाली. त्यांच्याच हातच्या पुरणपोळी आणि भाकरीचा अस्सल महाराष्ट्रीयन स्वाद घेण्याचा योग आला. समवेत मित्र राजकुमार, शिष्टाचार अधिकारी श्री. सक्सेना उपस्थित होते.
जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा क्षण मनात कायम राहील.

- डॉ. ओमप्रकाश सदाशिवराव शेटे
(अध्यक्ष-आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती, महाराष्ट्र राज्य)

यादोंकी गीतमाला....अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, मुंबई महानगर आयोजित अग्रसेन जयंती निमित्त नेहरू सेंटर, वरळी येथे पार पडले...
17/10/2026

यादोंकी गीतमाला....

अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, मुंबई महानगर आयोजित अग्रसेन जयंती निमित्त नेहरू सेंटर, वरळी येथे पार पडलेल्या 'यादों की गीतमाला' या बहारदार संगीतमय कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिलो.
मुख्य अतिथी डॉ. मोहनलाल अग्रवाल, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. बसंत मित्तल, तसेच विशेष अतिथी डॉ. सुदीप गुप्ता, डॉ. अनिल काशी मुरारका, श्री. रमाकांत टिबरेवाला, श्री. नरेंद्र अग्रवाल, श्री. दीनदयाल ड्रोलिया, श्री. राजेंद्र अग्रवाल, श्री. ईश्वरदास रसीवासिया आणि श्री. सी. पी. हलवासिया या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
दिग्गज गायकांच्या सुमधुर आवाजाने सजलेल्या या कार्यक्रमाचे अप्रतिम संयोजन केल्याबद्दल दीपक कापडिया तसेच संमेलनाचे पदाधिकारी डॉ. राजेंद्र अग्रवाल, शिवकांत खेतान, डॉ. सुमन अग्रवाल, उर्मिला अग्रवाल, श्री. अनिल कैन्या, महेश अग्रवाल, पुरुषोत्तम अग्रवाल आणि संपूर्ण मुंबई महानगर कार्यकारिणीचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन!

|| आखिर परिंदा उड गया ||नानांचं जाणं मनाला चटका लावून गेलं...माणूस किती वर्ष जगला यापेक्षा कसा जगला, हे महत्त्वाचं असं म...
08/10/2026

|| आखिर परिंदा उड गया ||
नानांचं जाणं मनाला चटका लावून गेलं...

माणूस किती वर्ष जगला यापेक्षा कसा जगला, हे महत्त्वाचं असं म्हणतात, आणि हे वाक्य नानांसारख्या माणसासाठीच बनलं असावं. देशाने एक उत्तम अभिनेता गमावला नाही, तर एक स्पष्टवक्ता, संवेदनशील, काळजाला भिडणारा माणूस गमावला आहे. पडद्यावरचा तो रांगडा अभिनेता आणि प्रत्यक्ष जीवनात शेतकऱ्यांच्या बांधावर पाय रोवून उभा राहणारा अवलिया, यात कधीच अंतर नव्हतं. पोटात एक आणि ओठावर एक हा प्रकार त्यांना कधीच जमला नाही. जे मनात तेच ओठावर.
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जलयुक्त शिवाराचं फक्त अभियान राबवलं नाही, तर मराठवाड्याच्या मातीत जलक्रांती घडवली. शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम त्यांनी आत्मीयतेने केलं. २०१६ ची ती आठवण आजही मनात ताजी आहे. दिंद्रुड, ता. माजलगाव, जि. बीड येथे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत एका बंधाऱ्याचं काम झालं. त्यावेळी नानांशी अगदी मनमोकळा संवाद झाला. त्यानंतरही त्यांनी माझ्याकडून काही गरीब, गरजू रुग्णांची कामं आत्मीयतेने करून घेतली. मदत करताना कधीही गाजावाजा नाही, फक्त माणुसकी.
पडद्यावर असो वा वैयक्तिक आयुष्यात, कायम वास्तवाचं भान ठेवून जगणारा, सर्वसमावेशकतेचा खरा चेहरा असलेला अस्सल अभिनेता आणि माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. आपण एका 'खऱ्या माणसाला' मुकलो आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली, नाना...
तुम्ही शिकवलेली माणुसकी आणि संवेदनशीलता आम्ही अशीच पुढे घेऊन जाऊ.
ॐ शांती....!
- डॉ. ओमप्रकाश सदाशिवराव शेटे

।। गोमाता राष्ट्रमाता ।।परम पूज्य सरसंघचालकांच्या सान्निध्यात एक अविस्मरणीय दिवस!         गो विज्ञान अनुसंधान केंद्र, दे...
07/10/2026

।। गोमाता राष्ट्रमाता ।।

परम पूज्य सरसंघचालकांच्या सान्निध्यात एक अविस्मरणीय दिवस!

गो विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार, रामटेक (नागपूर) येथे विश्व हिंदू परिषदेची एक इकाई असलेल्या या केंद्रातर्फे श्रद्धेय अशोक जी सिंघल यांच्या जन्म जयंती वर्षा निमित्त भव्य आणि गरिमामयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पावन कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परम पूज्य सरसंघचालक डॉ. मोहन जी भागवत यांचे शुभागमन होते.
राष्ट्र प्रथम या विचाराने अखंड कार्य करणारे तपस्वी नेतृत्व. २००९ पासून सरसंघचालक पदाची धुरा सांभाळत त्यांनी संघ कार्याला आधुनिक काळाची जोड देत सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, गो-सेवा आणि पंचपरिवर्तनाचा मंत्र संपूर्ण देशात पोहोचवला. त्यांचे साधे राहणीमान, सखोल वैचारिक बैठक आणि प्रत्येक स्वयंसेवकाला आपलासा करणारा स्वभाव हेच त्यांच्या मोठेपणाचे खरे प्रतीक आहे. त्यांच्या एका वाक्यात संपूर्ण राष्ट्राचा विचार सामावलेला असतो.
अशा या युगपुरुषाच्या समवेत एकाच व्यासपीठावर बसण्याचा आणि तब्बल तीन तास वेळ घालवण्याचा, संवाद साधण्याचा बहुमान प्राप्त करुन दिल्याबद्दल गो विज्ञान अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष गोवत्स पद्मेश गुप्ता जी आणि संपूर्ण आयोजक मंडळाचे मनापासून आभार!
या कार्यक्रमास मा.चंद्रशेखर जी बावनकुळे (मंत्री, महसूल), ॲड. ना.आशीष बाबू जैसवाल (आमदार, रामटेक तथा राज्यमंत्री), खासदार मायाताई इवनाते, मा.दिनेशचंद्रजी, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक जी मेहता, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर जी मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते.
'गो संवर्धन - ग्राम समृद्धी - राष्ट्र उत्थान' या मंत्राने काम करणाऱ्या या केंद्रास खूप खूप शुभेच्छा.

- डॉ. ओमप्रकाश सदाशिवराव शेटे
(अध्यक्ष, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती, महाराष्ट्र राज्य)

#गोमाता_राष्ट्रमाता #गोसंवर्धन #मोहनभागवतजी

03/10/2026

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवून सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन. हा विजय देशाच्या युवा शक्तीचा आणि सांघिक प्रयत्नांचा गौरव आहे. जय हिंद! 🇮🇳


Address

267, Kopra B 502, Om Harmony Co-op Housing Society, Sector 10
Takalghat
410210

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Omprakash Shete posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dr. Omprakash Shete:

Shortcuts

Share

Nearby government services